BBL : फक्त 10 रन्सवर 4 विकेट, इतक्या नाजूक स्थितीतूनही जिंकली ही टीम, एक नो-बॉलने बिघडवला खेळ
BBL : चार फलंदाज अवघ्या 10 धावात तंबूत परले होते. कठीण परिस्थिती होती. क्रीजवर असलेल्या दोन फलंदाजांनी हिम्मत हरली नाही. अशक्य वाटणारी गोष्ट त्यांनी शक्य करुन दाखवली. त्याचवेळी एक नो-बॉल निर्णायक ठरला.
बिग बॅश लीगच्या 25 व्या सामन्यात मेलबर्न रेनीगेड्सने पर्थ स्कॉर्चर्सचा पराभव केला. मेलबर्नने हा सामना 4 विकेटने जिंकला. पर्थ स्कॉर्चर्सकडून मेलबर्न रेनीगेड्सला विजयासाठी 148 धावांच टार्गेट मिळालं होतं. अवघे 2 चेंडू शिल्लक असताने मेलबर्न रेनीगेड्स टीमने हा विजय मिळवला. महत्त्वाची बाब म्हणजे मेलबर्नचे चार फलंदाज अवघ्या 10 धावात तंबूत परले होते. त्यांचा कॅप्टन विल सदरलँड आणि थॉमस स्टीवर्ट रॉजर्सने कठीण काळात खेळ उंचावला. त्यांच्या फलंदाजीच्या बळावर मेलबर्नने विजय मिळवला. विल सदरलँडने 45 चेंडूत 70 धावा आणि रॉजर्सने 31 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या.
मेलबर्न रेनीगेड्सला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 12 धावांची आवश्यकता होती. हा सामना पर्थ टीमला जिंकता आला असता. पण एका नो बॉलने सगळा खेळ बिघडवला. लास्ट ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर टॉम रॉजर्स आऊट झालेला. पण तो चेंडू नो बॉल दिला. त्याला जीवनदान मिळालं. त्यानंतर रॉजर्सने एक सिक्स आणि एक बाऊंड्री मारुन टीमला आरामात विजय मिळवून दिला. त्याआधी गोलंदाजी करताना रॉजर्सने 2 विकेट काढले. त्यामुळे त्याला प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळाला. रॉजर्स शिवाय विल सदरलँडने 70 धावा फटकावल्या. त्याने सुद्धा 2 विकेट काढले. या दोन्ही खेळाडूंनी सामन्यात ऑलराऊंडर प्रदर्शन केलं. मेलबर्नच्या विजयात एडम झम्पाचा रोल सुद्धा महत्त्वाचा आहे. या लेग स्पिनरने 27 धावा देऊन 3 विकेट काढले.
म्हणून 147 धावा झाल्या
याआधी पर्थ टीमचे सुपरस्टार खेळाडू पूर्णपणे अपयशी ठरले. मिचेल मार्श पहिल्याच चेंडूवर आऊट झाले. फिन एलन फक्त 19 धावा करु शकला. हे दोन्ही विकेट मेलबर्नचा कॅप्टन विल सदरलँडने घेतला. एरॉन हार्डीला टॉम रॉजर्सने आऊट केलं. कूपर कॉनोली सुद्धा रॉजर्सचा बळी ठरला. कॅप्टन टर्नरने फक्त 8 धावा केल्या. 7 व्या नंबरवर फलंदाजीला उतरलेल्या एश्टन एगरने कमालीची बॅटिंग केली. त्याने 30 चेंडूत 51 धावा फटकावल्या. त्यामुळे पर्थची टीम 147 धावसंख्येपर्यंत पोहोचू शकली.