World Cup 2023 | 1983 वर्ल्डकप जिंकल्यानंतर एक लाख देणेही अवघड, आता खेळाडूंना ‘छप्परफाड के’ रक्कम मिळणार

IND vs AUS Final : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज अहमदाबादमध्ये रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवल्यास खेळाडूंना 'छप्परफाड के' रक्कम मिळणार आहे. यापूर्वी 1983, 2011 मध्ये भारतीय खेळाडूंना किती रक्कम मिळाली होती, ते पाहा...

World Cup 2023 | 1983 वर्ल्डकप जिंकल्यानंतर एक लाख देणेही अवघड, आता खेळाडूंना 'छप्परफाड के' रक्कम मिळणार
team-india-world-cup-2023[1]
Follow us
| Updated on: Nov 19, 2023 | 8:56 AM

अहमदाबाद, दि. 19 नोव्हेंबर | वनडे वर्ल्ड कप 2023 अंतिम सामन्याची क्रिकेटप्रेमींना अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. आज अहमदाबामधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्याकडे सर्वच क्रिकेटप्रेमींचे डोळे लागले आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवल्यास खेळाडूंना भरभरुन रक्कम मिळणार आहे. अगदी ‘छप्परफाड के’ रक्कम मिळणार आहे. परंतु यापूर्वी 1983 मध्ये अशी परिस्थिती नव्हती. 1983 मध्ये कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विजय मिळवला. त्यावेळी खेळाडूंना एक-एक लाख रुपये देण्यासाठी लता मंगेशकर यांचा कार्यक्रम घ्यावा लागला होता.

1983 च्या संघातील यष्टीरक्षक सय्यद किरमानी याने एका मुलाखतीत म्हटले होती की, आम्हाला दैनंदिन भत्ता रोज 50 पाउंड मिळत होता. ही रक्कम दुपारचे आणि रात्रीचे जेवण आणि कपडे धुण्यासाठी वापरत होतो. संपूर्ण दौऱ्यात बोनस म्हणून 15,000 मिळाले होते. ही रक्कम विश्वकरंडक जिंकून भारतात आल्यानंतर मिळाली.

2011 मध्ये बदलली परिस्थिती

2011 मध्ये महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वाखाली टीमने वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळी भारतीय खेळाडूंवर बक्षिसांचा पाऊस पाडला गेला. विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूस दोन-दोन कोटी रुपये बीसीसीआयने दिले. तसेच विविध राज्य सरकारकडून बक्षिसांची खैरात वाटली गेली. अनेक कंपन्यांनी खेळाडूंना पुरस्कार दिले. 2011 मध्ये वर्ल्डकपमधील प्राइज मनी 66 कोटी होती. त्यातील 25 कोटी विजेत्या संघाला भारताला दिले गेले. उपविजेत्या श्रीलंका संघाला 12 कोटी दिले.

हे सुद्धा वाचा

2023 मध्ये मिळणार 33 कोटी

2023 मध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला 33 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघाला आर्धी रक्कम मिळणार आहे. बीसीसीआयकडून खेळाडूंना देण्यात येणाऱ्या रक्कमेची घोषणा नंतर होणार आहे. 1983 मध्ये लता मंगेशकर यांनी भारतीय संघासाठी केलेल्या कार्यक्रमानंतर बीसीसीआयने प्रत्येक सामन्यात एक जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवली होती. लता दीदींनी भारतीय टीमसाठी दिलेल्या योगदानाची परतफेड करण्याचा हा छोटा प्रयत्न होता. त्यावेळी लतात दीदी यांनी गायलेल्या गाण्याची चांगली चर्चा झाली. या कार्यक्रमातून 20 लाख रुपयांची कमाई झाली होती.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.