Decoding Cancer : TV9 Digitalची डॉ. दिनेश पेंढारकर यांच्याशी खास बातचीत

आघाडीच्या ऑन्कोलॉजी तज्ज्ञाकडून मौल्यवान माहिती जाणून घेणाऱ्या दर्शकांसाठी व्यापकरित्या TV9 नेटवर्कच्या डिजिटलच्या वेबसाइट्स, CTV आणि YouTube चॅनेलवर ही चर्चा प्रसारित केली जाते.

Decoding Cancer : TV9 Digitalची डॉ. दिनेश पेंढारकर यांच्याशी खास बातचीत
Dr. Dinesh Pendharkar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 6:53 PM

कॅन्सर आज जगातील सर्वात मोठं आव्हान बनला आहे. त्याच्यामुळे नेहमीच भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण असतं. सामान्यपणे ज्ञान सशक्त बनवतं आणि सुरुवातीलाच आजाराची लक्षणे हेरल्यास उपचाराच्या परिणामात सुधारणा होऊ शकते. समाजाला शिक्षित आणि सशक्त करण्याचा भाग म्हणून TV9 डिजिटल कॅन्सरबाबतची जागरुकता निर्माण करण्यासाठी एक विशेष कार्यक्रम राबवत आहे. त्यात 30 वर्षाहून अधिक अनुभव असणारे मेडिकल ऑन्कोलॉजीतील प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध डॉ. दिनेश पेंढारकर हे सहभागी झाले आहेत.

डॉ. दिनेश पेंढारकर हे सध्या फरिदाबाद येथील सर्वोदय रुग्णालयात अस्थि मज्जा प्रत्यारोपण आणि सेल थेरपीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. अॅन्कॉलॉजीचे तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. मात्र, सिकल सेल रोगावर त्यांचा विशेष फोकस असतो. डॉ. दिनेश हे एक अत्याधुनिक NABH-मान्यता प्राप्त प्रत्यारोपण युनिट स्थापन करण्यासाठी आणि राज्य सरकारांच्या घनिष्ठ सहकार्याने, उच्च आजार असलेल्या ग्रामीण आदिवासी भागात व्यापक आरोग्य सेवा उपक्रमांचे नेतृत्व करण्यासाठी ओळखले जातात. सिकलसेल रोगावरील त्यांची असंख्य प्रकाशित लेख या क्षेत्रावरील त्यांची पकड मजबूत करतात.

आगामी कार्यक्रम ज्ञानवर्धक होईल, त्यात खालील महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश केला जाईल :

1) कर्करोग समजून घेणे : विविध प्रकार, प्रक्रिया आणि संबंधित जोखीम घटक शोधणे.

2) प्रारंभिक चिन्हे आणि लक्षणे : कर्करोगाचे प्रमुख संकेतक हायलाइट करणे, पटकन निदान आणि त्वरित वैद्यकीय सल्लामसलत करण्यावर भर देणे.

3) प्रतिबंधाची शक्ती: जीवनशैलीचे पर्याय कर्करोगाच्या जोखमीवर कसे प्रभाव पडतात यावर चर्चा करणे, जोखीम-कमी करण्याची व्यावहारिक धोरणे सादर करणे.

4) स्क्रीनिंगचं महत्त्व : उपलब्ध स्क्रिनिंग कार्यक्रमांच्या बाबत माहिती देणे तसेच प्रारंभिक लक्षणांच्या आधारे उपचारास सुरुवात करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणे.

5) कर्करोगासह जगणे: निदानाच्या भावनिक आव्हानांचं निराकरण करणे आणि रुग्ण आणि कुटुंबांसाठी सहकार्य करण्यासाठी रूपरेषा तयार करणे.

वैद्यकीय दृष्टीकोणाच्या पलिकडे, कार्यक्रमाचा उद्देश दर्शकांना त्यांचे आरोग्याचे नियमित व्यवस्थापन करण्यासाठी उद्युक्त करण्याचा आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम बनवण्याचा आहे. ते कर्करोग आणि त्याचे परिणाम समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संसाधन म्हणून काम करतो.

