IND vs SA : 6 वर्षात टीम इंडियाच बदलली, ‘या’ 9 खेळाडूंच T20 करियर संपलं!
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये T20 सीरीजमधला शेवटचा सामना आज जोहान्सबर्ग येथे होणार आहे. टीम इंडियाने या मैदानात शेवटचा T20 सामना 2018 मध्ये खेळला होता. आज 6 वर्षानंतर टीम इंडियाच चित्र पूर्णपणे पालटलय. त्यावेळच्या टीममधील 11 पैकी 9 खेळाडू आता बाहेर गेलेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये चार T20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या सीरीजमधला शेवटचा सामना आज 15 नोव्हेंबरला होत आहे. आतापर्यंत तीन सामने झालेत. टीम इंडिया सीरीजमध्ये दोन सामने जिंकून 2-1 ने आघाडीवर आहे. आता सीरीजमधला चौथा आणि अंतिम सामना 15 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. जोहान्सबर्ग येथे ही मॅच होईल. या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिकेत शेवटचा सामना फेब्रुवारी 2018 मध्ये खेळला गेला होता. भारतीय टीम आता 6 वर्षांनी या मैदानात T20 सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. या 6 वर्षात पूर्ण टीम इंडिया बदलली आहे. जोहान्सबर्गच्या मैदानात अखेरचा सामना खेळणाऱ्या टीम इंडियातील 11 पैकी 9 खेळाडूंच T20 करियर जवळपास संपुष्टात आलं आहे. काहींनी निवृत्ती घेतली आहे. काही खेळाडूंच्या पुनरागमनाची शक्यता मावळून गेलीय.
भारतीय टीम जोहान्सबर्गमध्ये 6 वर्षानंतर T20 मॅच खेळण्यासाठी आली आहे. 2018 मध्ये टीम इंडिया येथे खेळली, त्यावेळी विराट कोहली कॅप्टन होता. या सामन्यात रोहित शर्मा, शिखर धवनने ओपनिंग केली होती. सुरेश रैना 3 नंबरवर आणि विराट कोहली 4 नंबरवर बॅटिंगसाठी आलेला. मनीष पांडे, एमएस धोनी आणि हार्दिक पंड्याने मधल्या फळीत फलंदाजी केली होती. दुसऱ्याबाजूला भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह आणि यजुवेंद्र चहल यांनी गोलंदाजीची जबाबदारी संभाळलेली. यात 11 पैकी 9 खेळाडूंच T20 करियर संपल्यात जमा आहे. फक्त पांड्या आणि बुमराह अजून टीमचा भाग आहेत. सचिन तेंडुलकरने आपल्या करियरमधील एकमेव T20 सामना याच जोहान्सबर्गमध्ये खेळला होता.
रिटायरमेंटची घोषणा कोणी-कोणी केलीय?
धोनी, रैना, रोहित, विराट आणि धवनने रिटायरमेंटची घोषणा केली आहे. उरलेल्या खेळाडूंना अजूनही पुनरागमनाची अपेक्षा आहे. टीम मॅनेजमेंट सतत युवा चेहऱ्यांना संधी देत आहे. त्यामुळे मनीष, भुवनेश्वर, उनाडट आणि चहल पुन्हा T20 टीममध्ये दिसण्याची शक्यता कमी आहे.
2018 मध्ये IND vs SA सामना कोणी जिंकलेला?
2018 मध्ये जोहान्सबर्गच्या मैदानात खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 28 धावांनी विजय मिळवला होता. पहिली बॅटिंग करताना टीम इंडियाने 5 विकेट गमावून 203 धावांचा डोंगर उभारलेला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या टीमला 175 धावाच करत आलेल्या.