Sania mirza : अरेरे, सानिया मिर्झाच अखेरच स्वप्न अपूर्ण
Sania mirza : भारतीय टेनिसला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी सानिया मिर्झा आता पुन्हा कधी ग्रँड स्लॅम खेळताना दिसणार नाही. टेनिस विश्वात भारताची ओळख सानियाने निर्माण केली.
नवी दिल्ली : भारतीय टेनिसला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी सानिया मिर्झा आता पुन्हा कधी ग्रँड स्लॅम खेळताना दिसणार नाही. टेनिस विश्वात भारताची ओळख निर्माण करणारी सानिया मिर्झा शुक्रवारी आपल्या करिअरमधील शेवटचा ग्रँड स्लॅम सामना खेळली. इतिहास रचून तिला हा प्रवास संपवायचा होता. पण अखेरच्या क्षणी सानिया आणि तिचा जोडीदार रोहन बोपन्नाकडून चूक झाली. ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये स्टेफनी आणि मातोस जोडीने 7-6, 6-2 अशी मात केली. त्यामुळे सानियाच किताब जिंकण्याच स्वप्न मोडलं. ही तिची शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा होती.
कितीवेळा जिंकली ऑस्ट्रेलियन ओपन?
सानियाने आतापर्यंत 6 वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धेच जेतेपद पटकावल आहे. तिला शेवट ग्रँड स्लॅम जेतेपदाने करायचा होता. तिने 2 वेळा ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब जिंकला आहे. 2009 साली मिक्स्ड डबल्स आणि 2016 साली महिला दुहेरीचा किताब जिंकला. तिसऱ्यांदा हा किताब जिंकण्यासाठी तिने पुरा जोर लावला. पण यश मिळू शकलं नाही.
?6 career Grand Slam titles ?2014 US Open mixed doubles champion ?2015 US Open women’s doubles champion
Congratulations on a remarkable Grand Slam career, @MirzaSania! pic.twitter.com/rusGlEHshR
— US Open Tennis (@usopen) January 27, 2023
पहिल्या सेटमध्ये वर्चस्व मिळवलं, पण….
ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये सानिया-बोपन्ना जोडीने पहिल्या सेटमध्ये वर्चस्व गाजवलं. पहिल्या सेटमध्ये भारतीय जोडी 5-3 ने आघाडीवर होती. पण, त्यानंतर ब्राझिलियन जोडीने जोरदार पुनरागमन केलं. दोन्ही जोड्यांणध्ये एक-एक पॉइंटसाठी जोरदार संघर्ष झाला. 6-6 स्कोर बरोबरीत होता. टाय ब्रेकमध्ये सानिया-बोपन्ना जोडी मागे पडली. पहिला सेट त्यांनी गमावला. दुसऱ्या सेटमध्ये सूर हरवला
भारतीय जोडी जिंकता-जिंकता पहिला सेट हरली. दुसऱ्या सेटमध्ये त्यांच्यावर दबाव स्पष्टपणे दिसून आला. सानिया-बोपन्ना जोडीने 2-6 असा दुसरा सेट गमावला. दुसऱ्या सेटमध्ये सानिया-बोपन्नाने बऱ्याच चूका केल्या. त्याची किंमत त्यांना पराभवाने चुकवावी लागली.