आघाडीच्या ऑन्कोलॉजी तज्ज्ञाकडून मौल्यवान माहिती जाणून घेणाऱ्या दर्शकांसाठी व्यापकरित्या TV9 नेटवर्कच्या डिजिटलच्या वेबसाइट्स, CTV आणि YouTube चॅनेलवर ही चर्चा प्रसारित केली जाते. ही अनोखी संधी केवळ जागरूकता वाढवत नाही तर प्रेक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांना सक्रिय आरोग्य व्यवस्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देते.

डॉ. दिनेश पेंढारकर यांचे कौशल्य हे सुनिश्चित करते की हा कार्यक्रम प्रेक्षकांना कर्करोगाच्या गुंतागुंतीबद्दल सर्वसमावेशक मार्गदर्शन करेल. हा कार्यक्रम पाहिल्यावर दर्शक आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य आरोग्य सेवा घेण्याचा निर्णय घेण्यासाठी सिद्ध होतील.

लक्षात ठेवा, कर्करोगाविरुद्धच्या लढाईत इनिशिएल स्टेज माहीत होणं अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे उपचार परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होते. तसेच जीव वाचतो. स्वतःला शिक्षित करण्याची आणि निरोगी भविष्यासाठी सक्रिय पावले उचलण्याची ही संधी गमावू नका.

अधिक माहितीसाठी, आताच तुमच्या कॅलेंडवर मार्क करून ठेवा आणि या उद्बोधक चर्चेसाठी TV9 नेटवर्कच्या YouTube चॅनेलवर आमच्यासोबत ज्वॉईन व्हा. एकत्रितपणे कॅन्सरचे रहस्य समजून घेऊ आणि आपल्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी स्वत:ला सशक्त बनवू.

अधिक जानकारी के लिए, अपने कैलेंडर पर निशान लगाएँ और TV9 Network के YouTube चैनल पर इस ज्ञानवर्धक चर्चा में हमारे साथ जुड़ें। आइये, हम सब मिलकर कैंसर के रहस्य को समझें और अपने जीवन में बदलाव लाने वाले ज्ञान से खुद को सशक्त बनाएँ।

पूर्ण भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी डॉ. दिनेश पेंढारकर यांच्याशी संपर्क साधा,

संचालक – अॅन्कॉलॉजी सर्वोदय हॉस्पिटल, सेक्टर -8, फरिदाबाद

अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी, 7840 888 222 वर कॉल करा

Non Stop LIVE Update
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; शाळांना सुट्टी, शिक्षणमंत्री काय म्हणाले
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; शाळांना सुट्टी, शिक्षणमंत्री काय म्हणाले.
मुंबईच्या या दुरावस्थेला प्रशासनच जबाबादार - वडेट्टीवार संतापले
मुंबईच्या या दुरावस्थेला प्रशासनच जबाबादार - वडेट्टीवार संतापले.
मुसळधार पावसाचा फटका, मुंबई मनपा कंट्रोल रुम रात्रीपासून सज्ज
मुसळधार पावसाचा फटका, मुंबई मनपा कंट्रोल रुम रात्रीपासून सज्ज.
दाणादाण करत पावसाचं कमबॅक, लोकल ठप्प; चाकरमान्यांचा प्रचंड त्रागा
दाणादाण करत पावसाचं कमबॅक, लोकल ठप्प; चाकरमान्यांचा प्रचंड त्रागा.
Mumbai Rains Update : मुंबईतील मुसळधार पावसाचा आमदारांनाही फटका
Mumbai Rains Update : मुंबईतील मुसळधार पावसाचा आमदारांनाही फटका.
अजित दादांच्या पत्नीनं लाटल्या वारक-यांसाठी चपात्या, बघा व्हिडीओ
अजित दादांच्या पत्नीनं लाटल्या वारक-यांसाठी चपात्या, बघा व्हिडीओ.
ठाकरेंचा लाडकी बहीणवरून निशाणा, खोतकरांच्या त्या व्हिडीओचा दिला दाखला
ठाकरेंचा लाडकी बहीणवरून निशाणा, खोतकरांच्या त्या व्हिडीओचा दिला दाखला.