धोनीसाठी काहीही ! बीसीसीआय IPLमध्ये पुन्हा आणणार हा नियम, CSK ला मिळणार खुशखबर ?

महेंद्रसिंग धोनी हा आयपीएल 2025 मध्ये खेळणार असल्याची चर्चा सुरू आहे. येत्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला त्याला मैदानात उतरवायचे आहे. यासाठी त्यांनी बीसीसीआयकडे मागणीही केली होती. मेगा लिलावापूर्वी त्याची मागणी पूर्ण होऊ शकते.

धोनीसाठी काहीही !  बीसीसीआय IPLमध्ये पुन्हा आणणार हा नियम, CSK ला मिळणार खुशखबर ?
Follow us
| Updated on: Aug 17, 2024 | 9:27 AM

IPL 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी (लिलाव) रिटेंशन पॉलिसी बाबात सतत चर्चा सुरू आहे. बीसीसीआयने नुकतीच लीगच्या फ्रँचायझी मालकांची बैठक घेतली होती. यावेळी मेगा ऑक्शन, इम्पॅक्ट प्लेअर आणि रिटेन्शन पॉलिसीबाबत चर्चा झाली. चेन्नई सुपर किंग्जने बीसीसीआयकडे बैठकीत नियम आणण्याची मागणी केली होती, जेणेकरून ते धोनीला येत्या हंगामातही कायम ठेवू शकतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने सीएसकेची मागणी मान्य केली आहे. धोनीला आयपीएलमध्ये उतरवण्यासाठी बोर्ड मोठे पाऊल उचलू शकते. जर बोर्डाने असे केले तर मेगा ऑक्शनपूर्वीच CSK ला एक मोठी आनंदाची बातमी मिळेल.

काय आहे नियम ?

आयपीएलच्या पहिल्या सत्रात एक नियम आणण्यात आला होता. या अंतर्गत, कोणतीही फ्रेंचायझी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या खेळाडूंना अनकॅप्ड खेळाडूंच्या श्रेणीत कमी पैशात खरेदी करू शकते. त्यासाठी अट एवढीच होती की त्यांच्या निवृत्तीला 5 वर्षे झाली असली पाहिजेेत. हा नियम 2021 मध्ये बीसीसीआयने काढून टाकला कारण तो कधीही वापरला गेला नाही. रिपोर्टनुसार, 31 जुलै रोजी झालेल्या मीटिंगमध्ये चेन्नईने आपला सर्वात महत्त्वाचा खेळाडू धोनीला खेळवण्यासाठी हा नियम परत आणण्याची मागणी केली होती, तथापि, खूप कमी फ्रँचायझींनी CSK ला पाठिंबा दिला. आता हा नियम परत येईल अशी सूत्रांची माहिती आहे. खेळाडूंचे नियमन जाहीर करताना बोर्ड याची घोषणा करू शकते.

IPL 2025 मध्ये कशी असेल रिटेंशन पॉलिसी?

काही आयपीएल संघांना मेगा ऑक्शन हटवायचे आहे. पण क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय सध्यातरी हे संपवणार नाही. मात्र, याबाबत चर्चा सुरू आहे. याशिवाय, बोर्ड मेगा ऑक्शनपूर्वी संघांना जास्तीत जास्त सहा खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी देऊ शकते. याशिवाय राईट टू मॅच कार्ड नियमही परत केला जाऊ शकतो.

धोनी IPL 2025 खेळणार का ?

धोनीने नुकतेच आयपीएल 2025 मध्ये खेळण्याबाबत वक्तव्य केले होते. त्याच्या हातात काहीच नाही, नवीन रिटेन्शन नियमांवर सर्व काही अवलंबून असेल, असे तो म्हणाला होता. सध्या मेगा ऑक्शनपूर्वी केवळ 4 खेळाडूंना कायम ठेवण्याचा नियम आहे. पण ताज्या अहवालानुसार अनकॅप्ड कॅटेगरी आणि रिटेन्शनच्या नियमांमध्ये बदल झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे धोनीच्या खेळण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.