CWG 2022: लवलीना बोरगोहेनच्या टि्वटनंतर खेळाडूंवर बंदी, बॉक्सर्सच्या टीमलाही मोठा धोका

CWG 2022 स्पर्धा सुरु होण्याधी भारताची स्टार बॉक्सर लवलीना बोरगोहेनच्या (lovlina borgohain) टि्वटर पोस्टने भारतात खळबळ उडवून दिली.

CWG 2022: लवलीना बोरगोहेनच्या टि्वटनंतर खेळाडूंवर बंदी, बॉक्सर्सच्या टीमलाही मोठा धोका
लव्हलिना बोरगोहेनImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 1:41 PM

मुंबई: CWG 2022 स्पर्धा सुरु होण्याधी भारताची स्टार बॉक्सर लवलीना बोरगोहेनच्या (lovlina borgohain) टि्वटर पोस्टने भारतात खळबळ उडवून दिली. आपला मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप, लवलीना बोरगोहेनने केला होता. लवलीनाच्या कोच संध्या गुरुंग यांना क्रीडा ग्राम मध्य् प्रवेश दिला जात नव्हता. ज्याच्या थेट परिणाम तिच्या ट्रेनिंग वर होत होता. त्यामुळे लवलीनाने टि्वटरवर ती पोस्ट टाकली होती. तिने या बद्दल आवाज उठवल्यानंतर लवलीनाच्या कोचना क्रीडा ग्राम (Games village) मध्ये प्रवेश मिळाला. पण त्याचा फटका संपूर्ण संघाला बसणार आहे.

डॉक्टरांच एक्रीडेशन रद्द

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लवलीनाला क्रीडा ग्राम मध्ये प्रवेश दिला. पण त्या बदल्यात टीम डॉक्टर करणजीत सिंह यांचं एक्रीडेशन रद्द करण्यात आलं. त्यांना हॉटेल मध्ये पाठवण्यात आलं. करणजीत हे 12 बॉक्सर्सच्या टीमचे एकमेव डॉक्टर आहेत. पण आता एक्रीडेशन रद्द झाल्यामुळे ते संघासोबत नाहीयत. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्यावेळी सुद्धा डॉक्टर हॉटेल मध्येच थांबले होते. त्यावेळी बॉक्सर सतीश कुमारला गंभीर दुखापत झाली होती.

आपली रुम लवलीनाच्या कोचना दिली

लवलीना बोरगोहेनच्या कोच संध्या गुरुंग यांना क्रीडा ग्राम मध्ये प्रवेश दिल्यानंतर बॉक्सिंग टीमचे हेड कोच भास्कर भट्ट हॉटेल मध्ये शिफ्ट झाले आहेत. त्यांनी आपली रुम लवलीनाच्या कोचना दिली. लवलीनाच्या कोचला क्रीडाग्राम मध्ये प्रवेश दिल्यानंतर एक्रीडेशन आणि खोली रिकामी करणं गरजेच होतं. म्हणून बॉक्सिंग टीमने हा निर्णय घेतला.

प्री क्वार्टर फायनल मध्येच बाहेर गेली होती

लवलीनच्या टि्वट नंतर चेफ डि मिशनने टीमच्या सर्व हेड कोचेसची बैठक बोलावली. आता कुठलाही खेळाडू मीडियाशी बोलणार नाही, असा निर्णय त्यात घेण्यात आला. खेळाडूंच्या पत्रकारांशी बोलण्यावर बंदी घालण्यात आली. या सगळ्या वादानंतर आता सगळ्यांच्या नजरा लवलीनावर असतील. वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये लवलीना प्री क्वार्टर फायनल मध्येच बाहेर गेली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.