CWG 2022: ऑलिम्पिक मध्ये सिलव्हर मेडल मिळवणाऱ्या मीरबाई चानूकडून आता गोल्डची अपेक्षा
CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्स 2022 (CWG 2022) स्पर्धेत वेटलिफ्टिंग (Weightlifting) प्रकारात भारताला हमखास पदकाची अपेक्षा आहे. त्याचं कारण आहे, मीरबाई चानू.
मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स 2022 (CWG 2022) स्पर्धेत वेटलिफ्टिंग (Weightlifting) प्रकारात भारताला हमखास पदकाची अपेक्षा आहे. त्याचं कारण आहे, मीरबाई चानू. (Mirabai chanu ) टोक्यो ऑलिम्पिक मध्ये मीरबाई चानून रौप्यपदक विजेती कामगिरी केली होती. 2018 मध्ये गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्स मध्ये मीरबाईने भारतासाठी सुवर्णपदक विजेती कामगिरी केली होती. 2014 राष्ट्रकुल स्पर्धेतही मीरबाई चानूने रौप्यपदक विजेती कामगिरी केली होती. बर्मिंघम गेम्स मध्ये मीरबाई चानूकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. 27 वर्षाच्या मीरबाई चानूचा 8 ऑगस्ट 1994 मणिपूरच्या काकचिंग गावात जन्म झाला. सर्वप्रथम तीरंदाज बनण्याचं मीरबाईचं स्वप्न होतं. पण काही कारणामुळे वेटलिफ्टिंगची तिने करीयर म्हणून निवड केली. मीरबाई चानूने प्रचंड मेहनत केली. 2014 मध्ये तिला ओळख मिळाली. 2014 कॉमनवेल्थ गेम्स मध्ये तिने 48 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंग मध्ये रौप्यपदक विजेती कामगिरी केली.
रियो ऑलिम्पिकमधलं अपयश मागे सोडलं
सातत्यपूर्ण कामगिरीमुळे मीरबाई चानू रियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली होती. रियो मध्ये तिला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. क्लीन एंड जर्क तिन्ही प्रयत्नात वजन उचलण्यात अपयशी ठरली. रियो ऑलिम्पिक मधील अपयश विसरुन तिने मीरबाई चानूने 2017 जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये तिने शानदार प्रदर्शन केलं. अनाहेम येथे झालेल्या चॅम्पियनशिप मध्ये तिने मीरबाईने एकूण 194 किलो वजन उचललं. स्नॅच मध्ये 85 आणि क्लीन अँड जर्क मध्ये 107 किलो वजन उचललं.
त्यानंतर मीरबाई चानूने एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत 49 किलो वजनीगटात कांस्य पदक जिंकून टोक्यो ऑलिम्पिकच तिकिट मिळवलं. 2021 ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगसाठी पात्र ठरलेली ती एकमेव वेटलिफ्टर होती.
पुन्हा टोक्यो मध्ये केली धमाल
टोक्यो ऑलिम्पिक मध्ये मीरबाई चानूने 49 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली. तो तिच्या आयुष्यातील ऐतिहासिक क्षण होता. ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंग मध्ये रौप्यपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला वेटलिफ्टर बनली. ऑलिम्पिक स्पर्धेत स्नॅच मध्ये चानू दुसऱ्या नंबरवर होती. क्लीन अँड जर्क मध्ये पहिल्या प्रयत्नात मीरबाई चानूने 110 किलो आणि दुसऱ्या प्रयत्नात 115 किलो वजन उचललं. तिसऱ्या प्रयत्नात ती अयशस्वी ठरली. ज्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.