वॉशिंग्टन : या जगात एकापेक्षा एक खेळाडू होऊन गेले. यामध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांची नावे सुवर्ण अक्षरात कोरली गेलेली आहेत. बॉक्सिंगमध्ये बापमाणूस म्हणून ओळख असलेला अमेरिकाचा माईक टायसन हासुद्धा त्यापैकीच एक. बॉक्सिंग हा खेळ भारतात प्रसिद्ध नसला तरी माईक टायसन हे नाव सर्वांनाच माहीत आहे. त्याने केलेल्या फाईट्स आजही आवडीने पाहिल्या जातात. सध्या मात्र माईक टायसन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. बॉक्सिंग रिंमध्ये उतरण्यापूर्वी स्वत:ला शांत करण्यासाठी टायसनला महिलांशी सेक्स करावा लागायचा असं त्याच्या ड्रायव्हरने सांगितलंय. द सन या ब्रिटीश माध्यमाशी बोलताना टायसनच्या माजी ड्रायव्हरने हा दावा केलाय.
बॉक्सर माईक टायसनचा माजी ड्रायव्हर रुडी गोन्झालेझ (Rudy Gonzalez) याने द सन या ब्रिटीश माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्याने माईक टायसनबाबत मोठा दावा केलाय. माईक टायसन हा बॉक्सिंगच्या सामन्यात चांगलाच आक्रमक होत असे. आपल्या आक्रमकपणामुळे समोरच्या प्रतिस्पर्ध्याचा मृत्यू होईल, अशी भीती टायसनला असायची. याच कारणामुळे स्वत:ला शांत ठेवण्यासाठी तो सामन्यापूर्वी महिलांशी सेक्स करायचा असं, गोन्झालेझने सांगितलंय.
“माईक टायसनच्या आयुष्यातील हे एक सर्वात मोठे रहस्य आहे. बॉक्सिंग करण्यापूर्वी त्याला ड्रेसिंग रुममध्ये सेक्स करावा लागायचा. सामन्यापूर्वी मला सेक्स करायला भेटला नाही तर मी प्रतिस्पर्ध्याला मारू शकतो, असं मला टायसन सांगायचा. विशेष म्हणजे तो महिलांसोबत काही मिनिटांसाठी जायचा. परत आल्यावर आता माझा प्रतिस्पर्धी जिवंत राहील, असं टायसन म्हणायचा. तो स्पतीस्पर्ध्याला मारून टाकेल याची भीती टायसनाला असायची आणि हे काम तो करु शकेल हे टायसनला माहिती होते,” असं गोन्झालेझने द सनशी बोलताना सांगितलंय.
माईक टायसनच्या माजी चालकाने हे गुपीत माध्यमांसोर सांगितल्यामुळे जगभरात टायसनची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. माईक टायसनने सध्या बॉक्सिंग रिंगमधून सन्यास घेतलाय. तो त्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट बॉक्सर म्हणून ओळखला जातो. मात्र त्याच्या ड्रायव्हरने केलेल्या दाव्यामुळे आता टायसनबद्दल पुन्हा वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
माईक टायसन जगभरात सर्वोत्कृष्ट बॉक्सर म्हणून ओळखला जातो. त्याला त्याच्या काळातील सर्वात खतरनाक आणि क्रूर बॉक्सर म्हटलं जायचं. समोरचा प्रतिस्पर्धी कितीजरी जखमी झाला तरी टायसनला त्याची तमा नसायची. सामना जिंकणे हेच ध्येय त्याच्यासमोर असायचे असे म्हटले जाते. कमी वेळात खेळ संपवण्यात त्याचा हातखंडा असायचा. 1985 ते 2005 या काळात टायसनने बॉक्सिंग रिंगवर राज्य केलेलं आहे. वयाच्या विसाव्या वर्षीच टायसनने हेवीवेट बॉक्सिंगची स्पर्धा जिंकेलली आहे. टायसनने आतापर्यंत 19 फाईट्स पहिल्याच राऊंडमध्ये संपवलेल्या आहेत. म्हणजेच पहिल्याच फेरीत टायसनने सामना खिशात घातलेला आहे. फक्त 12 वेळा टायसनचा सामना पहिल्या फेरीच्या पुढे गेलेला आहे. बॉक्सिंगचा बादशाहा अशी ओळख असेल्या टायसनच्या आयुष्यात काही वादग्रस्त घटनादेखील घडलेल्या आहेत.
इतर बातम्या :
एबी डिव्हिलियर्सच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर विराट कोहलीचं भावूक ट्विट, ABD चा प्रेमळ रिप्लाय
निवृत्तीच्या वेळी एबी डिव्हिलियर्सला भारताची आठवण, ABD चा भावनिक संदेश वाचून भारतीयांना अभिमान वाटेल