CWG 2022 Day 6, Schedule: आज कुठल्या खेळात पदकांची अपेक्षा, कुठला सामना, किती वाजता? जाणून घ्या
कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या सहाव्यादिवशी वेटलिफ्टिंग, ज्युडो मध्ये भारताला सुवर्णपदकं मिळू शकतात. भारताने आतापर्यंत एकूण 12 मेडल्स जिंकले आहेत.
मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या सहाव्यादिवशी वेटलिफ्टिंग, ज्युडो मध्ये भारताला सुवर्णपदकं मिळू शकतात. भारताने आतापर्यंत एकूण 12 मेडल्स जिंकले आहेत. यात वेटलिफ्टिंगचे 3 गोल्ड मेडल्स आहेत. बुधवारी पीव्ही सिंधू. किदांबी श्रीकांत कोर्टवर दिसतील. त्याशिवाय दीपिका पल्लीकल, सौरव घोषाल ही मिश्र दुहेरीत आव्हान देतील. वेटलिफ्टिंग मध्ये भारताला आणखी एका गोल्ड मेडलची अपेक्षा आहे. लवप्रीत सिंह आव्हान सादर करणार आहे. लवप्रीतचा सामना दुपारी 2 वाजता सुरु होईल. महिला 87 किलो वजनीगटात पूर्णिमा पांडे संध्याकाळी 6.30 वाजता मेडल जिंकण्याच्या इराद्याने उतरेल.
लॉन बॉल मध्ये आणखी पदकं मिळू शकतात
लॉन बॉल मध्ये महिला फोरने गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचला. पण या खेळात आणखी पदकं मिळू शकतात. महिला पेयर्स मध्ये सायकिया आणि लवली दुपारी 1 वाजता तर पुरुष एकेरीत मृदुल बोरेगोहन राऊंड 2 मध्ये आव्हान सादर करतील.
टेबल टेनिसचे सामने किती वाजता?
टेबल टेनिस मध्ये पुरुष संघाने गोल्ड जिंकलं. महिला संघाच मेडल हुकलं. आता सगळ्यांच्या नजरा एकेरीच्या सामन्यावर आहेत. महिला गटात मनिका बत्रा, श्रीजा अकुला, रीथ दुपारी 2 वाजता आणि पुरुष सिंगल्सच्या क्वालिफिकेशन राऊंड मध्ये शरत कमल, साथियान आणि सानिल शेट्टी आपल्या अभियानाची सुरुवात करतील.