उन्हाळ्यात व्होल्टेज फ्लक्च्युएशनचा त्रास ? घाबरू नका, टीव्हीसाठी स्टॅबिलायझर आहे ना !

व्ही-गार्ड डिजिटल स्टॅबिलायझरमुळे तुम्हाला व्होल्टेज फ्लक्च्युएशनमुळे टीव्हीच्या होणाऱ्या नुकसानाबद्दल विचार करावा लागणार नाही. LCD, LED आणि 3D टेलिव्हिजन सारख्या तुमच्या महागड्या मनोरंजन गॅझेट्ससाठी संरक्षण गियर निवडताना V-Guard डिजिटल स्टॅबिलायझर हे सर्वोत्तम प्रॉडक्ट आहे.

उन्हाळ्यात व्होल्टेज फ्लक्च्युएशनचा त्रास ? घाबरू नका, टीव्हीसाठी स्टॅबिलायझर आहे ना !
Voltage Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 04, 2024 | 12:54 PM

स्टॅबिलायझर्स हे अत्यावश्यक असले तरी अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. खरंतर आपल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सुरक्षेत स्टॅबिलायझर्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. विशेषत: भारतासारख्या देशात  फ्लक्च्युएशन आणि वीजप्रवाह खंडित होणं ही सामान्य समस्या आहे. अशा ठिकाणी स्टॅबिलायझर्सचा वापर अत्यावश्यक ठरतो. अनेक ग्राहक त्यांच्या टीव्हीसाठी स्टॅबिलायझर्सच्या असलेल्या आवश्यकतेकडे दुर्लक्ष करतात. अस्थिर वीज पुरवठ्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांची कल्पना त्यांना नसते.

व्होल्टेज फ्लक्च्युएशनमुळे येणारी अस्थिरता वाढू शकते आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या,  विशेषत: घरांमधील टेलिव्हिजनच्या दीर्घायुष्यासाठी आणि कार्यक्षमतेसाठी धोका निर्माण करू शकते. योग्य संरक्षण नसेल तर टीव्हीची कार्यक्षमता कमी होणे, जास्त गरम होणे, इन्सुलेशनचे नुकसान आणि कायमस्वरूपी बिघाड होणे असे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि वीज पुरवठा युनिट आणि सर्किट बोर्ड यांसारख्या अंतर्गत घटकांचे नुकसान होऊ शकते. अशा उपकरणांसाठी तयार केलेल्या व्होल्टेज स्टॅबिलायझरमध्ये गुंतवणूक केली, ते इन्स्टॉल केले तर महागड्या उपकरणांना धोका पोहोचण्याची जोखीम कमी होते आणि त्यांचे आयुष्य वाढू शकते.

स्टॅबिलायझरचा मूलभूत उद्देश समजून घेणे हे महत्त्वाचे आहे. फ्लक्च्युएटिंग इनपुट व्होल्टेजमध्ये स्थिर व्होल्टेज आउटपुट राखून, ते बूस्ट रेग्युलेशनची आवश्यक कार्ये करतात. V-guard Crystal TT सिरीज सारखे आधुनिक स्टॅबिलायझर्स हे ॲडव्हान्स्ड (प्रगत) डिजिटल कंट्रोल सर्किट्स किंवा सॉलिड-स्टेट तंत्रज्ञान वापरतात. त्यामुळे इनपुट आणि आउटपुट व्होल्टेज मॉनिटरिंगसाठी अधिक अचूक नियमन आणि युजर-फ्रेंडली LED इंटरफेस देतात.

