अब्दुल सत्तार यांची पातळी, संस्कार काय?, जितेंद्र आव्हाड यांनी डिवचलं

त्याला ते सिकंदरचे गाण माहीत आहे ना. जब गया था दुनियासे दोनो हात खाली थे.

अब्दुल सत्तार यांची पातळी, संस्कार काय?, जितेंद्र आव्हाड यांनी डिवचलं
जितेंद्र आव्हाड यांनी सुनावलं
Follow us
| Updated on: Nov 07, 2022 | 5:57 PM

ठाणे : सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त विधान केलं. याबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, विरोधात नाही. अत्यंत गलिच्छ, नीच भाषेमध्ये त्यांनी टीका केली. त्यांनी भिकार… असा शब्द वापरला आहे. त्यांची पातळी काय आहे. यांची संस्कृती काय आहे. यांच्या जिभेवर महिलांबद्दल काय भाषा आहे. हे महाराष्ट्राला कळावं म्हणून मी सांगतोय. मी अब्दुल सत्तारांनी जाणीव करून देतो. तुम्ही ज्या शिव्यांच्या शाळेत आहात, त्याचे आम्ही सर्व मुख्याध्यापक आहोत. पण, आमच्या तोंडातून आजपर्यंत ३५ वर्षांच्या राजकारणात आम्ही अशी शिवी कुणाला कधी केलेली नाही.

मनुवादाचा कट्टर समर्थक राज्यात कोणीही नाही. मनुवाद्याच्या कट्टर समर्थकाचं नाव आहे अब्दुल सत्तार. कारण मनुवादामध्ये महिलांना किंमत नाही.कोणतेही स्थान नाही. अशी भूमिका मांडली होती.

इस्लाममध्ये महिलांना काय सन्मान दिला जातो. तो महिलांच्या तोंडून ऐका असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. महिलेला अत्यंत खराब शिवी दिली. तुम्ही धर्माचं पालन करत नसालं, तर मुसलमान कसे, असा सवाल एका मुस्लीम महिलेनं केला. यांचा धर्म कुठला आहे. मुस्लीम धर्माला फॉलो केलं असतं तर अशी शिवी दिली नसती.

त्यांच्या वरिष्ठांनी ठरवावं की, त्यांचं काय करायचं. आम्हाला त्यांच्याशी काही घेणंदेणं नाही, असही जितेंद्र आव्हाड म्हणाले. हे कुठले संस्कार आहेत. मागच्या आठवड्यात त्यांनी चहा पित नाही, तर रात्री दारू पिता का, असं उघडपणे विचारलं होतं. हे कुठले संस्कार आहेत, असंही जितेंद्र आव्हाड यांनी ठणकावले. आणि नंतर सत्तारांच्या हसण्याची नक्कलही केली.

त्याला ते सिकंदरचे गाण माहीत आहे ना. जब गया था दुनियासे दोनो हात खाली थे. माज कोणाचाही चालत नाही, या जगात. माज उतरवला जातो. लोकशाहीमध्ये असा माज तर नक्कीच उतरविला जातो.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.