Virat Kohli : ‘किंग संपला’, ऑस्ट्रेलियात विराट कोहलीबद्दल सर्वात मोठं वादग्रस्त वक्तव्य
Virat Kohli : विराट कोहलीचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खराब फॉर्म कायम आहे. त्याच्याबद्दल एका ऑस्ट्रेलियन दिग्गजाने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. विराट विषयी 'किंग संपला' हे बोलतानाच टीम इंडियातील दुसऱ्या एका खेळाडूला त्याने किंगची उपाधी दिली आहे.
भारतीय क्रिकेट टीमचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीसाठी यंदाचा ऑस्ट्रेलिया दौरा वाईट स्वप्नासारखा ठरला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये चार सामन्यात विराटच्या बॅटमधून फक्त एक शतक निघालं आहे. त्याशिवाय एकही मोठी इनिंग त्याला खेळता आलेली नाही. मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या डावात टीम इंडिया 340 धावांचा पाठलाग करताना विराटची बॅट अजिबात चालली नाही. तो स्वस्तात बाद झाला. त्यानंतर कॉमेंट्री करणारा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सायमन कॅटिचने विराट कोहलीबद्दल एक मोठं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्याने ‘किंग संपला’ असं म्हटलं आहे. विराटला क्रिकेट विश्वात किंग कोहली म्हटलं जातं.
IPL मध्ये विराट आणि कॅटिच एकाच टीममध्ये होते. सायमन कॅटिच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा हेड कोच होता. सायमन कॅटिचने विराट बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचवेळी भारताचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहच कौतुक केलं. विराटची किंगची उपाधी आता बुमराहने मिळवली आहे, असं कॅटिच म्हणाला. विराट बाद झाल्यानंतर इंग्लिश कॉमेंट्री पॅनलमध्ये बसलेल्या कॅटिचने किंग संपला असं वक्तव्य केलं. “किंग विराटची गती मंदावली आहे. किंग बुमराहने जबाबदारी उचलली आहे. कोहली स्वत:वर निराश आहे. त्याला मोठी इनिंग खेळायची होती. पण तो आऊट झाला” असं कॅटिच म्हणाला.
विराटच्या जागी कोणाला दिली किंगची उपाधी?
सायमन स्पष्टपणे म्हणाला, क्रिकेटमध्ये किंगचा दर्जा आता बुमराहकडे जातोय. मेलबर्न टेस्टच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्याडावात बुमराहने जेव्हा ट्रेविस हेडला आऊट केलं, त्यावेळी कॅटिच त्याला किंग म्हणाला. हेडचा विकेट पडल्यानंतर सायमन म्हणाला की, ‘हे अधिकृत आहे. बुमराह किंग आहे’
🗣️ “Starc has the big fish and that is disastrous for India.” – @tommorris32
🗣️ “The king is dead. He trudges off.” – Simon Katich
Virat Kohli throws his wicket away right before lunch 🤯#AUSvIND 🏏 | @NufarmAustralia pic.twitter.com/Rmsz1f2NHa
— SEN Cricket (@SEN_Cricket) December 30, 2024
बुमराहच्या ऑस्ट्रेलियातील प्रदर्शनावर एक नजर
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमराहच शानदार प्रदर्शन कायम आहे. चार मॅचच्या आठ इनिंगमध्ये बुमराहने एकूण 30 विकेट घेतले आहेत. बुमराह या क्षणाचा नंबर वन टेस्ट बॉलर आहे. या वर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 71 विकेट त्याच्या नावावर आहेत. दुसऱ्याबाजूला कोहलीने फक्त एक शतक झळकावलं आहे. त्याशिवाय तो पूर्णपणे फ्लॉप आहे. चार मॅचच्या सात इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून फक्त 167 धावा निघाल्या आहेत.