कुस्ती महासंघ बनला आखाडा, बृजभूषण सिंहवर आरोप करणारे अनेक जण पदकविजेता

अनेक पैलवानांनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैगिंक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाला उत्तर मागवले आहे. तसेच लखनऊमध्ये होणारे राष्ट्रीय शिबीर रद्द केले आहे.

कुस्ती महासंघ बनला आखाडा, बृजभूषण सिंहवर आरोप करणारे अनेक जण पदकविजेता
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 11:47 AM

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्यावर देशातील स्टार महिला पैलवानांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. टोकिओ ऑलम्पिक स्पर्धेत कांस्य पदक विजेता बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेत्या महिला पैलवान विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांच्यासह अनेक पैलवानांनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैगिंक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाला उत्तर मागवले आहे.

विशेष म्हणजे बृजभूषण सिंह यांच्याविरोधात या खेळाडूंचं दिल्लीच्या जंतर-मंतर येथे आंदोलन सुरु आहे. त्यांनी केलेले आरोप गंभीर असल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे महिला पैलवानांचे आरोप सिद्ध झाले तर गळफास घेईन, असं आव्हान बृजभूषण सिंह यांनी दिलं आहे.

कोणी कोणी केले आरोप : बजरंग पूनिया, विनेश फोगाट, आसू मलिक, साक्षी मलिक, सत्यव्रत कादियान, अंतिम पंघाल, रवि दहिया, दीपक पूनिया, संगीता फोगाट, सरिता मोर, सोनम मलिक, महावीर फोगाट, कुलदीप मलिक यांच्यांसह जवळपास ३० पैलवान धरणे आंदोलन करत आहेत. कोणत्या प्रमुख खेळाडूंनी आरोप केले आहेत त्यांची कारकिर्द

हे सुद्धा वाचा

बजरंग पूनिया :टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत रजत पदक विजेता खेळाडू. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेत चार पदक मिळवले आहे. साक्षी मलिक : रियो ऑलंपिक पदक विजेता खेळाडू आहे. २०१४ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक पटकवले होते. आशिया कुस्ती स्पर्धेत कास्य पदक जिंकला आहे. विनेश फोगाट : आशिया व जागतिक कुस्ती स्पर्धेत विजेता खेळाडू. हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील विनेश रहिवाशी आहे. आशिया स्पर्धेत सुवर्णपदक घेणारी विनेश पहिला भारतीय महिला आहे. सरिता मोर : जागतिक कुस्ती स्पर्धेत विजेता सुमित मलिक : राष्ट्रकुल स्पर्धेत पदक विजेता

क्रीडा मंत्रालयाकडून दखल :  क्रीडा मंत्रालयाने या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन कुस्ती महासंघाला ७२ तासांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहे. क्रीडा मंत्रालयाने १८ जानेवारीपासून लखनऊमध्हे होणारा महिला पैलवानांचा राष्ट्रीय कुस्ती शिबीर रद्द केला आहे. या शिबिरात ४१ महिला कुस्तीपटू, १३ कोच व सपोर्ट स्टाफ सहभागी होणार होता.दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणी सुमोटो घेत पावले उचलली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.