CWG 2022: पाकिस्तानच्या अर्शद नदीमने नीरज चोप्राला टाकलं मागे, वर्ल्ड चॅम्पियनला हरवून जिंकलं गोल्ड मेडल

CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमने जबरदस्त कामगिरी केली आहे. नीरज चोप्रा कॉमनवेल्थ मध्ये नसल्याने अर्शद नदीम त्याचा फायदा उचलणार हे स्पष्टच होतं.

CWG 2022: पाकिस्तानच्या अर्शद नदीमने नीरज चोप्राला टाकलं मागे, वर्ल्ड चॅम्पियनला हरवून जिंकलं गोल्ड मेडल
pakistan arshad nadeem Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 2:17 PM

मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स 2022 (CWG 2022) मध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमने (Arshad Nadeem) जबरदस्त कामगिरी केली आहे. नीरज चोप्रा (Neeraj Chopra) कॉमनवेल्थ मध्ये नसल्याने अर्शद नदीम त्याचा फायदा उचलणार हे स्पष्टच होतं. पण भालाफेकीत तो इतकी जबरदस्त कामगिरी करुन दाखवेल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती. अर्शद नदीमच्या थ्रो ने भल्या भल्यांना चक्रावून सोडलं आहे. अर्शद नदीमने भाला फेकीत वर्ल्ड चॅम्पियनवर मात करुन गोल्ड मेडलं जिंकलं. त्याने 90.18 मीटर अंतरापर्यंत थ्रो करुन गोल्ड मेडल मिळवलं. त्याची ही व्यक्तीगत सर्वोत्तम कामगिरी आहे. नीरज चोप्रा अजूनपर्यंत 90 मीटरचा मार्क पार करता आलेला नाही. नदीमने कॉमनवेल्थ स्पर्धेत 5 व्या थ्रो मध्ये हे यश मिळवलं.

अर्शदचा रेकॉर्ड

कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन अँडरसन पीटर्स 88.64 मीटरच्या थ्रो सह दुसऱ्या स्थानावर राहिला. 90 मीटरचा मार्क पार करणारा अर्शद आशिया खंडतील पहिला जॅवलिन थ्रोअर बनला आहे. अर्शद आणि टोक्यो ऑलिम्पिक मधील गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा मध्ये नेहमीच रोमांचक सामना पहायला मिळाला आहे. दोघे चांगले मित्र आहेत.

अर्शदच्या कामगिरीत सातत्य, सुधारणा

अर्शद मागच्या काही महिन्यांपासून शानदार प्रदर्शन करतोय. टोक्यो ऑलिम्पिक मध्ये 86.16 मीटर अंतरावर थ्रो करुन त्याने पाचव स्थान मिळवलं. त्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये त्याने आपल्या कामगिरीत सुधारणा केली. 86.16 मीटर थ्रो सह त्याने पाचव स्थान मिळवलं. अर्शदच्या कामगिरीत सुधारणा झाली. कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये अर्शदने ती कामगिरी करुन दाखवली, जो टप्पा गाठण्यासाठी नीरज चोप्रा सातत्याने प्रयत्न करतोय. कॉमनवेल्थ मध्ये अर्शदने 90.18 मीटर अंतरावर थ्रो केला. हा कॉमनवेल्थ मधला तसच पाकिस्तानचा नवीन राष्ट्रीय रेकॉर्ड आहे. नीरजने अलीकडेच डायमंड लीग मध्ये 89.94 मीटर अंतरावर थ्रो केला होता. हे त्याचं व्यक्तीगत सर्वोत्तम प्रदर्शन आहे.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.