UEFA Champions League Final : चेल्सी संघ 1-0 च्या फरकाने विजयी, दुसऱ्यांदा कोरले चषकावर नाव

चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात चेल्सी फुटबॉल क्लबने मँचेस्टर सिटीला नमवत जेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे.

UEFA Champions League Final : चेल्सी संघ 1-0 च्या फरकाने विजयी, दुसऱ्यांदा कोरले चषकावर नाव
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 5:05 PM

पोर्तो : फुटबॉल विश्वातील महत्त्वाची स्पर्धा असणाऱ्या चॅम्पियन्स लीगचं जेतेपद यंदा चेल्सी क्लबने पटकावलं आहे. जगभरातील सर्व देशांतील उत्कृष्ट क्लब भाग घेत असणारी ही स्पर्धा दरवर्षी जगभरातील करोडो चाहते उत्सुकतेने पाहतात. दरम्यान यंदा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात इंग्लिश प्रिमीयर लीगमधील चेल्सी आणि मँचेस्टर युनायटेड हे दोन्ही संघ आमने-सामने होते. यावेळी चेल्सीचा मिडफिल्डर काई होवित्झने लगावलेल्या एका गोलच्या जोरावर चेल्सीने विजय आपल्या नावे केला. (Chelsea Football Club Won UEFA Champions League Against Manchester city)

याआधी 2012 साली चेल्सी संघाने जर्मनीच्या बायर्न म्युनिच संघाला नमवत चॅम्पियन्स लीगचं जेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर नऊ वर्षांनी पुन्हा एकदा चेल्सीने अंतिम सामन्यात विजय मिळवला आहे. दुसरीकडे मँचेस्टर सिटी संघाला दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. या विजयासह चेल्सी हा दोनदा चॅम्पियन्स लीग विजेतेपद जिंकणारा इंग्लिश प्रिमीयर लीग या इंग्लंडच्या लीगमधील तिसरा संघ ठरला. याआधी लिव्हरपूल आणि मँचेस्टर युनायटेडने दोन वेळा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळविले आहे.

कोरोनामुळे ठिकाणात बदल

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले होते. आधी तुर्कीची राजधानी इस्तंबूल येथे खेळवण्यात येणारा सामना पोर्तुगालच्या पोर्तो शहरात खेळवला गेला.

सामन्याचा थरार

मँचेस्टर सिटी आणि चेल्सी यांच्यातील हा सामना सुरुवातीपासूनच चूरशीत सुरु होता. दोन्ही संघाकडे जगातील दमदार फुटबॉलपटूंची फौज असल्याने दोन्ही संघाला सहज गोल करता येत नव्हता. त्याचवेळी ४२व्या मिनिटाला चेल्सीच्या मेसन माउंटने दिलेल्या पासवर मिडफिल्डर काई होवित्झने गोल केला आणि सामन्यात संघाला 1-0 ची आघाडी घेऊन दिली. त्यानंतर संपूर्ण सामना संपेपर्यंत दोन्हीही संघाना एकही गोल करता आला नाही. अतिरिक्त 7 मिनीट संपल्यावर अखेर 1 गोल केल्यामुळे चेल्सी संघाला विजयी घोषित करण्यात आले.

तिन्ही लीगमध्ये रोनाल्डोचाच डंका! इंग्लंड, स्पेन गाजवल्यानंतर आता इटलीतही रोनाल्डोची यशस्वी वाटचाल

एक पराभव आणि प्रशिक्षकाला डच्चू, नामांकित संघाने महान माजी खेळाडूला घरी पाठवलं!

(Chelsea Football Club Won UEFA Champions League Against Manchester city)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.