Neeraj Chopra : नीरज चोप्राची पण डोप टेस्ट, कधी आणि कशी केली जाते ही चाचणी?
Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पाकिस्तानी एथलीट अर्शद नदीम, भारतीय स्टार नीरज चोप्रा आणि ग्रेनाडाचे एंडरसन पीटर्स जॅवलिन थ्रो मध्ये टॉपवर राहिले. अर्शद नदीमने गोल्ड, नीरजने सिल्वर आणि पीटर्सने ब्रॉन्ज मेडल जिंकलं.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पाकिस्तानी एथलीट अर्शद नदीमने जॅवलिन थ्रो च्या फायनलमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने 92.97 मीटर अंतरापर्यंत थ्रो करुन गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचला. आता पॅरिसमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानी जर्नलिस्टनुसार विजयानंतर अर्शद नदीमची स्टेडियममध्येच डोप टेस्ट करण्यात आली. या टेस्टसाठी तो 2 ते 3 तास स्टेडियममध्येच होता. 89.45 मीटर अंतरावर थ्रो करुन नीरज चोप्रा दुसऱ्या आणि ग्रेनाडाचा एंडरसन पीटर्स तिसऱ्या स्थानावर राहिला. त्याने ब्रॉन्झ मेडल मिळवलं. रिपोर्ट्नुसार अर्शदसह या दोन एथलीटसची सुद्धा डोप टेस्ट झाली. अखेर या तिन्ही विजेत्यांची डोप टेस्ट का झाली? जाणून घेऊया विस्ताराने.
ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्टेजवर अनेक खेळाडू आपली कामगिरी सुधारण्यासाठी बॅन ड्रग्स किंवा अन्य पदार्थांचा वापर करतात. एथलीट्स अनेकदा सायकोएक्टिव औषधांचा वापर करतात. ज्याचा डोक्यावर परिणाम होतो. हे औषध खेळाडूंचा मूड, अवेयरनेस, भावना आणि वर्तनावर प्रभाव टाकतात. त्यामुळे खेळाडू फायनलच्या स्टेजवर आपल्या क्षमतेपेक्षा जास्त चांगला खेळ दाखवतात. अशी चीटिंग पकडण्यासाठी डोप टेस्ट केली जाते. हे काम वर्ल्ड एंटी डोपिंग एजेंसी (WADA) म्हणजे ‘वाडा’कडे आहे. कुठल्याही खेळाडूने अशा औषधांचा सेवन करुन आपली कामगिरी उंचावू नये, असा त्यामागे उद्देश असतो.
डोपिंग टेस्ट दोन प्रकारे
डोप टेस्ट कशी होते? हा प्रश्न आहे. शरीराती द्रव्याच्या आधारे डोपे टेस्ट केली जाते. या टेस्टसाठी वाडा एथलीट्सच यूरिन, सलाइवा, घाम आणि रक्ताचे नमुने घेते. त्याशिवाय केस आणि नखाचे नमुने घेतले जातात. बऱ्याचदा डोपिंग टेस्टसाठी यूरिन सॅम्पल घेतलं जातं. डोपिंग टेस्ट दोन प्रकारे होते. इम्यूनोएसे आणि स्क्रीनिंग टेस्ट दुसरी. या प्रक्रियेद्वारे खास प्रोटीन किंवा दुसऱ्या पदार्थाचा शोध घेतला जातो. ही प्रक्रिया खूप जलद असते. प्रेग्नेंसी टेस्टसारखा काही मिनिटात रिजल्ट मिळतो.
ही टेस्ट थोडी कठीण
त्याशिवाय क्रोमॅटोग्राफी-मास स्पेक्ट्रोफोटोमेट्री (GSMS) प्रक्रियेने टेस्ट केली जाते. ही अशी टेक्निक आहे, ज्यात शरीरातील केमिकलची मात्रा ओळखून त्याचं विश्लेषण केलं जातं. ही टेस्ट थोडी कठीण असते. थोडी महागडी सुद्धा असते. यासाठी वेळही जास्त लागतो. एथलीट्सचे नमुने घेतल्यानंतर खास लॅबोरेटरीमध्ये तपास होतो.
वाडाने कुठले ड्रग्स बॅन केलेत?
दरवर्षी बॅन केलेले ड्रग्स आणि पदार्थांची यादी काढणं ही वाडाची जबाबदारी आहे. ज्यामुळे खेळाडूच प्रदर्शन सुधारतं आणि एथलीट्सच्या शरीराला ज्यामुळे नुकसान होतं, या आधारावर लिस्ट बनवली जाते. एथलीट्ससाठी हेरॉइन, मॉर्फिन, कोडीन, ब्यूप्रेनोर्फिन और ट्रामाडोल सारखे ड्रग आणि अन्य अनेक पदार्थ वाडाने बॅन केले आहेत.
कधी होते डोपिंग टेस्ट?
ऑलिम्पिकमध्ये डोपिंग टेस्ट कधीही, कुठेही केली जाते. वाडाच्या एंटी-डोपिंग टेस्ट नियमानुसार, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होणाऱ्या खेळाडूंना यासाठी नेहमीच तयार रहावं लागतं. मेडल इवेंट झाल्यानंतर ही टेस्ट होते. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. यासाठी अर्शद नदीम, नीरज चोप्रा आणि एंडरसन पीटर्स यांना या टेस्टसाठी स्टेडियममध्ये थांबावं लागलं.