भगवान शिवशंकरांनी आपल्या गळ्यात नाग का धारण केला? जाणून घ्या यामागील कारण
भोलनाथचे रूप इतर देवतांपेक्षा वेगळे आहे. शिवशंकराच्या गळ्यात नाग, केसात गंगा, डोक्यावर चंद्र आणि हातात त्रिशूल-डमरू आहे. हे सगळे शिवशंकरांचे प्रतीक मानले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का या सगळ्या गोष्टी ठेवण्यामागे वेगवेगळ्या कथा आहेत.
मुंबई : सध्या पवित्र श्रावण महिना चालू आहे. या महिन्यात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. श्रावण महिना भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे. धार्मिक मान्यतेनुसार, श्रावण महिना आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्याचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात पूजा केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती श्रावण महिन्यादरम्यान पृथ्वीवर राहतात. भोलेनाथला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक या महिन्यात उपवास ठेवतात. याशिवाय सोमवारच्या दिवशी उपवास तसेच पूजा-व्रत पाळली जातात. (Why did Lord Shiva wear a snake around his neck, know the reason behind this)
भोलनाथचे रूप इतर देवतांपेक्षा वेगळे आहे. शिवशंकराच्या गळ्यात नाग, केसात गंगा, डोक्यावर चंद्र आणि हातात त्रिशूल-डमरू आहे. हे सगळे शिवशंकरांचे प्रतीक मानले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का या सगळ्या गोष्टी ठेवण्यामागे वेगवेगळ्या कथा आहेत. भोलेनाथ केवळ मानवी भक्तीवरच नव्हे तर इतर सजीवांवरही आपली कृपा राखतो. असे म्हटले जाते की नाग-नागीण भोलेनाथला आपला देव मानतात. भोलेनाथच्या गळ्यात नागांची माळ गुंडाळली जाते. त्यामागील दंतकथा तुम्हाला माहित आहे का?
अशी आहे पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार नागराज वासुकी हे भगवान शिव यांचे परमभक्त होते. नागराज वासुकी हे नेहमी शिवशंकरांची पूजा करण्यात व्यस्त राहायचे. पौराणिक कथेनुसार नागराज वासुकी यांनी समुद्रमंथनाच्या वेळी दोरीचे काम केले होते. नागराजाची भक्ती पाहून भोलनाथ प्रसन्न झाले होते. त्यांनी नागराज वासुकी यांना गळ्यात गुंडाळण्याचे वरदान दिले. यानंतर नागराज वासुकी अमर झाले.
नागपंचमी हा सण पवित्र श्रावण महिन्यात साजरा केला जातो. या दिवशी मंदिरांमध्ये नागांची विशेष पूजा केली जाते. या दिवशी नागाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. याव्यतिरिक्त कुंडलीतून काल सर्पदोष दूर करण्यासाठी अनेक विशेष उपाय केले जातात. नागपंचमीच्या दिवशी लोक सापाची विधीवत पूजा करतात. यंदा हा नागपंचमीचा सण 13 ऑगस्ट 2021 रोजी येत आहे. हा सण विधीवत साजरा करून तुम्हीही भोलेनाथचा कृपाशिर्वाद मिळवू शकता. भगवान शिव शंकर हे सर्व देव-देवतांमध्ये श्रेष्ठ मानले जातात. त्यामुळेच त्यांना महादेव मानले जाते. म्हणून भोलेनाथाची पूजा करताना सर्व गोष्टींचे रीतसर पालन करा. (Why did Lord Shiva wear a snake around his neck, know the reason behind this)
Bigg Boss OTT Confirmed Contestants : भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह ते टीव्ही शो क्वीन दिव्या अग्रवाल, ‘हे’ स्पर्धक दिसणार बॉलिवूडच्या घरात!#BiggBoss | #BiggBossOTT | #entertainmenthttps://t.co/giEaZ50tbD
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 8, 2021
इतर बातम्या