CWG 2022 Live: भारताच्या कुस्तीवीरांची सुवर्ण भरारी, चार खेळाडूंनी मिळवलं गोल्ड मेडल

| Updated on: Aug 10, 2022 | 8:52 PM

बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताच्या मेडल्सची एकूण संख्या 20 झाली आहे. यात 6 गोल्ड मेडल आहेत.

CWG 2022 Live: भारताच्या कुस्तीवीरांची सुवर्ण भरारी, चार खेळाडूंनी मिळवलं गोल्ड मेडल
cwg 2022

मुंबई: भारतीय खेळाडूंच बर्मिघम मध्ये सुरु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये शानदार प्रदर्शन सुरु आहे. 7 व्या दिवशी भारताने पॅरा पावरलिफ्टिंग आणि लांब उडीत सुवर्ण आणि रौप्यपदक विजेती कामगिरी केली. भारताची एकूण मेडल्सची संख्या 20 झाली आहे. यात 6 सुवर्णपदकं आहेत. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये 8 व्या दिवशी महीला हॉकी वर सगळ्यांच्या नजरा असतील. ते आपलं पदक निश्चित करण्यासाठी मैदानात उतरतील.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Aug 2022 12:09 AM (IST)

    Wrestling : भारताच्या कुस्तीवीरांची सुवर्ण भरारी

    कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या कुस्तीवीरांनी कमाल केलीय. बजरंग पुनिया, दीपक पुनिया, साक्षी मलिक आणि अंशु मलिक यांनी सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं आहे. वेगळ्या-वेगळ्या वजनी गटात या खेळाडूंनी उत्तम खेळ सादर करत आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला चितपट केलं. राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांच्यासह, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदींनी या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.

  • 06 Aug 2022 12:04 AM (IST)

    Wrestling : कुस्तीत दीपक पुनियाचीही सुवर्ण पदकाला गवसणी

    भारताच्या दीपक पुनियाने पाकिस्तानच्या मोहम्मद इनामचा पराभव करत 86 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. त्याने 3-0 अशी लीड शेवटपर्यंत कायम राखली आणि गोल्ड मेडलवर आपलं नाव कोरलं.

  • 06 Aug 2022 12:02 AM (IST)

    Squash : दीपिका-जोत्सा जोडीचा पराभव

    स्क्वाशमध्ये महिला दुहेरीत भारताची स्टार जोडी स्पर्धेबाहेर फेकली गेलीय. जोत्सा चिनाप्पा आणि दीपिका पल्लीकल कार्तिकला मलेशियन जोडीने 11-2, 11-7 ने पराभूत केलं. भारताला या जोडीकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र आता ही जोडी स्पर्धेतून बाहेर गेली आहे.

  • 05 Aug 2022 11:17 PM (IST)

    Wrestline : साक्षी मलिकनेही जिंकलं गोल्ड मेडल

    महिलांच्या 62 किलो वजनी गटात भारताच्या साक्षी मलिकेने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. तिने कॅनडाच्या एमना गोडिनेजवर विजय मिळवलाय. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये काहीसी हतबल ठरलेल्या साक्षीने दुसऱ्या हाफमध्ये शानदार खेळ करत गोल्ड मेडल जिंकलं.

  • 05 Aug 2022 10:54 PM (IST)

    Wrestling : बजरंग पुनियाने सुवर्ण पदकावर नाव कोरलं

    भारताचा स्टार रेसलर बंजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटात देशासाठी सुवर्णपदक जिंकलं आहे. त्याने कॅनडाच्या लालकलन मॅक्निलला 9 – 2 अशा फरकाने पराभूत केलं. हे त्याचं सलग दुसरं सुवर्णपदक आहे.

    सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बजरंग पुनियाचं अभिनंदन केलं आहे.

  • 05 Aug 2022 10:05 PM (IST)

    Wrestling : अंशु मलिकेने जिंकलं सिल्व्हर मेडल

    रोमांचक फायनलमध्ये अंशु मलिकला 4 – 6 ने पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, ती सिल्व्हर मेडल जिंकण्यात यशस्वी ठरली. नायजेरियाची दिग्गज खेळाडू ओडुनायो फोलसाडेने तिसऱ्यावेळी कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकलं आहे. अशुंने शेवटच्या डावावर अपील केलं मात्र ती यशस्वी होऊ शकली नाही.

  • 05 Aug 2022 10:02 PM (IST)

    Table Tennis : मनिका-साथियानची जोडी बाहेर

    मनिक्का बत्रा आणि जी साथियान यांची जोडी क्वार्टर फायनल मॅचमध्ये पराभूत झाली. मलेशियाच्या चूंग आणि केरन लायने यांच्या जोडीने मागील कॉमनवेल्थ गेम्समधील ब्रॉन्झ मेडलिस्ट आणि जागतिक पातळीवर सहाव्या क्रमांकावर असलेल्या जोडीला 12-10, 9-11, 8-11, 11-7, 11-7 ने पराभूत केलं.

