AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vat Pournima 2022: वटपौर्णिमेच्या दिवशी का केली जाते वडाच्या झाडाची पूजा? काय आहे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व

सात जन्मासाठी तोच नवरा मिळतो. म्हणून यादिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. तुम्ही कधी हा विचार केला आहे का वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा का केली जाते. जाणून घेऊया यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व काय आहे.

Vat Pournima 2022: वटपौर्णिमेच्या दिवशी का केली जाते वडाच्या झाडाची पूजा? काय आहे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 11:48 AM

Vat Pournima 2022: वटपौर्णिमेचे (Vat Pournima) व्रत सात जन्म तोच नवरा मिळण्यासाठी महिला करतात. हे व्रत केल्याने आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभते. पुढच्या सात जन्मासाठी तोच नवरा (Husband) मिळतो. यादिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. तुम्ही कधी हा विचार केला आहे का वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा का केली जाते. जाणून घेऊया यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व काय आहे.

हिंदू धर्मात असे अनेक व्रत आहेत जे सौभाग्यवती स्त्रिया नवऱ्याच्या दीर्घआयुष्यांसाठी करतात. त्यापैकीच एक व्रत हे वटसावित्रीचे आहे. हे व्रत दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येच्या तिथीला केले जाते. यावर्षी वट सावित्रीचे व्रत (Vat Savatri 2022) 14 जून मंगळवारी ठेवता येईल. यादिवशी सौभाग्यवती स्त्रिया विधीवत विष्णु देवाची, लक्ष्मी आणि वडाच्या झाडाची पुजा करतात. वटपौर्णिमेचे व्रत केल्याने सुख-समृद्धी आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. सर्व दु:ख नाहीशी होतात. हिंदू धर्मात अनेक धर्मात वडाच्या झाडाची पूजा केली जाते. पण, वटपौर्णिमेच्या दिवशी यापुजेला विशेष महत्व असते. पण, वडाचेच झाड का असा तुम्ही कधी विचार केला आहे का? यामागची धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व काय आहे जाणून घेऊया.

वटवृक्षाच्या पूजे मागचे धार्मिक महत्व

वटवृक्षाच्या खोडात विष्णु, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान आहेत. वडाच्या झाडाच्या बऱ्याच फाद्यांना पारंब्या असतात यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असं मानलं जातं. मनातील इच्छा पूर्ण होतात. संतान प्राप्ती साठी देखील अनेक स्त्रियां वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाचे आयुष्य हे लांब असते. ज्येष्ठ महिन्यातील अमावस तिथीला वट वृक्षाच्या (Banyan Tree) सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुर्नजीवन मिळवून दिले होते. यादिवसापासून वट वृक्षाची पूजा केली जाऊ लागली. पिंपळाच्या झाडाला विष्णु देवाचे प्रतीक मानले जाते. तसंच वटवृक्षाला शिव शंकराचं प्रतीक मानलं जातं. यावृक्षाची पूजा करणं शंकराची पूजा करण्यासारखं आहे.

हे सुद्धा वाचा

वटवृक्षाचे वैज्ञानिक महत्व

वडाचे झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन देते. हे झाड दिवसात 20 तासांपेक्षा जास्त वेळ ऑक्सीजन देण्याचे काम करते. याझाडाच्या फांद्यात कार्बन डायऑक्साइड घेण्याची क्षमता असते. हे वातावरण शुद्ध ठेवायचे काम करते. वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखलं जातं. वडाच्या झाडाची मुळं, पानं, फुलं आणि चीक तसंच साल या सगळ्याचा उपयोग औषध म्हणून करण्यात येतो. इतकंच नाही तर त्याचा केशवर्धक म्हणूनही वापर करतात. तसंच याच्या पारंब्या शिकेकाईमध्ये घालून पाणी उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास, केसांच्या वाढीसाठी उपयोग होतो. त्यामुळे वडाच्या झाडांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. शरीराला आवश्यक असा ऑक्सिजन तुम्हाला वडाच्या झाडामुळे मिळतो. वडाच्या काटक्यांचा उपयोग हा होमहवनामध्ये आणि यज्ञामध्ये समीधा म्हणून करण्यात येतो. तसंच वडाच्या प्रत्येक फांदी, पारंबी आणि पानामधूनही नवीन वटवृक्ष जन्माला येतो. त्यामुळे या वृक्षाला अक्षयवट असं म्हणतात. त्यामुळेच वटपौर्णिमेला वडाचं पूजन केलं जातं.

(दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे. याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही.)

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.