FIFA World Cup 2022: फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये बलाढ्य अर्जेंटिनाला सौदी अरेबियाने दिला झटका

FIFA World Cup 2022: लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिनाच्या चाहत्यांसाठी मोठा झटका.

FIFA World Cup 2022: फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये बलाढ्य अर्जेंटिनाला सौदी अरेबियाने दिला झटका
saudi arbaia beat argentina Image Credit source: fifa world cup twitter
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 6:41 PM

FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्ड कप 2022 मध्ये मंगळवारी एका धक्कादायक निकालाची नोंद झाली. लिओनेल मेस्सीच्या बलाढ्य अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तो सुद्धा तुलनेने दुबळ्या समजल्या गेलेल्या सौदी अरेबियाकडून. ग्रुप सी च्या मॅचमध्ये सौदी अरेबियाने अर्जेंटिनाला 2-1 ने हरवलं. लिओनेल मेस्सी हा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू आहे. त्याच्या खात्यात अजून एकही वर्ल्ड कप नाहीय.

खूपच निराशाजनक सुरुवात

यंदा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने मेस्सी आणि अर्जेंटिनाची टीम मैदानात उतरली होती. पण कतारमध्ये सुरु असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनासाठी खूपच निराशाजनक सुरुवात झालीय. यंदाच्या फुटबॉल वर्ल्ड कपमधला हा पहिला धक्कादायक निकाल आहे.

सौदीने भेदली अर्जेटिंनाची बचाव फळी

मेस्सीने 10 व्या मिनिटालाच गोल करुन अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली होती. पण दुसऱ्या हाफमध्ये सौदी अरेबियाने शानदार खेळ दाखवला. अर्जेंटिनाची बचाव फळी भेदून सौदी अरेबियाने दोन गोल केले. अर्जेंटिनाने सामन्यात पुनरागमन करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पण त्यांना सौदी अरेबियाचा बचाव भेदून गोल झळकावता आला नाही.

मागच्या 36 मॅचपासून अर्जेटिंनाची टीम अपराजित होती. तो विजयी क्रम सौदी अरेबियाने बिघडवला. अर्जेंटिनाची टीम 2019 नंतर पहिल्यांदा पराभूत झाली.

सौदी अरेबियाची 10 व्या मिनिटाला चूक अर्जेंटिनाच्या पथ्यावर

अर्जेंटिनाची टीम सौदी अरेबियावर भारी पडणार असं दिसत होतं. दुसऱ्याच मिनिटाला मेस्सीने गोल करण्याचा शानदार प्रयत्न केला होता. सहाव्या मिनिटाला सुद्धा मेस्सीने प्रयत्न केला. पण ओवेसने गोल होऊ दिला नाही. 10 व्या मिनिटाला सौदी अरेबियाच्या अल बुलायाहीने अर्जेंटिनाच्या बॉक्समध्ये फाऊल केला. रेफ्रीने अर्जेंटिनाला पेनल्टी कीक बहाल केली. मेस्सीने या पेनल्टीवर गोल करुन टीमला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पहिल्या हाफमध्ये कुठलाही गोल झाला नाही. अर्जेंटिनाची टीम 1-0 ने पुढे होती.

दुसऱ्या हाफमध्ये बाजी पलटली

दुसऱ्या हाफमध्ये सौदी अरेबियाची टीम बरोबरी साधण्याचा प्रयत्न करत होती. त्यात ते 48 व्या मिनिटाला यशस्वी ठरले. अल सेहरीने सौदीसाठी गोल केला. फेरास अल ब्रिकानने गोल करण्यासाठी मदत केली. फेरासने सेहरीकडे पास दिला. त्याने गोल मारुन बरोबरी साधून दिली.

…आणि एक ऐतिहासिक विजय

55 व्या मिनिटाला सौदी अरेबियाने दुसरा गोल करुन आघाडी मिळवली. सलेम अल दवसरीने गोल केला. सलीमने आपल्या राइट फुटने चेंडू कट केला व शानदार किक मारुन दुसरा गोल केला. त्यानंतर सौदीने शेवटपर्यंत आघाडी टिकवत एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.