Sunfeast तर्फे ‘किंग ऑफ फॅन्टसी’ शाहरुख खान, डार्क फॅन्टसीचा नवा ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषित

'हर दिल की फँटसी'च्या गडद कल्पनेच्या प्रवासावर सनफिस्ट सुरू असताना, शाहरुख खानची मोहकता आणि बिस्किटांची स्वादिष्ट चव ग्राहकांना आकर्षित करेल.

Sunfeast तर्फे 'किंग ऑफ फॅन्टसी' शाहरुख खान, डार्क फॅन्टसीचा नवा ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषित
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 12:32 PM

मुंबई, १४ ऑगस्ट २०२३ : ITC च्या Sunfeast डार्क फॅन्टसीतर्फे नवीन ब्रँड अँबेसेडर म्हणून ‘किंग ऑफ फॅन्टसी’ असलेल्या शाहरुख खानची नियुक्ती करण्यात आली असून या नवीन प्रवासाची सुरुवात करण्यास ते अत्यंत उत्साहात आहेत. आपल्या ग्राहकांशी नाळ जोडण्याच्या उद्दिष्टाने Sunfeast डार्क फॅन्टसीतर्फे ‘Sunfeast डार्क फॅन्टसी – प्रत्येक मनाची फॅन्टसी’ हे नवे ब्रँड कॅप्शन सादर करण्यात आले आहे. आपल्या दैनंदिन आयुष्याला कल्पनाविश्वाचा स्पर्श देण्याच्या सर्वांमध्ये आढळणाऱ्या भावनेतून ही अभिनव संकल्पना आकारास आली आहे. या नव्या दृष्टिकोनातून ब्रँडला विविध प्रकारच्या ग्राहकांसोबत कनेक्ट करायचे आहे. यासाठी कोणत्याही वेळी कल्पनाविश्वात रममाण होण्यासाठी त्यांना उद्युक्त करायचे आहे. लाखो चाहत्यांचे प्रेम लाभलेला शाहरुख खान प्रत्येक भारतीयाच्या फॅन्टसीचे प्रतिनिधित्व करतो. या दोघांमधील सहयोगिता हे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे.

‘किंग ऑफ बॉलीवूड’ आणि ‘किंग ऑफ बिस्किट्स’च्या या सहयोगामुळे या ब्रँडतर्फे एक नवा मापदंड निश्चित करण्यात आला आहे. ‘Sunfeast डार्क फॅन्टसी’ ‘प्रत्येक मनाची फॅन्टसी’च्या प्रवासाची सुरुवात करत असतानाच, शाहरुख खानसोबत आपल्या बिस्किटांचा आस्वाद घेण्यासाठी ग्राहकांना निमंत्रित करत आहे. या नव्या पावलामुळे ब्रँडची नवी ओळख निर्माण होत आहेच, त्याचबरोबर देशभरातील व्यक्तींच्या मनातील फॅन्टसीची संकल्पना एका वेगळ्या उंचीवर जात आहे.

शाहरुख खानसोबत करण्यात आलेल्या या रोमांचक भागीदारीबद्दल ITC फुड्सच्या बिस्किट्स अँड केक्स क्लस्टरचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. अली हॅरिस शेरे म्हणाले, “Sunfeast डार्क फॅन्टसीचा चेहरा म्हणून ‘किंग ऑफ बॉलीवूड’ शाहरुख खानची नियुक्ती करताना आम्ही अत्यंत रोमांचित आहोत. तो अत्यंत लोकप्रिय आहेत, त्याचा करिश्मा, रुबाब आणि ‘लार्जर दॅन लाइफ’ व्यक्तिमत्वामुळे ब्रँडचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तो एक आदर्श पर्याय आहे. या सहयोगामुळे आम्ही ब्रँडचे अस्तित्व वेगळ्या उंचीवर नेऊ आणि ग्राहकांशी असलेली नाळ अजूनच घट्ट करू, अशी आम्हाला खात्री आहे. एकत्रितपणे लोकांना त्यांच्या कल्पनाविश्वाच्या असामान्य प्रवासावर घेऊन जात हा एक संस्मरणीय अनुभव करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

शाहरुख खानच्या चित्रपटांना लाखो लोकांना आनंद दिला आहे. Sunfeast डार्क फॅन्टसीसोबत हातमिळवणी केल्याबद्दलच्या भावना व्यक्त तो म्हणाला, “आम्हा सर्वांनाच खऱ्या अर्थाने आवडणाऱ्या Sunfeast डार्क फॅन्टसी या ब्रँडसोबत सहयोग करताना मी अत्यंत आनंदित आहे. ‘प्रत्येक मनाची फॅन्टसी’ हे ब्रँडचे नवे ब्रीद माझ्या भावना प्रतिबिंबीत करते. कारण यातून लोकांना कल्पना करण्याच्या, कल्पनाविश्वात जाण्याच्या आणि असामान्य जगण्यास प्रोत्साहन मिळते आणि माझा अशा जगण्यावर मनापासून विश्वास आहे. फॅन्टसींची पूर्तता करणाऱ्या उत्कंठावर्धक आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रवासाचा भाग झाल्याचा मला अत्यंत आनंद आहे.”

