Yogini Ekadashi 2022: शापमुक्त करते योगिनी एकादशीचे व्रत; पौराणिक कथा आणि महत्त्व
योगिनी एकादशीचे व्रत दरवर्षी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला केले जाते. वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींपैकी योगिनी एकादशी (Yogini Ekadashi 2022) अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यावर्षी 2022 मध्ये योगिनी एकादशीचे व्रत 24 जून रोजी येणार आहे. यावर्षी 2022 मध्ये योगिनी एकादशीचे व्रत 24 जून रोजी ठेवण्यात येणार आहे. शास्त्रानुसार योगिनी एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश […]
योगिनी एकादशीचे व्रत दरवर्षी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला केले जाते. वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींपैकी योगिनी एकादशी (Yogini Ekadashi 2022) अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यावर्षी 2022 मध्ये योगिनी एकादशीचे व्रत 24 जून रोजी येणार आहे. यावर्षी 2022 मध्ये योगिनी एकादशीचे व्रत 24 जून रोजी ठेवण्यात येणार आहे. शास्त्रानुसार योगिनी एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो तसेच जीवनात सुख-समृद्धी वाढते. त्याचबरोबर योगिनी एकादशीचे व्रत करणार्या व्यक्तीने व्रतकथा अवश्य वाचावी, तरच व्रताचे पूर्ण फळ मिळते, अशी मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार, स्वर्गातल्या अलकापुरी या नगरीमध्ये कुबेर नावाचा राजा राहत होता. ते भोलेनाथांचे परम भक्त होते आणि रोज त्यांची पूजा करत असत. हेम नावाचा माळी राजा कुबेराच्या पूजेसाठी फुले आणत असे. पण एके दिवशी माळी त्याची सुंदर पत्नी विशालाक्षी हिच्यासोबत विनोद आणि आनंदात मग्न होऊन फुले द्यायला आला नाही.
माळीची दुपारपर्यंत वाट पाहिल्यानंतर राजाने माळीच्या अनुपस्थितीचे कारण शोधण्यासाठी आपल्या नोकरांना पाठवले. तेव्हा नोकरांनी येऊन सांगितले की, माळी आपल्या पत्नीसोबत प्रणय आहे. त्यामुळे संतापलेल्या कुबेर राजाने माळीला बोलावून सांगितले, ‘तू माझ्या परमपूज्य भगवान शिवाचा अनादर केला आहेस, म्हणून मी तुला शाप देतो की, तुला स्त्रीचा वियोग सहन करावा लागेल आणि मृत्यूलोकात जाऊन कुष्ठरोगी व्हावे लागेल.’
राजाने शाप देताच माळी स्वर्गातून पृथ्वीवर पडला. त्याच वेळी पृथ्वीवर येताच तो कुष्ठरोगी झाला. हेम माळी भिकाऱ्यासारखे आयुष्य जगू लागला. दुसरीकडे, तो आपल्या पत्नीच्या आठवणीने सतावू लागला, परंतु शापामुळे त्याच्या ताब्यात काहीच नव्हते. एके दिवशी माळी फिरत फिरत मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात गेला. माळीला अशा अवस्थेत पाहून ऋषींनी त्याची अवस्था विचारली. तेव्हा माळीने ऋषींना शापाबद्दल सांगितले.
संपूर्ण गोष्ट जाणून घेतल्यानंतर मार्कंडेय ऋषींनी हेम माळीला योगिनी एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. तेव्हा माळीने ऋषींच्या आज्ञेवरून आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत केले. त्यानंतर या व्रताच्या प्रभावाने माळी त्याच्या शापातून मुक्त होऊन पुन्हा स्वर्गीय नगरी अलकापुरी येथे जाऊन आपल्या पत्नीसह सुखाने नांदू लागला. तेथे त्याचा कुष्ठरोगही निघून गेला.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)