मनुष्यच नाही तर देवी-देवताही चुका करतात, ती कुठली चूक होती ज्यामुळे यमराजला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला होता
कोणत्याही माणसाच्या मृत्यूनंतर यमदूत माणसांना त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देण्यासाठी मृत्यूच्या देवता यमराजकडे घेऊन जातात. पण स्वत: दंडाधिकारी यमराजला आपल्या चुकीचं शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीवर यावं लागलं होतं. एका ऋषीच्या शापामुळे स्वत: यमराजला स्वतःच्या चुकांची शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीवर मनुष्य म्हणून जन्म घ्यावा लागला होता.
मुंबई : वेळोवेळी देवी-देवतांना पृथ्वीवरील मनुष्य रुपात अवतार घ्यावा लागला आहे. असे म्हटले जाते की जेव्हा-जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्म होतो तेव्हा देव पृथ्वीवर त्याच्या साकार रुपात प्रकट होतात. भगवान विष्णूबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी आतापर्यंत त्यांचे 23 अवतार झाले आहेत, ज्यात मत्स्य अवतार, कुर्मा अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार यांचा समावेश आहे. कृष्णा अवतार यांचा समावेश आहे. यानंतर, भगवान विष्णूचा चोविसावा अवतार कलियुगातील ‘कल्कि अवतार’ च्या रुपात अद्याप बाकी आहे. पण तुम्ही कधी ऐकले आहे का की यमराजने पृथ्वीवरही अवतार घेतला होता. आज आम्ही तुम्हाला सांगतो की मृत्यूच्या देवता यमराजने कोणत्या मानवी रुपात अवतार घेतला? (Why Yamraj had to take a birth on earth as human)
शापामुळे पृथ्वीवर जन्म
मान्यता आहे की, कोणत्याही माणसाच्या मृत्यूनंतर यमदूत माणसांना त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देण्यासाठी मृत्यूच्या देवता यमराजकडे घेऊन जातात. पण स्वत: दंडाधिकारी यमराजला आपल्या चुकीचं शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीवर यावं लागलं होतं. एका ऋषीच्या शापामुळे स्वत: यमराजला स्वतःच्या चुकांची शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीवर मनुष्य म्हणून जन्म घ्यावा लागला होता.
यमराजच्या अवताराची कहाणी
मान्यता आहे की, महाभारत काळात माण्डव नावाच्या एका ऋषीला एकदा एका राजाने चुकीने चोरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली. यानंतर, राजाच्या सैनिकांनी त्याला फाशी दिली. परंतु काही दिवस फाशीवर लटकल्यावरही जेव्हा त्याचा जीव गेला नाही, तेव्हा राजाला त्याची चूक लक्षात आली आणि त्याने आपल्या चुकीबद्दल ऋषी माण्डव यांच्याकडे माफी मागितली आणि त्यांना आदराने आपल्या राजवाड्यातून निरोप दिला.
हा महात्मा म्हणून जन्मला
राजाचा राजवाडा सोडल्यानंतर माण्डव ऋषी यमराजांकडे पोहोचला आणि त्यांनी यमराजाला विचारले की मी काय गुन्हा केला होता ज्यासाठी मला ही शिक्षा मिळाली. तेव्हा यमराजने त्याला सांगितले की तू 12 वर्षांचा असताना एकै पतंगाच्या शेपटीत काटा रुतवला होतास. त्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला.
यमराजच्या बोलण्यावरुन ऋषी माण्डव संतापले आणि ते म्हणाले की, एका 12 वर्षाच्या मुलाला धर्म आणि अधर्माचे ज्ञान नव्हते आणि आपण मला एका लहान गुन्ह्यासाठी इतकी मोठी शिक्षा दिली आहे. तेव्हा रागाच्या भरात मांडव ऋषींनी यमराजला शाप दिला की तुला शुद्र योनीतील मोलकरणीच्या घरात जन्म घ्यावा लागेल. यानंतर ऋषींच्या शापामुळे यमराजांना महाभारत काळात विदुर म्हणून जन्म घ्यावा लागला.
Untold Story | संतोषी मातेचा जन्म कसा झाला, भगवान गणेशासोबत त्यांचं नातं काय?https://t.co/WxZGQR4941#Ganesha #SantoshiMata #Spiritual
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 14, 2021
Why Yamraj had to take a birth on earth as human
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Wednesday Atro Tips | जर बुध ग्रह असेल कमकुवत तर बुधवारच्या दिवशी हे 6 उपाय करा
Hanuman Ji | हनुमानजींना संकटमोचन का म्हटलं जातं, जाणून घ्या