Vinesh Phogat disqualified : मोठी बातमी, विनेश फोगाट रुग्णालयात दाखल, पॅरिसमध्ये काय घडतय?
Vinesh Phogat disqualified : विनेश फोगाटला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विनेश फोगाटला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. हा तिच्याबरोबरीने सगळ्या भारतासाठी मोठा धक्का आहे. विनेश फोगाटने पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 50 किलो वजनी गटातून फायनल गाठली होती. फायनलमध्ये खेळणारी ती भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली असती.
भारताची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिचा आज फायनलचा सामना होता. मात्र, त्याआधी विनेश फायनलसाठी अपात्र ठरल्याची दुर्देवी बातमी मिळाली. विनेश 50 किलो वजनी गटात खेळत होती. विनेशने काल जपानच्या युई सुसाकी, युक्रेनच्या ओकसाना लिवाच आणि गुजमॅन लोपेजला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला होता. विनेशचा फॉर्म खूपच जबरदस्त होता. ती आज नक्की फायनल जिंकणार असा विश्वास होता. पण त्याआधी मर्यादेपेक्षा जास्त वजन भरल्यामुळे तिला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं.
या बातमीने सगळ्या देशाच मन मोडलं. विनेशलाही याच खूप दु:ख झालं आहे. विनेश बेशुद्ध झाली आहे. तिला पॅरिसच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे विनेश बेशुद्ध झाली. तिच्यावर पॅरिसमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिला IV फ्लूइड देण्याचा सल्ला दिलाय. विनेशने तिचं वजन कमी करण्यासाठी रात्रभर बरीच मेहनत केली. त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊन ती बेशुद्ध झाली. विनेश 50 किलो वजनी गटात खेळत होती. पण काल रात्री तिचं वजन 52 किलो होतं.
“You are champion among champions,” PM Narendra Modi consoles Vinesh Phogat after her disqualification ahead of Gold medal bout Read @ANI Story | https://t.co/RWa24i5crd#vineshphogat #ParisOlympics2024 #pmmodi pic.twitter.com/mIuj7hyH2U
— ANI Digital (@ani_digital) August 7, 2024
तिने रक्त सुद्धा काढलं
वजन जास्त झाल्यानंतर ते कमी करण्यासाठी तिने सर्व प्रयत्न केले. तिने जॉगिंग, स्किपिंग सर्वकाही केलं. रात्रभर सायकल चालवली. पण केवळ 100 ग्रॅम वजनामुळे तिचं मेडल जिंकण्याचं स्वप्न भंग पावलं. 2 किलो वजन कमी करण्यासाठी तिने रक्त सुद्धा काढलं. तिने आपले केस, नख कापली. सर्वकाही केलं. मात्र, तरीही तिच वजन 150 ग्रॅमने जास्त होतं.