ऑप्टिमल व्होल्टेज रेग्युलेशन

टीव्हीसाठी असलेला स्टॅबिलायझर हा स्थिर व्होल्टेज पुरवठा मिळेल हे सुनिश्चित करतो , तसेच तुमच्या टीव्हीचे ओव्हरव्होल्टेज किंवा अंडरव्होल्टेज पासूनही संरक्षण करते. एवढंच नव्हे तर हे पॉवर ग्रिड समस्यांमुळे किंवा इलेक्ट्रिकल वायरिंगमधील बिघाडांमुळे अचानक होणाऱ्या पॉवर फ्लक्च्युएशनपासून तुमच्या टीव्हीच्या अंतर्गत सर्किटरीचे प्रभावीपणे संरक्षण करते. सातत्यपूर्ण व्होल्टेज पातळी राखण्यावर लक्ष केंद्रित करून, तुमचा टीव्ही सुरळीतपणे चालेल, योग्य कार्य करेल यावर भर देते. V-Guard ने ग्राहकांना यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

उपकरणांचे आयुष्य वाढतं

तुमच्या टीव्हीसाठी स्टॅबिलायझर वापरल्याने त्याचे आयुष्य लक्षणीयरीत्या वाढते. तुमच्या टीव्हीचे विजेच्या अनियमिततेपासून संरक्षण करते, तसेच पॉवर सप्लाय बोर्ड, मेनबोर्ड आणि डिस्प्ले पॅनल यांसारख्या संवेदनशील घटकांना नुकसान होण्याचा धोकाही कमी करते. तुमचा टीव्ही पुढील काही वर्षांपर्यंत व्यवस्थित चालत राहील हे ( स्टॅबिलायझर) सुनिश्चित करतो. तसेच महागडी दुरूस्ती किंवा अकाली टीव्ही बदलण्याची गरज लागणार नाही, याची काळजी देखील स्टॅबिलायझर  घेतो. त्यामुळे V-Guard सारख्या उत्पादनात एकवेळ गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या टीव्हीचे आयुष्य वाढवू शकता.

टीव्हीसाठी योग्य स्टॅबिलायझर कसा निवडाल?

क्षमता : वेगवेगळ्या आकाराच्या स्मार्ट टीव्हीचे संरक्षण करण्यासाठी व्ही-गार्ड स्टॅबिलायझर्स हे वेगवेगळ्या कॅपॅसिटीनुसार, क्षमतेनुसार  डिझाइन केले आहेत. ते तुमचा सेट-टॉप बॉक्स, होम थिएटर सिस्टम आणि गेमिंग कन्सोलला देखील सपोर्ट करू शकतात.

 व्हिज्युएल इंडिकेटर : तुम्ही क्लिअर व्होल्टेज डिस्प्ले असलेले स्टॅबिलायझर्स शोधू शकता, सहज वाचण्यासाठी त्यामध्ये एलईडी इंडिकेटर्सही असतात. हे तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवर जाणाऱ्या आउटपुट व्होल्टेजचे निरीक्षण करण्याची परवानगी देतात.

माउंटिंग ऑप्शन : भिंतीवर लावण्यायोग्य स्टॅबिलायझर वापरणे हा एक सुरक्षित पर्याय आहे. त्यामुळे त्याचे पाण्यापासून नुकसान होत नाही आणि मुलांचा हातही तिथवर पोहोचू शकत नाही ,त्यामुळे सुरक्षित राहू शकतो.

व्ही-गार्ड डिजिटल स्टॅबिलायझरमुळे तुम्हाला व्होल्टेज फ्लक्च्युएशनमुळे टीव्हीच्या होणाऱ्या नुकसानाबद्दल विचार करावा लागणार नाही. LCD, LED आणि 3D टेलिव्हिजन सारख्या तुमच्या महागड्या मनोरंजन गॅझेट्ससाठी संरक्षण गियर निवडताना V-Guard डिजिटल स्टॅबिलायझर हे सर्वोत्तम प्रॉडक्ट आहे. त्याचा आणखी एक फायदा म्हणजे,  तुम्ही त्या प्रॉडक्टच्या पॅकेजिंग बॉक्सवर दिलेला QR कोड स्कॅन करून अस्सल V-GUARD उत्पादनाची पडताळणी करू शकता.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.