Kedar Jadhav : चेन्नईच्या निराशाजनक कामगिरीनंतर समर्थकांची तंबी, केदार जाधवला संघाबाहेर काढा अन्यथा……
कोलकाता विरुद्धच्या पराभवासाठी केदारला जबाबदार धरले जात आहे. (CSK Kedar Jadhav Trolls On Social Media)
अबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 21 वा सामना कोलकाता नाईट्स रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जस (Chennai Super Kings) यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात कोलकाताने चेन्नईचा 10 धावांनी पराभव केला. कोलकाता विरुद्ध पराभूत झाल्यानंतर फलंदाज केदार जाधवला (Kedar Jadhav) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. निर्णायक क्षणी केदार जाधवने संथ खेळी केली. परिणामी चेन्नईचा पराभव झाला. त्यामुळे केदारला संघाबाहेर काढा, अन्यथा आम्ही चेन्नईला समर्थन देणं बदं करु. तसेच चेन्नईचे सामनेही पाहणार नाही, अशी तंबीच नेटीझन्सनी दिली आहे. (CSK Kedar Jadhav trolls on social media)
#kedarjadhavDROP KEDAR JADHAVI WILL NOT SUPPORT CSK ANYMORE IF THEY STILL GO WITH #kedarjadhavWorst player ever cricket has seenHe has done nothing for csk except csk comeback matchPlz drop him@virendersehwag @IPL @ChennaiIPL #kedarjadhav@cricketaakash @bhogleharshaDrop.
— Rahul (@rahulthakur180) October 3, 2020
कोलकाता विरुद्धच्या पराभवासाठी केदारला जबाबदार धरले जात आहे. चेन्नईला विजयासाठी 21 चेंडूत 39 धावांची गरज होती. मात्र यादरम्यान केदारने अतिशय संथ खेळी केली. गरजेच्या वेळेस केदारला एकेरी धावही काढता आली नाही. परिणामी नॉन स्ट्राईक एंडवर असलेला सॅम करनवर दबाव निर्माण झाला. या दबावामुळे सॅम बाद झाला.
*Seeing Kedar Jadhav Alone*
Le Angry CSK fans be like:- pic.twitter.com/qbere0PNWA
— Rachit Maheshwari (@RachitNawal) October 7, 2020
I am biggest @ChennaiIPL fan… But I am not gonna watch single @ChennaiIPL #IPL match today onwards untill they drop #kedarjadhav @JadhavKedar what is your role first in csk last 15 innings you scored only one 30+ run and playing in same team without shame..Come back India
— Sk_earaga (@Earaga_sk) October 3, 2020
केदारने पहिल्या 5 चेंडूत एकही धावा काढली नाही. केदारने केवळ 12 चेंडूत 7 धावाच केल्या. त्यामुळे नेटीझन्सकडून केदारच्या फलंदाजीवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
केदारची अयशस्वी कामगिरी
केदारने यंदाच्या मोसमात चेन्नईकडून 6 सामने खेळले आहेत. या 6 सामन्यात त्याने केवळ 58 धावाच केल्या आहेत. म्हणजेच केदारला 100 च्या स्ट्राईक रेटने खेळता आले नाही.
#KKRvCSK *After watching Kedar Jadhav's performance in every match*Csk fans to Jadhav: pic.twitter.com/4jIZGJniQp
— Shivani (@meme_ki_diwani) October 7, 2020
केदारची आयपीएल कारकिर्द
केदार 2010 पासून आयपीएलमध्ये खेळतोय. तेव्हापासून ते आतापर्यंत केदारने एकूण 85 सामने खेळले आहेत. यात त्याने 124.67 च्या स्ट्राईक रेटने आणि 4 अर्धशतकांच्या मदतीने 1 हजार 137 धावा केल्या आहेत. 69 नाबाद ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.
धोनीही अपयशी
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आयपीएलच्या या मोसमात अपयशी ठरला आहे. त्याला या मोसमात चांगली खेळी करता आली नाही. त्यामुळे नेटीझन्सकडून त्याच्या खेळीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. धोनी बेस्ट फिनीशर म्हणून ओळखला जातो. मात्र त्याचा फॉर्म कुठे हरवलाय, अशी चिंताही त्याच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2020 : ‘या’ कारणांमुळे Rajasthan Royals ची पिछेहाट; कर्णधार स्मिथचं स्पष्टीकरण
(CSK Kedar Jadhav trolls on social media)