  • 05 Aug 2022 09:57 PM (IST)

    Table Tennis : शरत-अकुलाची जोडी सेमी फायनलमध्ये

    शरत कमल आणि श्रीजा अकुला यांच्या जोडीने इंग्लंडच्या हो टिन टिन आणि पिचफर्ड लियाम यांना मात देत सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. 11-7, 8-11, 11-8, 11-3, 11-9 अशा फरकाने त्यांनी सामना आपल्या नावावर केला. टिन टिन आणि पिचफर्डची जोडी कॉमनवेल्थ गेम्समध्ये दोन वेळा सिल्व्हर मेडल जिंकली आहे. त्यामुळे भारतासाठी हा मोठा विजय आहे.

  • 05 Aug 2022 09:54 PM (IST)

    Wrestling : गोल्ड मेडलसाठी भारत-पाकिस्तान आमनेसामने

    गोल्ड मेडलसाठी दीपक पुनियाचा सामना पाकिस्तानच्या इनामसोबत होणार आहे. इनामने सेमीफायनलमध्ये साऊथ आफ्रिकेचा रेसलर एडवर्ड लेसिंगविरोधात 3 – 5 अशा फरकाने विजय मिळवलाय.

  • 05 Aug 2022 09:23 PM (IST)

    Wrestling : मोहित ग्रेवाल सेमीफायनलमध्ये पराभूत

    भारताचा मोहित ग्रेवालला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. कॅनडाच्या अमरवीर धेसी याने 2 – 12 च्या फरकाने मोहितचा पराभव केला. तरीही मोहीत ग्रेवाल मेडलच्या स्पर्धेत कायम आहे.

  • 05 Aug 2022 09:21 PM (IST)

    Wrestling : दीपक पुनियाचेही मेडल निश्चित

    भारताचा स्टार युवा रेसलर दीपक पुनियाने सेमीफायनलच्या सामन्यात कॅनडाच्या एलेक्सजेंडक मोरेला 3 – 1 अशा फरकाने पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केलाय. त्यासह पुनियाचं रेसलिंगमधील एक मेडल निश्चित झालं आहे.

  • 05 Aug 2022 09:16 PM (IST)

    Wrestling : अंशु मलिकचं पदक निश्चित

    भारताच्या अंशु मलिकने सेमीफायनलमध्ये नेथमी अहिंसाला 10 – 0 अशा फरकाने पराभूत केलंय. त्यामुळे अंकु मलिकने भारताच्या खात्यात अजून एक पदक टाकलं आहे. रेसलिंगमध्ये अंशुने भारताला पहिलं पदक मिळवून दिलंय.

  • 05 Aug 2022 09:14 PM (IST)

    Wrestling : दीपक पुनिया सेमी फायनलमध्ये दाखल

    86 किलो वजनी गटात दीपक पुनियाने सेमीफायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. दीपकने हा सामना 10 – 0 अशा फरकाने आपल्या नावावर केला. ता तो मेडलपासून एक विजय दूर आहे.

  • 05 Aug 2022 09:11 PM (IST)

    Wrestling : दिव्या काकरान पराभूत

    रेसलिंगमध्ये भारतासाठी पहिली वाईट बातमी आहे. दिव्या काकरानला नायजेरियाच्या ब्लेसिंग ओबोरुदुदुकडून पराभव पक्तरावा लागला आहे. 68 किलो वजनी गटात क्वार्टर फायनलमध्ये दिव्याचा 0 – 11 ने पराभव झाला.

  • 05 Aug 2022 09:09 PM (IST)

    Badminton : पी. व्ही. सिंधु क्वार्टर फायनलमध्ये दाखल

    पी. व्ही. सिंधुने राऊंड ऑफच्या सामन्यात सोप्यारितीनं विजय मिळवत क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. तीने यूगांडाच्या हसिना कबूगाबेला 21-10, 21-9 ने पराभूत केलं.

  • 05 Aug 2022 09:07 PM (IST)

    wrestling : मोहित ग्रेवाल विजयी

    भारताच्या मोहित ग्रेवालने सिपरसच्या लेकसियसला 10 – 1 अशा फरकानं पराभूत केलं. तो आता 125 किलोग्राम वर्गात सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. भारतीय रेसलर्स एका पाठोपाठ एक सामना जिंकत जात आहेत.

  • 05 Aug 2022 06:59 PM (IST)

    Wrestling: साक्षी मलिकचा एकतर्फी विजय

    भारताची ऑलिंम्पिक मेडलिस्ट साक्षी मलिकने 62 किलो वजनी गटात इंग्लंडच्या केलसी बारनेसला 10-0 ने हरवलं. साक्षीने क्वार्टरफायनल मॅच जिंकण्यासाठी 70 सेकंदापेक्षा पण कमी वेळ घेतला

  • 05 Aug 2022 06:58 PM (IST)

    Wrestling: अंशु मलिक सेमीफायनल मध्ये

    भारताची युवा कुस्तीपटू अंशुने 57 किलो वजनीगटाच्या क्वार्टर फायनल मॅच मध्ये ऑस्ट्रेलियाच्या इरीन सायमयोनिडिसवर मात केली. अंशुने सामना जिंकण्यासाठी एक मिनिटापेक्षा पण कमी वेळ घेतला.

