विजयाचे अश्रू गोड, मॅच जिंकल्यानंतर अजिंक्यची पहिली प्रतिक्रिया
"आजच्या आनंदाच्या अश्रूंची चव एकदमच गोड होती. फार भारी वाटलं. मला कळत नव्हतं, मी स्वत:ला कसं कंट्रोल करावं", अशी प्रतिक्रिया कर्णधार अजिंक्य रहाणे याने दिली Ajinkya Rahane first reaction on team India win series in Australia

मुंबई : “आजच्या आनंदाच्या अश्रूंची चव एकदमच गोड होती. फार भारी वाटलं. मला कळत नव्हतं, मी स्वत:ला कसं कंट्रोल करावं. याशिवाय अजूनही काय झालंय हे मला अद्यापही कळत नाहीय. मला वाटतं त्यासाठी थोडा वेळ लागेल. सगळ्यांनीच खूप चांगलं काम केलं. विशेषत: या सामन्यात नव्या खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली”, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचा हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणे याने दिली. ज्येष्ठ पत्रकार सुंनदन लेले यांनी ट्विटरवर रहणे आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मुलाखतीचा एक छोटासा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अजिंक्य रहाणे आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे (Ajinkya Rahane first reaction on team India win series in Australia).
भारतीय क्रिकेट संघाने आज ऐतिहासिक कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यात 3 विकेट्सने विजय मिळवत टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर मालिकाही जिंकली आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाने हा विजय मिळवला. या विजयानंतर पत्रकार सुंनदन लेले यांनी त्यांच्यासोबत ऑनलाईन बातचित केली. यावेळी अजिंक्यने खुल्या मनाने प्रतिक्रिया दिली.
“या सामन्यातून वॉशिंग्टन आणि नटराज यांचा टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू झाला. शार्दूलची दुसरी मॅच होती. सिराज आणि सैनीची दुसरी-तिसरी मॅच होती. ज्याप्रकारे त्यांनी करुन दाखवलं, मी त्यांच्यासाठी खूप खूश आहे”, असं अजिंक्य रहाणे म्हणाला (Ajinkya Rahane first reaction on team India win series in Australia).
“आपल्या देशासाठी आपल्याला मॅच जिंकवायची आहे, त्यासाठी 50 ते 60 टेस्ट मॅचचा अनुभव असणं जरुरीचं नाही. मैदानावर तुमची जिद्द असेल तर तुम्ही काहीही करु शकता. पुजारा अप्रतिम खेळला. त्याला अंगाला बाऊन्सर लागले, पण त्याचा त्याला काही फरक पडला नाही. तो खचला नाही. मला विकेट वाचावायची आहे, हे एकच त्याचं ध्येय होतं. त्याच्या अशाप्रकारच्या खेळीमुळे ऋषभ पंतसाठी खेळ सोप्पा झाला. तो स्वतंत्रपणे खेळू शकला. पुजारा बाद झाल्यानंतर वॉशिंग्टनने चांगली कामगिरी केली. त्यामुळे क्रेडीट सगळ्यांना जातं. विशेष म्हणजे पुजारा आणि ऋषभ पंत यांना जास्त जातं”, अशी प्रतिक्रिया अजिंक्यने दिली.
रवी शास्त्री यांनी यावेळी पुजाच्या खेळीवर प्रतिक्रिया दिली. “पुजारा आमच्या टीमचा बॅटल मॅन आहे. तो वॉरिअर आहे. त्याचं काम बघून मी त्याला सांगितलं, पुजी तुला मानलं”, असं रवी शास्त्री म्हणाले.
संबंधित बातम्या:
इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा, इशांतचं पुनरागमन, शार्दुल-सुंदरला संधी
Aus vs Ind 4th Test | फंलदाजी करताना हातावर चेंडूचा जोरदार फटका, पुजारा मैदानात कोसळला