Asia Cup: एशिया कपसाठी 15 जणांच्या भारतीय क्रिकेट टीमची घोषणा, विराट परतला, बुमराह दुखापतीमुळे बाहेर
टीम इंडियाचा सध्याचा सर्वात चांगला बॉलर जसप्रीत बुमराह एशिया कपमध्ये सहभागी नसेल. पाठीच्या दुखापतीमुळे तो या टुर्नामेंटमध्ये खेळू शकणार नाही अशी माहिती आहे. त्याची सध्याची दुखापत पाहता त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई – एशिया कपसाठी (Asia Cup) 15 सदस्यीय टीम इंडियाच्या (Team India)नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात कॅप्टन्सी रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे देण्यात आली आहे. तर व्हाईस कॅप्टनपदी के एल राहुल याच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. टीममध्ये रोहित शर्मा, के एल राहुल, विराच कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह आणि आवेश खान यांचा समावेश करण्यात आला आहे. ही टुर्नामेंट 27 ऑगस्टपासून होणार आहे.
?#TeamIndia squad for Asia Cup 2022 – Rohit Sharma (Capt ), KL Rahul (VC), Virat Kohli, Suryakumar Yadav, Deepak Hooda, R Pant (wk), Dinesh Karthik (wk), Hardik Pandya, R Jadeja, R Ashwin, Y Chahal, R Bishnoi, Bhuvneshwar Kumar, Arshdeep Singh, Avesh Khan.
हे सुद्धा वाचा— BCCI (@BCCI) August 8, 2022
जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर
टीम इंडियाचा सध्याचा सर्वात चांगला बॉलर जसप्रीत बुमराह एशिया कपमध्ये सहभागी नसेल. पाठीच्या दुखापतीमुळे तो या टुर्नामेंटमध्ये खेळू शकणार नाही अशी माहिती आहे. त्याची सध्याची दुखापत पाहता त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टी-20 वर्ल्डकपसाठी त्याला आधी विश्रांती देण्यात आली असण्याची शक्यता आहे.
Notes – Jasprit Bumrah and Harshal Patel were not available for selection owing to injuries. They are currently undergoing rehab at the NCA in Bengaluru.
Three players – Shreyas Iyer, Axar Patel and Deepak Chahar have been named as standbys.
— BCCI (@BCCI) August 8, 2022
हर्षल पटेलही बाहेर
हर्ष पटेलही दुखापतीमुळे एशिया कपसाठी टीममध्ये समाविष्ट नसेल असे बीसीसीआयने सांगितले आहे. तर श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर या तीन प्लेअर्सची नावे स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आलेली आहेत, अशी माहिती बीसीसीआयने ट्विट करुन दिलेली आहे.
टीम इंडिया सात वेळा चॅम्पियन
टीम इंडियाने आत्तापर्यंत या टुर्नामेंटमध्ये 13 पैकी सात वेळा चॅम्पियन राहिलेली आहे. यासह तीन वेळा ती फायनला जाऊन जिंकू शकलेली नाही. यात दुसऱ्या स्थानावर श्रीलंका आहे. श्रीलंका पाचवेळा चॅम्पियन राहिलेली आहे आणि सहा वेळा रनर अप राहिलेली आहे.
पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानशी सामना
टी-20 वर्ल्डकपमध्ये पहिल्याच मॅचमध्ये झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी या एशषिया कपमध्ये टीम इंडियाला मिळणार आहे. 28 ऑगस्टला टीम इंडियाचा पहिला मुकाबला पाकिस्तानशी असणार आहे. यावेळी एशिया कपचे यजमानपद श्रीलंकन क्रिकेट बोर्ड करते आहे. श्रीलंकेत असलेल्या आर्थिक संकटांमुळे पहिल्यांदा एशिया कपच्या मॅचेस या दुबईत होतील अशी चर्चा होती. 21ऑग्सटपासून क्वालिफायर मॅचेस सुरु होणार आहेत. यात दुबई, ओमान, नेपाळ, हाँगकाँगसहित इतर टीम असणार आहेत.