रविवारी तुळशीचे पानं का तोडू नये? असे आहे या मागचे कारण
रविवारी तुळशीची पाने (Tulsi Importacne) का तोडता येत नाहीत? एवढेच नाही तर रविवारी पूजा केल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करण्यासही मनाई आहे. असे का त्याबद्दल जाणून घेऊया.
मुंबई : तुळस आणि आल्याचा चहा रोज घरी बनवला जातो. मात्र रविवार सुट्टीचा दिवस असूनही अनेक वेळा तुळशीची चव चहामध्ये मिळत नाही. कारण शनिवारी तुम्ही तुळशीची अतिरिक्त पाने तोडून ठेवायला विसरलात आणि आज रविवार आहे त्यामुळे कुटुंबातील कोणीही तुळशीला हात लावू शकत नाही. अशा स्थितीत हा प्रश्न नक्कीच मनात येतो की रविवारी तुळशीची पाने (Tulsi Importance) का तोडता येत नाहीत? एवढेच नाही तर रविवारी पूजा केल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करण्यासही मनाई आहे. घरी आई आणि आजी अनेकदा मनाई करतात आणि म्हणतात की आज तुळशीऐवजी दुसऱ्या कुंडीत पाणी टाका. असे का म्हणतात? चला जाणून घेऊया यामागचे कारण
तुळस आणि भारतीय संस्कृती
आजही आपल्या भारतीय संस्कृतीत तुळशीला सर्वात पवित्र वनस्पती मानले जाते. तुळस ही वैद्यकीय वनस्पती आहेच पण धार्मिक दृष्याही तीला विशेष स्थान आहे. हेच कारण आहे की जवळजवळ सर्व हिंदूंच्या घरात तुळशीचे रोप नक्कीच दिसेल.जेव्हा तुळशीचा विचार केला जातो तेव्हा आपण विज्ञानाच्या आधी धार्मिक श्रद्धांचा विचार करतो, कारण आपल्या धार्मिक ग्रंथात तुळशीच्या रोपाचे वर्णन आढळते आणि तुळशीच्या पानांशिवाय कोणतेही पूजा-हवन पूर्ण होत नाही.
पौराणिक कथेनुसार तुळशीचे रोप हे लक्ष्मीचे रूप आहे. देवी तुळशी ही भगवान शालिग्रामची पत्नी आहे, भगवान विष्णूचे हे एक रूप आहे. देवी तुळशीला भगवान विष्णूकडून हे वरदान मिळाले आहे की ती जिथे नसेल ती पूजा देव स्वीकारणार नाही. तुळशीच्या या वरदानामुळे प्रत्येक पूजेमध्ये तीची पाने वापरली जातात.
रविवारी तुळशीची पाने का तोडत नाहीत?
हिंदू धर्मग्रंथांमध्ये, तुळशी ही वनस्पतीपेक्षा देवी तुळशीचे स्वरूप आहे. धार्मिक मान्यतांनुसार, रविवारी देवी तुळशी आणि विष्णू ध्यान आणि विश्रांतीमध्ये मग्न राहतात. तर इतर दिवशी ती आपल्या भक्तांच्या जनहितासाठी आणि कल्याणासाठी उपस्थित असते. रविवारी तुळशीजींचे ध्यान आणि विश्रांतीमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी तुळशीला जल अर्पण करणे आणि रविवारी तुळशीची पाने तोडणे वर्ज्य आहे.
या दिवशीही तुळशीला जल अर्पण केले जात नाही
केवळ रविवारीच नाही तर एकादशीच्या दिवशीही तुळशीला पाणी अर्पण करणे आणि तुळशीची पाने तोडणे निषिद्ध मानले जाते, म्हणजेच तसे करण्यास मनाई आहे. कारण धार्मिक आणि पौराणिक मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी तुळशी भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते. अशा स्थितीत जल अर्पण केल्यास तीचा उपवास मोडतो. त्यामुळे दर रविवारी आणि एकादशीला तुळशीची दुरूनच पूजा केली जाते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)