नवी दिल्ली : झारखंडमधून एक दु:खद बातमी आहे. नॅशनल नेमबाज कोनिका लायक (Konika Layak) हिने गळफास लावून घेत आत्महत्या केलीय. 26 वर्षाची कोनिका ही कोलकाता (Kolkata) इथं कॅम्पमध्ये ट्रेनिंग घेत होती. यापूर्वी ऑक्टोबरपर्यंत कोनिकाची ट्रेनिंग ही गुजरातमध्ये सुरु होती. अहमदाबादमध्ये (Ahemdabad) कोनिकासोबत शुटिंगवेळी छेडछाडीचा प्रकार समोर आला होता. कोनिकाच्या आत्महत्येनंतर पोलिस त्या दृष्टीनेही या प्रकरणाचा तपास करत आहेत. अभिनेता सोनु सूदने कोनिकाला नुकतीच एक जर्मन प्रकारातील अडीच लाखाची रायफल भेट दिली होती.
नेमबाजी कोनिका मागील एक वर्षापासून माजी राष्ट्रीय खेळाडू जयदीप प्रभाकर यांच्याकडून कोलकात्याच्या उत्तर पाडा इथल्या कॅम्पमध्ये ट्रेनिंग घेत होती. या दरम्यान ती गुजरातमध्येही ट्रेनिंगसाठी गेली होती. यावेळी तिच्यासोबत छेडछाडीचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात कोनिकावर कुठला दबाव होता का? याचा तपास आता पोलिस करत आहेत.
त्याचबरोबर प्रशिक्षक आणि कोनिकाचे संबंध चांगले नव्हते अशी माहितीही पोलिसांना मिळत आहे. त्या दृष्टीनेही पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या मृत्यूची माहिती तिचे वडील पार्थो लायक यांना देण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वीच कोनिकाची आई कोलकाता इथे आपल्या मुलीला भेटून गेली होती. कोनिकाच्या मृत्यूची माहिती मिळताच तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
कोनिका ही रायफल नसल्यामुळे मित्रांकडून उधार मागून स्पर्धेत उतरली होती. मात्र, जेव्हा तिला स्वत:ची रायफल मिळाली तेव्हा ती खूप आनंदी झाली होती. त्यानंतर कोनिकाने कोलकाता इथं शूटिंग अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली होती.
राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज हुनर सिंहने 10 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात आपल्या रायफलने स्वतःवर गोळी झाडली होती. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदन केले. हुनर सिंह राष्ट्रीय स्तरावरील उत्तम नेमबाज होता. हुनर सिंहने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपल्या राज्याचे नाव उंचावले होते. त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, हुनरने पुणे, दिल्ली आणि जालंधर येथे झालेल्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. हुनर सिंहला 3 महिन्यांपूर्वी हाताला दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो बराच सावरला होता. पण त्यानंतर काही दिवसांपासून या वेदनेबद्दल तो अत्यंत काळजीत होता.
इतर बातम्या :