Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची टीम, संघात रोहित-विराट-धोनीला स्थान नाही, रिषभ पंतकडे कर्णधारपदाची धुरा!

ब्रॅड हॉगने आयपीएल 2021 साठी निवडलेल्या ड्रीम टीममध्ये भारताचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीला स्थान दिलेलं नाही. (Australia player Brad hogg Best IPL Player Rishabh Pant Captain)

ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची टीम, संघात रोहित-विराट-धोनीला स्थान नाही, रिषभ पंतकडे कर्णधारपदाची धुरा!
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉजने आपल्या ड्रीम टीमची जबाबदारी रिषभ पंतकडे सोपवली आहे..
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 12:09 PM

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू ब्रॅड हॉग (Brad Hogg) याने आयपीएल 2021 ची सर्वोत्तम टीम निवडली आहे. या टीममध्ये त्याने रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) स्थान दिलेलं नाही. आश्चर्य म्हणजे त्याने या तिघांना वगळून भारताचा नवोदित खेळाडू रिषभ पंतकडे (Rishabh Pant) कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. ब्रॅड हॉजने आयपीएल 2021 चा सर्वोत्तम संघ निवडलाय. या संघात त्याने आश्चर्यकारक प्लेअर निवडत सगळ्यांनाच धक्का दिलाय. (Australia player Brad hogg Best IPL Player Rishabh Pant Captain)

आयपीएलमध्ये दिल्लीचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर जेव्हा दुखापतग्रस्त झाला तेव्हा धवन, रहाणे, स्मिथ या दिग्गजांना पछाडत त्याने दिल्लीचं कर्णधारपद मिळवलं आणि केवळ मिळवलंच नाही तर आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडूनही दाखवली. रिषभने भल्या भल्या दिग्गजांना आपल्या कामगिरीने हैरान केलं. त्याचाच भाग म्हणून ब्रॅड हॉगने निवडलेल्या संघात रिषभकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिलीय.

ब्रॅड हॉगच्या ड्रीम टीममध्ये कोणकोणते खेळाडू ?

ब्रॅड हॉगने निवडलेल्या संघात दिग्गज सलामीवीरांना पाठीमागे टाकत पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी जागा मिळवलीय. हॉगच्या म्हणण्यानुसार शॉ आणि शिखर आयपीएल 2021 मधले सर्वोत्तम सलामीवीर होते. तीन क्रमांकावर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन, चौथ्या क्रमांकावर रिषभ पंत तर पाचव्या क्रमांकावर ए बी डिव्हिलियर्स यांना ब्रॅडने स्थान दिलंय. ऑलराऊंडर म्हणून अनुक्रमे सहाव्या क्रमाकांवर रवींद्र जाडेजा, आणि सातव्या क्रमाकांवर सॅम करन असतील.

ब्रॅड हॉजच्या संघातील बोलर कोण असतील?

हैदराबादकडून खेळत असलेला राशीद खान, मुंबईकडून खेळत असलेला राहुल चाहर आणि जसप्रीत बुमराह, दिल्लीकडून खेळत असलेला आवेश खान या बोलर्सची निवड ब्रॅड हॉगने आपल्या ड्रीम टीम आयपीएल 2021 साठी केलीय.

रोहित, विराट, धोनीला संघात स्थान नाही

ब्रॅड हॉगने आयपीएल 2021 साठी निवडलेल्या ड्रीम टीममध्ये भारताचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीला स्थान दिलेलं नाही. एकीकडे रोहितने आयपीएलच्या 5 ट्रॉफी जिंकल्यात तर धोनीने 3 ट्रॉफी जिंकल्यात. विराटने आयपीएल स्पर्धेत अनेक धमाकेदार खेळी केल्यात. परंतु तरीही हॉजने संघात तिन्ही दिग्गजांना संघात स्थान दिलेलं नाहीय.

(Australia player Brad hogg Best IPL Player Rishabh Pant Captain)

हे ही वाचा :

राशीद खानची दुबईत मौजमजा, ‘ही’ महिला क्रिकेटर म्हणते मी पण येऊ का?

‘ये चिंगारी आग लगा सकती हैं’, रिषभ पंत भारताचा टॉपचा कर्णधार असेल, दिग्गजाची भविष्यवाणी

माझं करिअर संपवतोय, मितालीचा आरोप; ‘हिचे नखरेच जास्त’, पोवारचं उत्तर, नेमका वाद काय?, वाचा…

अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका.
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू.
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले.
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले.
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी.
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या.
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला.
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर.