Lord Ganesha | तुळशीने गणपतीला शाप का दिला होता, जाणून घ्या ही पौराणिक कथा…
गणपतीच्या पूजेत कोणत्या वस्तू अर्पण केल्या पाहिजेत आणि कोणत्या निषिद्ध मानल्या जातात हे आपल्या सर्वांना माहित आहे. गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर करणे निशिद्ध मानले जाते. पण, त्यामागील दंतकथेबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या गणेशाच्या पूजेत तुळस वर्जित का आहे?
मुंबई : गणेश चतुर्थीचा उत्सव सुरु झाला आहे. या दिवसापासून पुढील 10 दिवस बाप्पाची पूजा केली जाते. यावेळी गणेशोत्सव 10 सप्टेंबर 2021 पासून 19 सप्टेंबर 2021 पर्यंत सुरु असेल. या 10 दिवसांसाठी भक्त विधावत गणपतीची पूजा करतात. मान्यता आहे की भक्तीभावाने पूजा केल्यास तुमचे सर्व त्रास दूर करतात.
गणपतीच्या पूजेत कोणत्या वस्तू अर्पण केल्या पाहिजेत आणि कोणत्या निषिद्ध मानल्या जातात हे आपल्या सर्वांना माहित आहे. गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर करणे निशिद्ध मानले जाते. पण, त्यामागील दंतकथेबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या गणेशाच्या पूजेत तुळस वर्ज्य का आहे?
गणेश आणि तुळशीची पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, राजा धर्मात्मजची कन्या तुळस ही लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेवर निघाली. तीर्थयात्रेदरम्यान तुळशीने पाहिले की गणेश जी गंगेच्या किनाऱ्यावर तपस्या करत होते. पौराणिक कथेनुसार भगवान तपस्येत विलीन होते. त्यांच्या शरीरावर चंदन लागले होते. गळ्यात रत्नांची माळ होती. कमरेत रेशमचे पिताम्बर गुंडाळलेले होते. ते एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करीत होते.
गणपतीचे ते सुंदर स्वरुप पाहून तुळशी मंत्रमुग्ध झाली. तिने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत गणपतीची तपस्या भंग केली. भगवान गणेश हे पाहून संतप्त झाले आणि तुळशीचे हे कार्य अशुभ असल्याचे वर्णन केले. तुळशीचा हेतू जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले की मी ब्रह्मचारी आहे आणि त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला.
हे ऐकून तुळशी संतापली आणि तिने भगवान गणपतीला शाप दिला की, तुझे एक नाही दोन विवाह होतील. यावर भगवान गणेशानेही तिला शाप दिला की, तुझे लग्न एका राक्षसासोबत होईल. हे ऐकून तुळशीने गणेशाची माफी मागितली.
तेव्हा गणेश जी म्हणाले की तुझे लग्न शंखचूर्णा नावाच्या राक्षसाशी होईल. पण तू रोपाचे रुप धारण करशील. ते म्हणाले की, कलियुगात तुळशी जीवन आणि मोक्ष देणारी असेल. पण तुझा वापर माझ्या पूजेत करणे निशिद्ध असेल. त्यामुळे गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही. तुळस वनस्पती हिंदु धर्मात सर्वात पवित्र वनस्पती मानली जाते. हे पूजेच्या साहित्यात वापरले जातात. तुळस ही भगवान विष्णूची आवडती आहे. तुळशीशिवाय त्यांची पूजा अपूर्ण मानली जाते.
Ganesh Chaturthi 2021 | गणपती बाप्पाला कोणती फुलं वाहावी आणि कोणती वाहू नयेhttps://t.co/mf60eF5qjb#Ganeshotsav #GanpatiBappaMorya #ganeshafestival
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 12, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Ganesh Festival 2021 | संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा, गणपती बाप्पा तुमची सगळी विघ्नं दूर करेल
Ganesh Chaturthi 2021 : गणेशोत्सवादरम्यान या चार चुका अवश्य टाळा, जाणून घ्या याबाबत सर्वकाही