Asian Games 2023 | एशियन गेम्समध्ये भारताच्या मुलींची कमाल, चौथ्या गोल्ड मेडलवर निशाणा
Asian Games 2023 | 19 व्या एशियन गेम्समध्ये भारतीय शूटर्सची कमाल. मनु, इशा आणि रिद्मने असा नेम धरला की, अन्य शूटर्स त्यांच्यासमोर टिकूच शकले नाहीत.
नवी दिल्ली : भारताच्या मुली काय करु शकतात? हे तुम्हाला पहायच असेल, तर 19 व्या एशियन गेम्सवर तुम्ही नजर मारा. चीनच्या भूमीवर सुरु असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताच्या मुलींनी कमाल केली आहे. शूटिंगच्या इवेंटमध्ये भारतीयांचा दबदबा कायम आहे. मनु, इशा आणि रिद्मने 25 मीटर इवेंटमध्ये असा नेम धरला की, अन्य शूटर्स त्यांच्यासमोर टिकूच शकले नाहीत. या महिलांनी 25 मीटर इवेंटमध्ये थेट गोल्ड मेडलला गवसणी घातली. एशियन गेम्स 2023 मध्ये भारताला मिळालेलं हे चौथ गोल्ड मेडल आहे. फक्त शूटिंगच्या इवेंटमधील हे दुसरं गोल्ड मेडल आहे. याआधी भारताने पुरुषांच्या 10 मीटर एयर रायफल टीम इवेंटमध्ये गोल्ड मेडलसह सुवर्णपदाकाला गवसणी घातली होती. यावेळी भारताने रायफलमधून नाही, तर पिस्तुलने गोल्ड मेडलवर निशाणा साधलाय.
भारताच्या मनु भाकर, इशा सिंह आणि रिद्म सांगवानने मिळून महिलांच्या 25 मीटर पिस्टल टीम इवेंटमध्ये 1790 पॉइंट मिळवले. गोल्ड जिंकणाऱ्या या टीममध्ये मनु भाकरने सर्वाधिक 590 पॉइंट मिळवले. भारताने टीम इवेंटमध्ये गोल्ड मेडल जिंकलं. चीनने रौप्यपदकाची कमाई केली. दक्षिण कोरियाने याच इवेंटमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं.
GOLD 🥇! No. 2 from Shooting. In Indv All 3 25m Women in top 8. 2 will go to Finals. @realmanubhaker leads the pack and shows what she is made of! Esha & Rhythm great shooting. Will look up to Manu and Esha for more.. ‘Yeh Dil Mange More’! #AsianGames2022 @WeAreTeamIndia
— Joydeep Karmakar OLY (@Joydeep709) September 27, 2023
महिलांनीच मिळवलं रौप्यपदक
25 मीटर पिस्टल टीम इवेंटमध्ये गोल्ड मेडल मिळवण्याआधी भारतीय महिलांनी शूटिंगच्या 50 मीटर रायफल थ्री पोजीशनमध्ये रौप्यपदक मिळवलं होतं. चौथ्यादिवशी चांदीच्या रंगाच रौप्यपदक होतं. दुसरं मेडल सोनेरी म्हणजे सुवर्णपदक ठरलं. 3 महिला शूटर्सनीच रौप्यपदक मिळवून दिलं होतं. आशी चौकसे, मानिनी कौशिक आणि सिफ्ट कौर यांचा समावेश आहे.