तुम्हीही कर्जबाजारी आहात; मग करा हे सोपे उपाय, मिळेल कर्जपासून मुक्ती
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला कर्जाचा कारक ग्रह मानलं जातं. ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रह कमजोर असतो. किंवा इतर दुसऱ्या कोणत्या तरी ग्रहासोबत मंगळाची अशुभ युती होते, तेव्हा तो व्यक्ती कर्जबाजारी बनतो.

आजच्या काळात महागाई प्रचंड वाढली आहे, परंतु महागाई ज्या पटीनं वाढत आहे, तेवढं उत्पन्नात मात्र वाढ होताना दिसत नाहीये, तुमची इच्छा नसताना देखील तुम्हाला कर्जाची आवश्यकता पडते, किंवा कोणाकडून तरी पैसे उसने घ्यावे लागतात. आजच्या काळात महिन्याच्या पगारात घर चालवणं कठीण काम बनलं आहे. काही लोकांची परिस्थिती अशी असते की कितीही काबाड कष्ट केले तरी त्यांचं कर्ज काही फिटत नाही. उलट त्यांच्यावर कर्ज वाढतच जातं. ते कर्जाच्या ओझ्याखाली दबून जातात. मात्र तुम्हाला जर कर्जबाजारीपणाच्या समस्येपासून सुटका पाहिजे असेल तर ज्योतिष शास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगितले आहेत. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला कर्जाचा कारक ग्रह मानलं जातं. ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रह कमजोर असतो. किंवा इतर दुसऱ्या कोणत्या तरी ग्रहासोबत मंगळाची अशुभ युती होते, तेव्हा तो व्यक्ती कर्जबाजारी बनतो. जर तुमच्या कुंडलीमध्ये शनि देव, राहु, केतु यांचा देखील अशुभ प्रभाव असेल तरी देखील तुम्ही कर्जबाजारी बनू शकता. सोबतच चंद्र आणि बुध यांची अशुभ युती देखील तुम्हाला कर्जबाजारी बनवू शकते. त्यासाठी काय करायला पाहिजे ते आज आपण जाणून घेणार आहोत.
प्रदोष व्रत करा – प्रदोष व्रताला हिंदू धर्म शास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल तर तुम्ही प्रदोषाचं व्रत करा. यामुळे प्रभू महादेवांची तुमच्यावर कृपादृष्टी राहील आणि तुम्हाला कर्जातून मुक्ति मिळेल.
मंगळवारी किंवा शनिवारच्या दिवशी मारूतीच्या चरणांवर तेल आणि शेंदूर मिसळून अर्पण करा, तसेच शनिवारी आणि मंगळवारी बजरंग बाणाचे पाठ करा, तुम्हाला लवकरच कर्जपासून सुटका मिळेल.
कोणत्याही मंदिरात जाऊन लाल मसुरीच्या दाळीचं दाण करा, तसेच आहारात लाल मसुरीच्या सेवनाचं प्रमाण वाढवा.
ऋणमोचक मंगळ स्त्रोताचं पठण करा, तसेच तुम्ही जर कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते त्याला मंगळवारच्या दिवशी वापस करा यामुळे तुम्हाला कर्जपासून मुक्ती मिळू शकते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)