IPL मध्ये 8 ऐवजी 10 संघ खेळणार, BCCI च्या वार्षिक बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) गुरुवारी अहमदाबाद येथे वार्षिक सर्वसाधारण बैठक (AGM) होणार आहे.

IPL मध्ये 8 ऐवजी 10 संघ खेळणार, BCCI च्या वार्षिक बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 11:46 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) गुरुवारी अहमदाबाद येथे वार्षिक सर्वसाधारण बैठक (AGM) होणार आहे. या बैठकीत इंडियन प्रिमियर लीगमध्ये 10 संघांना मान्यता दिली जाऊ शकते. परंतु हा बदल 2021 (IPL14) ऐवजी 2022 सालच्या आयपीएलमध्ये (IPL15) केला जाऊ शकतो. अहमदाबाद येथे होणाऱ्या बीसीसीआयच्या बैठकीत आयपीएलमधील नव्या फ्रेंचायजींच्या सहभागाचा मुद्दा सर्वात प्रमुख असेल. (10 teams to replace eight in IPL, BCCI may decide it in annual meeting)

अनेक तज्ज्ञांचं मत आहे की, आयपीएलमध्ये 9 किंवा 10 संघांचा समावेश करणं चांगलंच असेल, परंतु हा बदल 2021 च्या आयपीएलमध्ये केला तर ती घाई ठरेल. त्याऐवजी 2022 च्या आयपीएलमध्ये हा बदल केला तर नियोजनाच्या दृष्टीकोनातून तो योग्य निर्णय ठरेल. आयपीएलची पुढील स्पर्धा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशात नव्या संघाला संघबांधणी करायला पुरेसा वेळ मिळणार नाही.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “या प्रकरणात बर्‍याच मार्गांवर चर्चा होणे आवश्यक आहे. एप्रिलमध्ये आयपीएल सुरु होण्यापूर्वी लिलावासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. अशात 2021 च्या स्पर्धेत नवे संघ समाविष्ट करणं अवघड आहे.’’

“नव्या संघांसाठी निविदा मागवाव्या लागतील तसेच नवी लिलाव प्रक्रिया तयार करावी लागेल. जानेवारी अखेरपर्यंत किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला लिलाव प्रक्रिया पार पडली आणि त्यात दोन संघांनी बाजी मारली तर त्यांना खेळाडूंच्या लिलावात सहभागी होता येईल, त्यासाठीची रणनीति आखायला वेळ मिळेल. त्यामुळे आयपीएलमध्ये नव्या संघांचा समावेश 2022 च्या मोसमातच होऊ शकतो.”

“आयपीएलमध्ये 10 संघांचा समावेश करण्यात आला तर स्पर्धेत 94 सामने खेळवावे लागतील. त्यासाठी किमान अडिच महिन्यांचा अवधी हवा आहे. केवळ आयपीएलसाठी अडिच महिन्यांचा कालावधी लागला तर आंतरराष्ट्रिय क्रिकेट कॅलेंडर गडबडेल.”

कोरोनामुळे लिलावाच्या कार्यक्रमात बदल?

दरवेळेस आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात खेळाडूंचा लिलाव करण्यात येतो. यामध्ये अनेक संघ खेळाडूंसाठी मोठी रक्कम मोजून आपल्या ताफ्यात त्यांना समाविष्ट करुन घेतात. मात्र आगामी आयपीएल स्पर्धेसाठीचा ऑक्शन कार्यक्रम महिन्याभराच्या विलंबाने होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनुसार मिळाली आहे.

आयपीएलमध्ये नवे संघ जोडले जाण्याची शक्यता असल्याने आयपीएलच्या इतर नियमांमध्ये बदल अपेक्षित असतील. यामध्ये साखळी फेरीतील संघाच्या सामन्यांची संख्या यांसारख्या बाबींमध्ये बदल होऊ शकतो. यासर्व बाबींमुळे बीसीसीआय लिलावाचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे सविस्तररित्या घेण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे लिलावाचा कार्यक्रम पुढील जानेवारी महिन्यात पार पडेल, अशी चर्चा आहे.

प्लेईंग इलेव्हनमध्ये 4 ऐवजी 5 परदेशी खेळाडू

आयपीएलमध्ये सध्या अंतिम 11 जणांच्या संघात केवळ 4 परदेशी खेळाडूंचा समावेश करता येतो. हा नियम स्पर्धेच्या सुरुवातीपासून कायम आहे. परंतु यामध्ये बदल करण्याबाबत विचार सुरु आहे. अंतिम 11 जणांच्या संघात जास्तीत जास्त 5 परदेशी खेळाडूंचा समावेश करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. असं म्हटलं जातंय की, याचा संघाच्या गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम होईल. अद्याप याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

आयपीएल 2021 भारतात?

“येत्या जानेवारी-मार्च पर्यंत कोरोनावरी लस उपलब्ध होईल, अशी आशा करुयात. असे झाल्यास नक्कीच आयपीएलच्या 14 व्या मोसमाचे आयोजन भारतात केले जाईल, असे बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली महिनाभरापूर्वी म्हणाला होता. “तसेच जर कोरोनावर लस सापडली नाही, तर आपल्यासमोर स्पर्धेसाठी यूएईचा पर्याय आहेच”, असंही सौरवने नमूद केलं होतं.

संबंधित बातम्या

IPL मधील संघांची संख्या वाढवण्याच्या BCCI च्या योजनेला राहुल द्रविडचं समर्थन; सांगितलं ‘कारण’

IPL | 13 वर्षात मुंबईने पाचव्यांदा किताब जिंकला, ‘हे’ तीन संघ मात्र अजूनही विजेतेपदापासून दूर

(10 teams to replace eight in IPL, BCCI may decide it in annual meeting)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.