आला उन्हाळा, टीव्ही सांभाळा; व्होल्टेज फ्लक्च्युएशनपासून टीव्ही कसा वाचवाल?

योग्य व्ही-गार्ड स्टॅबिलायझरमध्ये गुंतवणूक करून, तुम्ही तुमच्या टीव्हीला व्होल्टेज फ्लक्च्युएशनच्या हानिकारक प्रभावांपासून वाचवू शकता. स्टॅबिलायझरमुळे तुमच्या महागड्या टीव्हीचे कोणत्याही व्होल्टेज फ्लक्च्युएशपासून रक्षण होते. स्टॅबिलायझर हा मेनलाइन आणि टीव्ही दरम्यान एक संरक्षक भिंत म्हणून कार्य करतो.

आला उन्हाळा, टीव्ही सांभाळा; व्होल्टेज फ्लक्च्युएशनपासून टीव्ही कसा वाचवाल?
VoltageImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 04, 2024 | 1:06 PM

उन्हाळा आला की फक्त गरमी वाढत नाही, तर त्यापासून आराम मिळावा यासाठी पंखे, एसीचा वापरही वाढतो. परिणामी आपल्या वीजबिलातही भरमसाठ वाढ होते. उन्हाळ्याच्या दिवसांत देशभरात वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मागणी वाढली की पुरवठाही वाढवावा लागतो, पण ते दरवेळेस शक्य होतं असं नाही, त्यामुळे मग पॉवरकट होतो आणि बऱ्याच ठिकाणी लाईट जाण्याचा, लोडशेडिंगचा प्रॉब्लेम होतो आणि त्याबरोबच व्होल्टेज फ्लक्च्युएशनचाही सामना करावा लागतो. हे फ्लक्च्युएशन म्हणजे एखादी छोटीशी समस्या वाटू शकते, पण प्रत्यक्षात त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर मोठा ताण पडू शकतो. विशेषत: तुमच्या टीव्हीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते.

वाढत्या वीज वापराचे आव्हान

ऊर्जा मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या उन्हाळ्यात विजेची मागणी 7 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. या वाढीमुळे व्होल्टेजमध्ये होणाऱ्या चढ-उतारांमुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांची हानी होऊ शकते. त्यापासून उपकरणांचे संरक्षण करण्यासाठी ठोस उपाय आखण्याची गरज अधोरेखित होते.

ऊर्जा मंत्रालयाच्या सांगण्यानुसार, या उन्हाळ्यात देशातील पीक पॉवर डिमांड दरवर्षीपेक्षा 7 टक्क्यांनी वाढून 260 GW ( गिगावॉट्स) वर जाण्याचा अंदाज आहे. 2023 च्या उन्हाळ्यात विजेची सर्वोच्च मागणी 229 GW पर्यंत जाण्याचा अंदाज होता, मात्र त्यावर्षी ती 243 वर पोहोचली. यावर्षी (उन्हाळ्यात) सर्वाधिक विजेची मागणी 260GW इतकी अपेक्षित आहे, असे उर्जा मंत्रालयातील सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीचे चेअरपर्सन घनश्याम प्रसाद म्हणाले.

व्होल्टेज फ्लक्च्युएशनमुळे 100 उपकरणांचे नुकसान

2020 सालच्या जानेवारी महिन्यात नाशिकमधील एका बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला. इलेक्ट्रॉनिक उपकरणांना स्थिर वीज पुरवठा करण्याची गरज असल्याचे त्यामुळे समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार, सिडको उत्तम नगर परिसरात अचानक झालेल्या फ्लक्च्युएशनमुळे सुमारे 100 घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान झाले. टेलिव्हिजन, सेट-टॉप बॉक्स, ऑडिओ सिस्टम, मिक्सर ग्राइंडर, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशीन, कॉम्प्युटर आणि अगदी फोटोकॉपीअर यांसारख्या उपकरणांचे नुकसान झाले. “आम्ही टीव्ही पाहत होतो, तेव्हा तो अचानक बंद झाला. पॉवर फेल झाल्यामुळे हे झालं असं मला वाटलं मात्र त्यानंतर तिथून खराब झालेल्या एलईडी बल्बचा दुर्गंधी येत होता. ” असे तेथील रहिवासी संजय पाटील यांनी सांगितलं.

त्याच परिसरातील अनेक उपकरणे खराब झाल्याचे सांगत अनेक शेजाऱ्यांनीही तक्रारी करण्यास सुरुवात केली. पाटील यांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या एलईडी टीव्हीची किंमत सुमारे 49,000 रुपये होती. यापूर्वीच्या अशाच घटनांमध्ये, व्होल्टेज फ्लक्च्युएशनमुळे 57 टीव्ही आणि 23 टीव्ही सेटचे नुकसान झाले होते.

व्होल्टेज फ्लक्च्युएशन म्हणजे काय?

