Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक LIVE मॅचमध्ये बांग्लादेशच्या क्रिकेटरला हार्ट अटॅक

परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन तमीम इकबालला रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी लागली. पण मैदानावर हेलिकॉप्टर उड्डाणाची व्यवस्था नसल्यामुळे त्याला हेलिकॉप्टरने नेता आलं नाही.

धक्कादायक LIVE मॅचमध्ये बांग्लादेशच्या क्रिकेटरला हार्ट अटॅक
bangladesh cricketer chest painImage Credit source: Gareth Copley-ICC/ICC via Getty Images
Follow us
| Updated on: Mar 24, 2025 | 1:41 PM

एकाबाजूला भारतात आयपीएल टुर्नामेंटचा रोमांच सुरु झालाय. दुसऱ्याबाजूला बांग्लादेशात ढाका प्रीमियर डिवीजन क्रिकेट लीगची मॅच सुरु असताना बांग्लादेशी खेळाडू तमीम इकबालला अचानक रुग्णालयात न्यावं लागलं. त्याला हार्ट अटॅक आल्याच वृत्त आहे. मॅच सुरु असताना बांग्लादेशचा माजी कर्णधार तमीम इकबालच्या अचानक छातीत दु:खू लागलं. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं.

परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन तमीम इकबालला रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी लागली. पण मैदानावर हेलिकॉप्टर उड्डाणाची व्यवस्था नसल्यामुळे त्याला हेलिकॉप्टरने नेता आलं नाही. या बाबत मॅच रेफरी देबब्रत पॉल ने ESPNcricinfo ला माहिती दिली आहे. हेलिकॉप्टरने नेता आलं नाही. त्यामुळे तमीमला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.

तेव्हा तो फिल्डिंग करत होता

मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब आणि शिनेपुकुर क्रिकेट क्लब यांच्यात DPL मध्ये सामना सुरु असताना ही घटना घडली. 50 ओव्हर्सच्या या सामन्या दरम्यान तमीम इकबालच्या छातीती दु:खू लागलं. तेव्हा तो फिल्डिंग करत होता. तमीम इकबाल मोहम्मडन स्पोर्टिंग क्लबचा भाग होता.

किती धावांच टार्गेट?

मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब विरुद्ध शिनेपुकुर क्रिकेट क्लबने पहिली बॅटिंग केली. 49.5 ओव्हरमध्ये त्यांची टीम 223 रन्सवर ऑलआऊट झाली. शिनेपुकुर क्रिकेट क्लबकडून ज्यादा कॅप्टन रायन रहमानने सर्वाधिक 77 रन्स केल्या. मोहम्मडन स्पोर्टिंग क्लबसमोर 224 रन्सच आव्हान होतं. तमीम इकबाल या टीमचा स्टार फलंदाज आहे. त्याची कमतरता किती जाणवणार? हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल.

तमीम इकबालच इंटरनॅशनल करिअर

डावखुरा तमीम इकबाल बांग्लादेशासाठी 2023 मध्ये आपला शेवटचा सामना खेळला होता. त्याने तिन्ही फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. बांग्लादेशसाठी तो 243 वनडे, 70 टेस्ट आणि 78 T20 सामने खेळला आहे. तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तमीम इकबालच्या 15000 धावा आहेत.

'ओ तुम्ही गाड्या घ्या ना, कलेक्टर..', अजितदादा वैतागले
'ओ तुम्ही गाड्या घ्या ना, कलेक्टर..', अजितदादा वैतागले.
शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं पडलं महागात, त्या बॅनरची चर्चा
शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं पडलं महागात, त्या बॅनरची चर्चा.
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला.
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला.
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'.
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.