IPL 2021 : चौथ्या अंपायरची ताकद वाढली, 90 मिनिटात खेळ संपवण्याचे बंधन, IPL साठी BCCI चे नवे नियम

आयपीएलच्या या आगामी मोसमात क्रिकेट चाहत्यांना काही नवे नियम बघायला मिळणार आहेत (BCCI new rules for IPL 2021).

IPL 2021 : चौथ्या अंपायरची ताकद वाढली, 90 मिनिटात खेळ संपवण्याचे बंधन, IPL साठी BCCI चे नवे नियम
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 6:32 PM

मुंबई : Indian Premier League अर्थात आयपीएलच्या चौदाव्या मोसमाची अनेक क्रिकेट चाहते वाट बघत आहेत. आता आयपीएल सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. येत्या 9 एप्रिलपासून आयपीएलच्या सामन्यांचा थरार आपल्याला मिळणार आहे. पण आयपीएलच्या या आगामी मोसमात क्रिकेट चाहत्यांना काही नवे नियम बघायला मिळणार आहेत. या स्पर्धेसाठी बीसीलीआय बोर्डाने नवे नियम जारी केले आहेत. या नियमानुसार प्रत्येक संघाला 90 मिनिटात आपला डाव संपवावा लागेल. तसेच बोर्डाने सॉफ्ट सिग्नल हटवण्याचा निर्णयही घेतला आहे. विशेष म्हणजे या नव्या नियमांनुसार चौथ्या अंपायरची ताकद वाढणार आहे (BCCI new rules for IPL 2021).

बीसीसीआयचे आठही संघाना मेल

बीसीसीआयने सर्व आठही संघांना मेल पाठवला आहे. या मेलमध्ये नव्या नियमांबाबत माहिती देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या नव्या आदेशानुसार प्रत्येक संघाने 90 मिनिटात डाव आटोपायला हवा. याआधी प्रत्येक डावाची 20 वी ओव्हर 90 व्या मिनिटाला सुरु करण्याबाबतचा नियम होता. मात्र, आता वेळेत बदल करण्यात आला आहे.

खेळासाठी 85 मिनिटे वेळ

नव्या नियमानुसार एका तासाला प्रत्येक संघाला सरासरी 14.11 ओव्हर टाकाव्या लागतील. पण यात टाईम-आऊटचा समावेश केला जाणार नाही. खेळासाठी 85 मिनिट तर टाईम आऊटसाठी 5 मिनिट दिले जातील (BCCI new rules for IPL 2021).

फोर्थ अंपायरची ताकद वाढली

कोणताही संघ जर वेळ वाया घालवत असेल तर फोर्थ अंपायरची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. अशावेळी फलंदाजांना सूचना किंवा इशारा देण्याचा अधिकार फोर्थ अंपायरला देण्यात आला आहे. याशिवाय शिक्षा म्हणून ओव्हर-रेट नियम लागू करण्याचा अधिकार चौथ्या अंपायरला देण्यात आला आहे.

थर्ड अंपायरबाबतचा निर्णय

याशिवाय ऑन-फिल्ड अंपायरच्या निर्णयाचा तिसऱ्या अंपायरच्या निर्णयावर काहीच फरक पडणार नाही, असंही बीसीसीआयने सांगितलं आहे. याचाच अर्थ आता मैदानावरील अंपायरला मदतीसाठी थर्ड अंपायरला सॉफ्ट सिग्नल देण्याची गरज राहणार नाही. हा निर्णय अंपायरिंगच्या हितासाठी घेण्यात आलाय जेणेकरुन थर्ड अंपायरला निर्णय जाहीर करताना कोणतीही अडचण येऊ नये. अंपायरच्या निर्णयावरुन निर्माण होणाऱ्या वादांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

शॉर्ट रनबाबत नियम

विशेष म्हणजे बीसीसीआयने आता शॉर्ट रन नियमामध्येही बदल केला आहे. आता थर्ड अंपायर मैदावर असलेल्या अंपायरच्या निर्णयाबाबत विचार करुन मुख्य निर्णय बदलू शकतात.

हेही वाचा : चालाख चहल! आयपीएलच्या 14 व्या मोसमात युझी फलंदाजांना फिरकीत इझीली अडकवण्यासाठी सज्ज

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.