ऑस्ट्रेलियामध्ये आता यावर्षातील पहिली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा सुरु आहे. अलीकडेच महिला टेनिसमधील नंबर 1 खेळाडू बार्टीचा कॅमिला जिऑर्जी बरोबर सामना झाला. कॅमिला टेनिसपूट असण्याबरोबरच एक मॉडेलही आहे.
30 वर्षाची कॅमिला जिऑर्जी इटलीची राहणारी आहे. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याच्या इराद्याने ती येथे आली होती. पण वर्ल्ड नंबर 1 बार्टी समोर तिचं काही चाललं नाही. तिचा सरळ दोन सेटमध्ये पराभव झाला.
जिऑर्जीचा पराभव केल्यानंतरही बार्टीने आज शानदार सामना झाला असं म्हटलं. मी चांगली सर्विस केली. सुरुवातीच्या सेटनंतर मला काय करायचं आहे, ते लक्षात आलं.
कॅमिला जिऑर्जी एक बिकनी मॉडेल आहे. इटलीमध्ये ती खूप प्रसिद्ध आहे.
कॅमिला जिऑर्जीने 2018 मध्ये सर्वात चांगली कामगिरी केली. त्यावर्षी तिने विम्बल्डनच्या क्वार्टर फायनलपर्यंत धडक मारली होती. सेरेना विलियम्सने तिला हरवलं होतं.
कॅमिला जिऑर्जी टेनिस रँकिंगमध्ये 34 व्या स्थानावर आहे. इन्स्टाग्रामवर ती तिच्या मॉडलिंगशी संबंधित फोटो पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे पाच लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
कॅमिला जिऑर्जीच्या काही पोस्टवर नजर मारली, तर बेड, बीच आणि पुस्तक या मॉडलिंगशी संबंधित पोस्ट आहेत. टेनिस खेळतानाचे तिचे फार कमी फोटो आहेत.
कॅमिला जिऑर्जीच्या करीयरबद्दल बोलायचे झाल्यास, तिने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नंबर 1 खेळाडुंना हरवलं आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तिचा पहिला सामना Anastasia Potapova बरोबर झाला होता. ही लढत तिने 6-4, 6-0 ने जिंकली होती.
दुसऱ्या सामन्यात कॅमिला जिऑर्जीने 6-2, 7-6 ने विजय मिळवला होता.