वर्ल्डकपसाठी वेस्ट इंडीजकडून ख्रिस गेलकडे मोठी जबाबदारी

मुंबई : आगामी आयसीसी वर्ल्डकपसाठी धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याच्याकडे वेस्ट इंडीजने संघात महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. वेस्ट इंडीजने वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा केली असून, जेसन होल्डर कर्णधारपदी आणि ख्रिस गेलची उपकर्णधारपदी वर्णी लागली आहे. “क्रिकेटमधील कुठल्याही प्रकारात वेस्ट इंडीजसाठी प्रतिनिधित्व करणं कायमच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि यंदाचा वर्ल्डकप माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. संघातील वरिष्ठ खेळाडू म्हणून […]

वर्ल्डकपसाठी वेस्ट इंडीजकडून ख्रिस गेलकडे मोठी जबाबदारी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मुंबई : आगामी आयसीसी वर्ल्डकपसाठी धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याच्याकडे वेस्ट इंडीजने संघात महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. वेस्ट इंडीजने वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा केली असून, जेसन होल्डर कर्णधारपदी आणि ख्रिस गेलची उपकर्णधारपदी वर्णी लागली आहे.

“क्रिकेटमधील कुठल्याही प्रकारात वेस्ट इंडीजसाठी प्रतिनिधित्व करणं कायमच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि यंदाचा वर्ल्डकप माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. संघातील वरिष्ठ खेळाडू म्हणून कर्णधार आणि इतर खेळाडूंना चांगल्याप्रकारे सहकार्य करण्याची माझी जबाबदारी आहे. हा वर्ल्डकप सर्वात मोठा असेल, त्यामुळे मला प्रचंड आशा आहेत. मला खात्री आहे की, वेस्ट इंडीजसाठी मी चांगली खेळी करेन.”, अशी प्रतिक्रिया ख्रिस गेलने उपकर्णधारपदी निवड झाल्यानंतर दिली.

वेस्ट इंडीजचा वर्ल्डकपसाठी संघ : जेसन होल्डर (कर्णधार), आंद्रे रसेल, एश्ले नर्स, कार्लोस ब्रॅथवेट, ख्रिस गेल (उपकर्णधार) डॅरेन ब्राव्हो, इवान लुइस, फॅबियन ऐलन, केमार रोच, निकोलस पूरन, ओशाने थॉमस, शाय होप, शेनन, गॅब्रियल, शेल्डन, कॉट्रोल और शिमरोन हेटमायर

वेस्ट इंडीज क्रिकेट संघात नवीन व्यवस्थापन समितीने मोठे बदल केले. विशेषत: ख्रिस गेल आणि इतर महत्त्वाच्या खेळाडूंचा आधीच्या व्यवस्थापनाशी मोठा वाद झाला होता. मात्र, आता त्यातून मार्ग काढत ख्रिस गेलसह इतर खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले हे.

ख्रिस गेल सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) खेळत आहे. त्याचवेळी, वेस्ट इंडीजचा संघ आयर्लंडमध्ये तीन देशांच्या वनडे टुर्नामेंटमध्ये खेळत आहे. पहिल्या सामन्यात आयर्लंडने 196 धावांसह वेस्ट इंडीजचा सुपडासाफ केला.

ख्रिस गेलने वेस्ट इंडीजकडून खेळत आतापर्यंत 289 सामन्यांमध्ये 10 हजार 151 धावा बनवल्या आहेत. ख्रिस गेल वेस्ट इंडीज संघातील सर्वात जास्त शतकं ठोकणारा खेळाडू ठरला आहे. क्रिकेट जगतात सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ख्रिस गेल 14 व्या क्रमांकावर आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.