Video : वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीबाबत तो प्रश्न विचारताच रोहित शर्मा हैराण, दिलं असं उत्तर की बोलती बंद
ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पूर्वसंध्येला दहा संघाचे कर्णधार पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे गेले. यावेळी प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. तसेच कर्णधार रोहित शर्मा याला विचित्र प्रश्न विचारल्यानंतर त्याने पत्रकराची बोलती बंद केली.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेला अवघ्या काही तासात सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघात होणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात गेल्या वर्ल्डकप स्पर्धेत रंगतदार सामना झाला होता. चौकाराच्या आधारावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या पूर्वसंध्येला सहभागी असलेल्या दहा संघांच्या कर्णधारांनी पत्रकार परिषदेला सामोरे गेले. यावेळी प्रत्येक संघाच्या कर्णधारांनी आपल्या संघाची जमेची बाजू मांडली. तसेच जेतेपदासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. कर्णधार रोहित शर्मा यानेही टीम इंडियाची जमेची बाजू सांगितलं. पण या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा याला विचित्र प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याला पहिल्यांदा काही कळलंच नाही. त्यानंतर उत्तर देत त्याने पत्रकाराची बोलती बंद केली.
रोहित शर्माला कोणता प्रश्न विचारला?
वनडे वर्ल्डकप 2019 स्पर्धेतील अंतिम फेरीत इंग्लंडला घोषित करण्यात आलं होतं. सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हर झाली.मात्र यातही बरोबरी झाल्याने चौकारांच्या आधारावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. याच मुद्द्यावर पत्रकाराने रोहित शर्मा याला प्रश्न विचारला आणि त्याचं काय मत आहे, असं विचारलं. पहिल्यांदा रोहित शर्मा याला आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर त्याने डोक्यावर हात मारला आणि पत्रकाराची बोलती बंद केली.
modi ji.. rohit sharma saab ko permanent press conf spokesman ghoshit kiya jaye 😹 pic.twitter.com/fYgZhWqzVu
— Arun Lol (@dhaikilokatweet) October 4, 2023
कर्णधार रोहित शर्मा याने हसत सांगितलं की, ‘हे घोषित करणं माझं काम नाही.’ रोहित शर्मा याच्या उत्तरानंतर पत्रकार गप्पच बसला. तसेच उपस्थित लोकं हसू लागले. इतकंच काय तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने इंग्लंडच्या कर्णधाराला रोहित शर्मा याने काय उत्तर दिलं याचं इंग्रजीत भाषांतर करून सांगितलं.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या लढतीत दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. नुकतीच पार पडलेली मालिका भारताने जिंकल्याने आत्मविश्वास दुणावलेला आहे. भारत ऑस्ट्रेलिया यापैकी कोणता संघ सामना जिंकेल त्याचा पुढचा प्रवास सुलभ होणार आहे.
वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.