व्होल्टेज फ्लक्च्युएशन म्हणजे काय ते समजून घेऊया. तुमच्या घराला पुरवल्या जाणाऱ्या अल्टरनेटिंग करंट (AC) मध्ये होणारे व्हेरिएशन्स (चढउतार) म्हणजेच व्होल्टेज फ्लक्च्युएशन. हे व्हेरिएशन्स काही काळासाठी असू शकता. पण वीज पुरवठ्याची गंभीर समस्या असेल तर ती एक समस्या बनू शकते. या फ्लक्च्युएशन्समुळे तुमच्या टीव्हीमधील संवेदनशील इलेक्ट्रॉनिक घटकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे टीव्ही पूर्णपणे बिघडू शकतो.

इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा सायलेंट किलर

व्होल्टेज फ्लक्च्युएशन हे खूप कॉमन आहेत मात्र त्यामुळे मॉडर्न इलेक्ट्रॉनिक उपकरणांना मोठा धोका पोहोचू शकतो. आजकालची उपकरणे अधिकाधिक डिजिटल होत आहेत, त्यांना अस्थिर वीज पुरवठ्यामुळे अधिक धोका पोहोचू शकतो. ही फ्लक्च्युएशन्स तुमच्या डिव्हाइसचे आयुष्य लक्षणीयरीत्या कमी करू शकतात.

टीव्हीवर होणारा परिणाम

कमी व्होल्टेजमुळे टीव्ही खराब होऊ शकतो, पण हाय व्होल्टेजमुळे आणखीनच मोठा धोका निर्माण होतो, त्यामुळे उपकरणांचे कायमस्वरूपी नुकसान होते. हे विशेषतः टीव्हीला लागू होते, त्यामुळे व्होल्टेज फ्लक्च्युएशन हे टीव्हीसाठी सर्वाधिक धोकादाय ठरू शकते.

कसे कराल संरक्षण?

सुदैवाने, व्होल्टेज फ्लक्च्युएशनच्या समस्येविरोधात लढा देण्यासाठी आणि तुमच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे, टीव्हीचे संरक्षण करण्यासाठी काही उपाय आहेत. सर्वसमावेशक संरक्षणासाठी, व्होल्टेज स्टॅबिलायझरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करा.

योग्य स्टॅबिलायझर कसा निवडाल?

हे इनकमिंग व्होल्टेज फ्लक्च्युएशनचे सतत निरीक्षण आणि नियमन करते. आणि तुमचा टीव्ही आणि इतर कनेक्टेड उपकरणे यांची कार्यक्षमता, तसेच आयुर्मान वाढावे यासाठी त्यांना स्थिर व्होल्टेज रेंज मिळेल याची हे स्टॅबिलायझर काळजी घेतं.

V-Guard का?

V-Guard, हा 47 वर्षांहून अधिक काळ असलेला अग्रगण्य भारतीय स्टॅबिलायझर ब्रँड असून तो ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करणाऱ्या स्टेबिलायझर्सची व्यापक श्रेणी ऑफर करतो. गुणवत्ता नियंत्रणासह इन-हाऊस मॅन्युफॅक्चरिंगसाठी कटिबद्ध असल्याने हा ब्रँड सातत्यपूर्ण कामगिरी आणि विश्वासार्हता सुनिश्चित करतो. संशोधन आणि विकासाप्रती असलेल्या समर्पणामुळे व्ही-गार्ड हा ब्रँड इतरांच्या तुलनेत नेहमी अग्रस्थानी असतो.यामुळे ग्राहकांच्या गरजा आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या सतत बदलत्या जगासाठी नवनवीन कार्य करत राहण्यात ब्रँडला मदत होते.

योग्य व्ही-गार्ड स्टॅबिलायझरमध्ये गुंतवणूक करून, तुम्ही तुमच्या टीव्हीला व्होल्टेज फ्लक्च्युएशनच्या हानिकारक प्रभावांपासून वाचवू शकता. स्टॅबिलायझरमुळे तुमच्या महागड्या टीव्हीचे कोणत्याही व्होल्टेज फ्लक्च्युएशपासून रक्षण होते. स्टॅबिलायझर हा मेनलाइन आणि टीव्ही दरम्यान एक संरक्षक भिंत म्हणून कार्य करतो आणि टीव्हीचे नुकसान होण्यापासून वाचवतो. टीव्हीला सतत, योग्य वीजपुरवठा होत असेल तर त्याचे कार्य सर्वोत्तम होते. म्हणून स्टॅबिलायझर वापरणे हा एक उत्तम पर्याय ठरतो. आणि सर्वोत्तम कामगिरीसाठी व्ही-गार्ड हे विश्वसनीय नाव आहे. स्टॅबिलायझर्स हे विद्युत उपकरणाचे आयुष्य वाढवण्यास मदत करतात.

Non Stop LIVE Update
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय.
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना...
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना....
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी.
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत.
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी....
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी.....
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.