सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लाराबद्दल ब्रेट लीचं आश्चर्यचकित करणारं मत, म्हणाला, ‘मला माहिती असायचं…’

सचिन तेंडुलकर मला कोणत्या बॉलवर कोणता शॉट खेळणार आहे, हे मला माहिती होतं पण ब्रायन लाराबद्दल मात्र असा अंदाज लावता आला नाही, असं ब्रेट ली म्हणाला. (Australian Player Brett Lee Statement On Sachin tendulkar And Brian Lara)

सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लाराबद्दल ब्रेट लीचं आश्चर्यचकित करणारं मत, म्हणाला, 'मला माहिती असायचं...'
ब्रायन लारा, ब्रेट ली आणि सचिन तेंडुलकर
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 7:17 AM

मुंबई :  ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ब्रेट ली (Brett lee) ने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि जागतिक क्रिकेटमधला हिरा, वेस्टइंडिजचा महान बॅट्समन ब्रायन लाराबद्दल (Brian Lara) आश्चर्यचकित करणारं मत व्यक्त केलं आहे. सचिन तेंडुलकर मला कोणत्या बॉलवर कोणता शॉट खेळणार आहे, हे मला माहिती होतं पण ब्रायन लाराबद्दल मात्र असा अंदाज लावता आला नाही. तो कोणत्याही बॉलवर कोणताही शॉट खेळू शकायचा, असं ब्रेट ली याने म्हटलं आहे. (Australian Player Brett Lee Statement On Sachin tendulkar And Brian Lara)

लारा आणि सचिनबद्दल काय म्हणाला ब्रेट ली?

सचिन तेंडुलकर कोणता शॉट खेळणार आहे किंवा त्याचा शॉट कोणत्या दिशेला असणार आहे, याचा अगोदर अंदाज लावता यायचा. पण ब्रायन लारा मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात कोणत्याही बॉलवर सहज फटका खेळू शकायचा. मी जेव्हापासून खेळायला लागलो तेव्हापासून सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा माझे आवडते टेस्ट बॅट्समन होते. ब्रायन लारा तर एवढा तगडा बॅट्समन होता की सहाच्या सहा बॉलवर त्याच्याकडे कव्हर ड्राईव्ह मारण्याची क्षमता होती. सचिन आणि लाराकडे प्रचंड प्रतिभा होती. हे दोघे बॅट्समन माझे आवडते बॅट्समन होतो, असं ब्रेट ली म्हणाला. त्याने आयसीसीला एक विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर भाष्य करत काही किस्से पुन्हा नव्याने उलगडून सांगितले.

सचिन कुठे खेळणार मला माहिती असायचं!

“सचिन तेंडुलकरला मी जर स्टम्पच्या जवळ बोलिंग केली तर मला माहिती असायचं की सचिन मला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारेल. जर मी ऑफ स्टम्पवर बोलिंग केली तर सचिन मला कव्हरच्या दिशेने मारेल आणि जर मी लेग स्टम्पला बोलिंग केली तर सचिन मला पुल खेळेल”, असं ब्रेट म्हणाला. दुसरीकडे लाराच्या बाबतीत असा अंदाज कधी लावता यायचा नाही. त्याच्याकडे कोणत्याही बॉलवर कुठेही खेळायची क्षमता होती. मी म्हटल्याप्रमाणे तो सहाही बॉलवर कव्हर मारु शकायचा अशी ताकद त्याच्या बॅटमध्ये होती, असंही ब्रेट ली म्हणाला.

सचिन क्रिकेटर म्हणून महान होताच शिवाय माणूस म्हणूनही महान!

सचिन तेंडुलकर एक अद्भुत बॅट्समन होता. एक महान खेळाडू होता तसंच तो डोक्याने क्रिकेट खेळायचं. त्याच्यासोबत खेळताना नेहमीच मजा यायची. माणूस म्हणूनही तो नेहमी महान होता, असंही ब्रेट ली म्हणाला.

(Australian Player Brett Lee Statement On Sachin tendulkar And Brian Lara)

हे ही वाचा :

WTC फायनलपूर्वी अजित आगरकरचा महत्त्वाचा सल्ला, पण विराट कोहलीला हा सल्ला अजिबात आवडणार नाही!

कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या सात वर्षानंतरही इंग्लंडमधील धोनीचा रेकॉर्ड जसाच्या तसा!

IPL 2021 Schudule : BCCI आयपीएलच्या फायनलमध्ये बदल करण्याच्या तयारीत, लवकरच घोषणा

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.