शाहरूख खान आणि Sunfeast डार्क फॅन्टसी यांच्या रोमांचक सहयोगाबद्दलचा आनंद व्यक्त करताना एफसीबी उल्काचे नॅशनल क्रिएटिव्ह डायरेक्टर श्री रोमी नायर म्हणाले, “प्रत्येक जण कल्पनाविश्वात रममाण होत असतो आणि यातूनच ‘प्रत्येक मनाची फॅन्टसी’ या संकल्पनेचा उगम झाला. सामान्य व्यक्तीने फ्लाइट ऑफ फॅन्टसी घ्यावी आणि तो संस्मरणीय अनुभव घेऊन पुन्हा वास्तव जगात परतावे, यासाठी हे कॅम्पेन उद्युक्त करते. ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी भारताची फॅन्टसी असलेला शाहरुख खान हीच उत्तम निवड असू शकत होती. या कॅम्पेनच्या माध्यमातून शाहरुख खान अशा रुपात दिसणार आहे, ज्यावर आपण कायमच प्रेम करत आलो आहोत. तो कॅम्पेनमधून संपूर्ण भारताला भुरळ घालणार आहे.”

या टीव्हीसीची संकल्पना एफसीबी उल्काची आहे. यात एका सलोनचा वेटिंग एरिया आहे. तिथे बसलेली एक महिला आपला नंबर येण्याची वाट पाहत आहे. वेळ घालविण्यासाठी ती चोको फिल्स कुकीचा आस्वाद घेते आणि तो घास घेतल्यावर तत्काळ ती कल्पनाविश्वात जाते, बॉलिवूड स्टार शाहरुख खान तिथे अवतरतो आणि तिची हेअरस्टाइल करतो, मेकअप करतो आणि नखांचे टेंडिंग करतो. ती तिच्या कल्पनाविश्वातून वास्तव जगात परतते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू असते. आतापर्यंत आपण कल्पनाविश्वात होतो याची जाणीव झाल्यावर आणि तिच्यासोबत असलेली मुलगी गोंधळलेली पाहून ती त्या मुलीला कुकी खायला देते. शाहरुख खानच्या आवाजातील ‘क्रन्ची कुकी में मोल्टन चोको’ या वाक्याने हा अनुभव अधोरेखित होतो. पुढे ‘प्रत्येक मनाची फॅन्टसी’ असे शाहरुख खान म्हणतो आणि कुकीचा पॅक दिसतो आणि या जाहिरातीचा शेवट होतो.

हे कॅम्पेन भारतभर ८ भाषांमध्ये सादर होणार आहे आणि सर्व डिजिटल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि टेलिव्हिजन चॅनल्सवर प्रक्षेपित होणार आहे. हा सर्वसमावेशक भारतभराच्या मीडिया प्लॅनचा एक अविभाज्य भाग असेल.

त्यानंतर, या सहयोगामुळे आणि ब्रँडच्या नव्या प्रपोझिशनसह, Sunfeast डार्क फॅन्टसी कल्पनाविश्व आणि वास्तव यांची सांगड घालणाऱ्या अतुलनीय अनुभव सादर करत आपल्या ग्राहकांच्या मनात कायमस्वरुपी स्थान प्राप्त करण्यास सज्ज झाले आहे.

या उत्कंठा वाढविणाऱ्या वातावरणात ब्रँडने शाहरुख खान असलेला भुरळ पाडणारा टीझर सादर केला आहे. हा टीझर हिंदी, तमिळ आणि इतर अनेक भाषांमध्ये इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सादर करण्यात आला आहे. या धोरणात्मक पावलामुळे लोकांचे याकडे लक्ष गेले आहे आणि याबद्दल सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. या टीझरला सोशल मीडिया चॅनल्सवर भरघोस प्रतिसाद लाभला आहे आणि चाहत्यांनी विविध प्लॅटफॉर्म्सवर हा कंटेन्ट शेअर केल्यामुळे या प्रतिसादात वाढच होत आहे.

For any press query, reach out to : Avian WE: Nilanjan Mandal- nilanjanm@avianwe.com / 9088502687 ITC Limited: Debolina Palit – Debolina.Palit@itc.in

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.