मुस्लिम धर्मात 786 या संख्येला महत्त्वाचे स्थान का? काय आहे नेमका अर्थ, जाणून घ्या

मुस्लिम समाजात 786 या संख्येला फार महत्त्व असते. 786 ही संख्या मुस्लिम समाजात फार पवित्र मानली जातो. (importance of 786 in islam)

मुस्लिम धर्मात 786 या संख्येला महत्त्वाचे स्थान का? काय आहे नेमका अर्थ, जाणून घ्या
importance of 786 in islam
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 5:46 PM

मुंबई : जगभरात जवळपास 800 कोटींहून जास्त लोकसंख्या आहे. World Population Review च्या मते जगातील एकूण लोकसंख्येपैकी 238 कोटी ख्रिश्चन आणि 190 कोटी मुस्लिम लोकांचा समावेश आहे. 190 कोटी लोकसंख्या असलेला मुस्लिम हा जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे. मुस्लिम समाजात 786 या संख्येला फार महत्त्व असते. 786 ही संख्या मुस्लिम समाजात फार पवित्र मानली जातो. पण तुम्हाला या संख्येचे महत्त्व माहित आहे का? ती पवित्र मानण्यामागचं नेमकं कारणं काय? हे तुम्हाला माहित नसेल तर आज आम्ही तुम्ह्ला याबाबतची माहिती देणार आहोत. (why 786 is lucky number for muslim, importance of 786 in islam)

786 या संख्येबाबत वेगळ्या-वेगळ्या धर्मांमधील तज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहेत. हिंदू धर्मात कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी ज्याप्रमाणे देवी-देवतांचे नाव घेतले जाते, त्याचप्रमाणे मुस्लिम धर्मात ‘786’ ही संख्या पवित्र मानली जाते. याचं नेमक कारण काय? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

‘786’ बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीम म्हणजेच अल्लाहचे नाव म्हणून ही संख्या मुस्लिम धर्मात पवित्र मानली जाते. 786 बद्दल धार्मिक तज्ज्ञांची मतं मात्र भिन्न आहेत. ‘बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीम’ उर्दू किंवा अरबी भाषेत लिहिले गेले असेल तर एकूण शब्दांची संख्या 786 आहे. यामुळेच मुस्लिम धर्मातील बरेच लोक अल्लाहच्या नावाच्या जागी 786 लिहितात. या संख्येला अत्यंत पवित्र मानतात. बरेच लोक लग्नाच्या पत्रिकेत आणि मुस्लिम धर्मातील इतर शुभप्रसंगी 786 या संख्येचा वापर करतात.

786 लिहिण्याची सक्ती नाही

पाकिस्तानचे धार्मिक नेते मुफ्ती तारिक मसूद यांचं 786 या संख्येविषयीचं मत वेगळं आहे. मुफ्ती तारिक म्हणतात की बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीम 786 म्हणून लिहिणं ही रियाझी भाषा आहे. त्यांनी सांगितले की बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीमच्या जागी 786 लिहिणं गुन्हा नाहीये, पण ते वापरावं याची सक्तीदेखील नाहीये. पाकिस्तानी धार्मिक नेत्याने सांगितले की, अल्लाहचे पूर्ण नाव घ्यावे आणि ते पूर्ण आदराने घ्यावे.

‘बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीम’ ऐवजी 786 लिहितात

तर काही इस्लामिक धर्मगुरूंच्या मते 786 वापरणं चुकीचं आहे. ‘बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीम’ हे अल्लाहचं नावं अरबीमध्ये लिहिल्यास एकूण अक्षरांची संख्या 786 होते. यामुळेच मुस्लिम धर्मातील बरेच लोक अल्लाहच्या नावाच्या ‘बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीम’ ऐवजी 786 लिहितात.

संबंधित बातम्या

Masik Shivratri 2021 : मासिक शिवरात्रीचा आज विशेष योग; शुभ मुहूर्त, पूजा विधी जाणून घ्या

Parshuram Jayanti 2021 : परशुराम जयंती कधी आहे? शुभ मुहूर्त, महत्त्व, उपासना करण्याची पद्धत जाणून घ्या!

Akshaya Tritiya 2021 | अक्षय तृतीयेच्या दिवशी ही कामं नक्की करा, देवी लक्ष्मी प्रसन्न होईल

(why 786 is lucky number for muslim, importance of 786 in islam)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.