असं काय झालं की भगवान रामाने प्रिय हनुमानाला मृत्यूदंड सुनावला? जाणून घ्या देव-भक्ताच्या या अनोख्या कहाणीबद्दल

हिंदू धर्माच्या महान ग्रंथ रामायणाच्या कथांशी प्रत्येकजण परिचित आहे. हनुमानाच्या भक्तीबद्दलही सर्वांना माहिती आहे (Death Sentence To Hanuman).

असं काय झालं की भगवान रामाने प्रिय हनुमानाला मृत्यूदंड सुनावला? जाणून घ्या देव-भक्ताच्या या अनोख्या कहाणीबद्दल
Lord Rama And Hanuman
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 2:29 PM

मुंबई : हिंदू धर्माच्या महान ग्रंथ रामायणाच्या कथांशी प्रत्येकजण परिचित आहे (Rama Gave Death Sentence To Hanuman). हनुमानाच्या भक्तीबद्दलही सर्वांना माहिती आहे. ते भगवान रामाचे सर्वात मोठे आणि प्रिय भक्त होते. मग असे काय झाले की श्रीराम हनुमानाचा वध करण्यास तयार झाले. एवढेच नाही तर हनुमानजी यांना मृत्यू न मिळाल्यावर त्यांनी ब्रह्मास्त्रांनीही त्यांच्यावर हल्ला केला (Why Lord Rama Gave Death Sentence To Bhakt Hanuman Know This Interesting Story).

असे काय घडले की भगवान राम यांना आपल्या प्रिय भक्ताला मृत्यू दंड का द्यावा लागले? जाणून घेऊया –

एकदा सर्व महान संत आणि ब्राह्मण गण सभेला उपस्थित जाले. देव ऋषी नारद, वशिष्ठ विश्वामित्र यांसारखे थोर विद्वान ही चर्चा करण्यासाठी एकत्रित जमले होते की श्री भगवान रामाच्या अस्तित्वापेक्षा रामाचे नाव मोठे आहे? या सभेत संकट मोचन हनुमानही उपस्थित होते. पण, ते काही बोलत नव्हते. ते मूक अवस्थेत संपूर्ण चर्चा शांतपणे लक्षपूर्वक ऐकत होते.

नारदांचे मत होते की स्वत: भगवान रामापेक्षा राम हे नाव मोठे आहे आणि ते सिद्ध करण्याचा दावा त्यांनी केला. आता चर्चा संपली होती, सर्व संतांच्या परत जाण्याची वेळ आली होती. तेव्हा नारदाने हनुमानाला विश्‍वामित्र सोडून इतर ऋषीमुनींचे छुप्यापद्धतीने स्वागत करण्यास सांगितले. युक्तिवाद असा होता की विश्वामित्र हे एक राजा होते.

हनुमानाने प्रत्येकाचे एक एक करुन अभिवादन केले. पण नारदांनी सांगितल्याप्रमाणे विश्वामित्र यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. आपला आपमान झालेला पाहून विश्वामित्र रागावले. तेव्हा विश्वामित्रांनी रामभक्त हनुमानाच्या या चुकीबद्दल त्याला मृत्यूदंड देण्याचे वचन दिले.

भगवान राम हनुमानावर खूप प्रेम करीत होते पण विश्वामित्र हे त्यांचे गुरुही होते. रामाने हनुमानाला मृत्यूदंड देण्याचे ठरविले. जेणेकरुन गुरुचा आदेशचं पालन व्हावं. श्री राम त्यांची हत्या करायला येत आहेत हे जेव्हा हनुमानाला समजले, तेव्हा हे का घडले हे त्यांना समजू शकले नाही. मग ऋषी नारदांनी त्यांना राम नावाचा जप करत राहण्याचा सल्ला दिला. हनुमान एका झाडाखाली बसून जय श्री रामचा जप करु लागली.

राम धून गाताच ते गहन ध्यानात मग्न झाले. भगवान राम तेथे पोहोचल्यावर हनुमानावर हल्ला करण्यासाठी त्याने बाणांचा वर्षाव सुरु केला. पण राम नावात लीन पवन पुत्राला धक्काही नाही लागला. श्री राम यांनी हे पाहिले तेव्हा ते गोंधळात पडले होते. त्यांनी मनात विचार केला की जो भक्त माझ्या नावाचा जप करीत आहे, त्याचं मी तर काय कुणीही काहीही बिघडवू शकत नाही. त्यांचे बाण अपयशी झाल्याचे पाहून, भगवान राम यांनी हनुमानावर अनेक शस्त्रे देखील वापरली, मात्र ती सर्व अपयशी ठरली.

पण, श्री रामांना त्यांच्या गुरुंच्या वचनाचे पालन करायचे होते. भगवान राम यांनी पुन्हा प्रयलंकारी ब्रह्मास्त्र वापरले. भगवान राम नावाचा जप करत असलेल्या हनुमानावर या ब्रह्मास्त्रांचा काही परिणाम झाला नाही. पृथ्वीवर प्रलयासारखी परिस्थिती पाहून नारद विश्वामित्रांकडे गेले आणि त्यांना सर्व सत्य सांगितले. यानंतर विश्वामित्रांनी रामाला त्यांच्या वचनातून मुक्त केले आणि देव ऋषी नारदांनी हे सिद्ध केले की स्वत: रामापेक्षा राम नाव हे अधिक शक्तिशाली आहे.

Why Lord Rama Gave Death Sentence To Bhakt Hanuman Know This Interesting Story

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Ram Navami 2021 | या रामनवमीला 9 वर्षांनंतर पांच ग्रहांचा दुर्मिळ शुभ योगायोग

Ram Navami 2021 | रामनवमी का साजरी केली जाते? जाणून घ्या रामनवमीची तिथी, महत्त्व, शुभ मुहूर्त आणि कथा…

Shanidev | शनिदेवाला तेल का अर्पण करतात? जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा…

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.