AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजेनंतर आरती करणे का महत्त्वाचे असते? असे आहेत आरतीचे नियम

कुठलीही विशेष पुजा करताना जेव्हा तुम्ही शेवटी आरती करता तेव्हाच पूजा पूर्ण होते. आरती करण्याही योग्य पद्धत आहे. आरती म्हणजे देवाची स्तूती करणे. शास्त्रोक्त पद्धतीने आरती केल्याने चांगले परिणाम मिळतात प्राप्त होतात

पूजेनंतर आरती करणे का महत्त्वाचे असते? असे आहेत आरतीचे नियम
आरतीचे महत्त्व Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 7:40 PM

मुंबई : देवाची उपासना करण्याला आणि त्याची पूजा करण्याला हिंदी धर्मात विशेष महत्त्व आहे, यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे माणूस सदाचार आणि धार्मिकतेकडे जातो आणि वाईट कर्मांपासून दूर राहातो. कुठलीही विशेष पुजा करताना जेव्हा तुम्ही शेवटी आरती करता तेव्हाच पूजा पूर्ण होते. आरती करण्याही योग्य पद्धत आहे. आरती म्हणजे देवाची स्तूती करणे. शास्त्रोक्त पद्धतीने आरती केल्याने चांगले परिणाम मिळतात प्राप्त होतात, तसेच पूजेदरम्यान काही उणिवा किंवा चुका राहिल्यास क्षमाही होते. धर्मग्रंथातील आरतीच्या वर्णनात, एका संस्कृत श्लोकात असे म्हटले आहे की, मंत्राशिवाय आणि कोणत्याही कृतीशिवाय, म्हणजेच आवश्यक कर्मकांड न करता पूजा केल्यानंतर आरती (Aarti Rules) केल्यास त्यात पूर्णता प्राप्त होते.

आरती करण्याचे सामान्य नियम

1. एक, पाच, सात किंवा विषम संख्येने दीप लावून आरती करावी. साधारणपणे एक किंवा पाच दिवे लावून आरती केली जाते. 2. आपल्या आवडत्या देवतेची स्तुती जप करण्याबरोबरच, त्यांच्या मंत्रांचाही आरतीमध्ये समावेश आहे. 3. आरतीचे करताना, भक्त मंत्राच्या शब्दांचा आकार बनवून आरती फिरवतो, परंतु जर मंत्र मोठा आणि कठीण असेल तर तसे करणे शक्य नाही. 4. या समस्येवर उपाय सांगताना आपल्या ऋषींनी ओमचा आकार बनवण्याविषयी सांगितले आहे. ऋषी म्हणतात की प्रत्येक मंत्राची सुरुवात ओम या शब्दाने होते. 5. भक्ताने हातात धरलेली आरती अशा प्रकारे फिरवावी की ओमचा आकार तयार होईल. 6. अशाप्रकारे आरती करताना भगवंताच्या गुणांचा जप करण्याबरोबरच मंत्रांचाही जप करावा लागतो. 7. दिव्याच्या ज्योतीची दिशा पूर्व दिशेला ठेवल्याने आयुर्मान वाढते, पश्चिम दिशेला ठेवल्याने दुःख वाढते, दक्षिण दिशेला ठेवल्याने नुकसान होते आणि ज्योत उत्तर दिशेला ठेवल्याने आर्थिक लाभ होतो.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'पहलगाम'चा अख्खा प्लानचं उघड, अतिरेक्यांना काय होत्या सूचना? अन्...
'पहलगाम'चा अख्खा प्लानचं उघड, अतिरेक्यांना काय होत्या सूचना? अन्....
'या भूमीतील सर्व बंधू भगिनींना..', पंतप्रधान मोदींचं वेव्हज समिटमध्ये
'या भूमीतील सर्व बंधू भगिनींना..', पंतप्रधान मोदींचं वेव्हज समिटमध्ये.
हल्ल्याआधी बैसरन व्हॅलीत मुक्काम,या तीन ठिकाणांची दहशतवाद्यांकडून रेकी
हल्ल्याआधी बैसरन व्हॅलीत मुक्काम,या तीन ठिकाणांची दहशतवाद्यांकडून रेकी.
उगवत्या सूर्याप्रमाणे हे समिट चमकत आहे; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
उगवत्या सूर्याप्रमाणे हे समिट चमकत आहे; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
रस्त्यात बस थांबवली अन् ड्रायव्हरचं नमाज पठण, व्हिडीओ व्हायरल होताच...
रस्त्यात बस थांबवली अन् ड्रायव्हरचं नमाज पठण, व्हिडीओ व्हायरल होताच....
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरप्लानचं टुलकिट सापडलं
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरप्लानचं टुलकिट सापडलं.
Amul Milk : तुम्ही अमूल दूध खरेदी करतात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
Amul Milk : तुम्ही अमूल दूध खरेदी करतात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
ऑडिओ - विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी दाखल
ऑडिओ - विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी दाखल.
भारत-पाकच्या तणावादरम्यान बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ...
भारत-पाकच्या तणावादरम्यान बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ....
'सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधीकी', संजय राऊतांचा खोचक टोला
'सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधीकी', संजय राऊतांचा खोचक टोला.