  • 05 Aug 2022 06:37 PM (IST)

    Badminton: किदांबी श्रीकांत क्वार्टर फायनल मध्ये पोहोचला

    किदांबी श्रीकांतने राउंड ऑफ 16 च्या सामन्यात सहजतेने विजय मिळवला. त्याने श्रीलंकेच्या दमिंदु अबे निक्रामावर 21-9, 21-12 असा विजय मिळवला. श्रीकांत आता क्वार्टर फायनल मध्ये पोहोचला आहे.

  • 05 Aug 2022 05:49 PM (IST)

    Table Tennis: क्वार्टर फायनल मध्ये पोहोचली हरमीत-सनीलची जोड़ी

    हरमीत देसाई आणि सनील शेट्टीच्या जोडीने टेबल टेनिस मध्ये पुरुष डबल्सच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी 11-3, 9-11, 11-9, 11-7 ने सामना जिंकला.

  • 05 Aug 2022 05:21 PM (IST)

    टेबल टेनिस: रीथचा पराभव

    भारतीय खेळाडू रीथचा फेंगने 41 व्या वुमेन्स सिंगल प्री क्वार्टर फायनल मॅच मध्ये पराभव केला.

  • 05 Aug 2022 05:20 PM (IST)

    बॅडमिंटन: तृषा जॉली आणि गायत्री क्वार्टर फायनल मध्ये

    तृषा जॉली आणि गायत्री गोपीचंदच्या जोडीने वुमेन्स डबल्सच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला आहे. भारतीय जोडीने जेमिमाह आणि मुंग्रहच्या जोडीवर 21- 2, 21- 4 असा विजय मिळवला.

  • 05 Aug 2022 04:40 PM (IST)

    एथलॅटिक्स: पुरुष रिले टीम फायनल मध्ये

    भारतीय पुरुष टीमने 4 x 400 मीटर रिले मध्ये दमदार प्रदर्शन केलं. पुरुष संघ फायनल मध्ये पोहोचला आहे. हीट 2 मध्ये मोहम्मद अनस, नोह निर्मल, मोहम्मद अजमल आणि अमोज जॅकबची चौकडी 3:06.97 वेळेसह दुसऱ्या स्थानावर राहिली.

  • 05 Aug 2022 04:38 PM (IST)

    टेबल टेनिस: श्रीजा अकुलाही विजयी

    श्रीजा अकुलाने वेल्सच्या चार्लोट कॅरीला हरवून क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला आहे. टेबल टेनिस मध्ये भारताच शानदार प्रदर्शन सुरु आहे.

  • 05 Aug 2022 04:37 PM (IST)

    टेबल टेनिस: मनिका बत्रा क्वार्टर फायनल मध्ये

    मनिका बत्राने ऑस्ट्रेलियाच्या मिंहयुंग जी ला 4-0 ने हरवून महिला एकेरीच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला आहे.

  • 05 Aug 2022 03:49 PM (IST)

    कुस्ती: दीपक पुनिया सुद्धा पुढच्या फेरीत

    बजरंग पुनिया नंतर दीपक पुनियाने सुद्धा कमाल केली आहे. त्याने न्यूझीलंडच्या मॅथ्यूला पुरुषांच्या फ्री स्टाइल 86 किलो वजनी गटात नमवलं.

  • 05 Aug 2022 03:47 PM (IST)

    कुस्ती: बजरंग पुनियाचा विजय

    भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने पहिला सामना सहजतेने जिंकला. त्याच्या समोर लो बिंघमच आव्हान होतं.

  • 05 Aug 2022 03:45 PM (IST)

    एथलॅटिक्स: ज्योति चौथ्या स्थानावर

    भारताची ज्योति याराजी महिला 100 मीटर हर्डल राऊंड 1 हीट 2 मध्ये चौथ्या स्थानावर आहे. तिने 13.18 सेकंदाचा वेळ घेतला.

  • 05 Aug 2022 03:44 PM (IST)

    टेबल टेनिस: भविना पटेल फायनलमध्ये

    पॅरा टेबल टेनिस मध्ये भारताचं आणखी एक मेडल निश्चित झालं आहे. भाविना पटेलने इंग्लंडच्या सुई बेलेचा 11-6, 11-6, 11-6 असा पराभव केला. महिला सिंगल्स क्लास 3-5 च्या फायनल मध्ये पोहोचली आहे.

  • 05 Aug 2022 03:43 PM (IST)

    टेबल टेनिस: शरत कमल आणि श्रीजाच्या जोडीचा विजय

    मनिका बत्रा आणि जी साथियान नंतर शरत कमल आणि अकुला श्रीजाच्या जोडीने विजय मिळवला आहे. मिक्स्ड डबल्स मध्ये भारतीय जोड़ीने मलेशियाच्या ली चांग फेंग आणि हो यिंग जोडीवर 1-3 असा विजय मिळवला.

  • 05 Aug 2022 02:55 PM (IST)

    भाजपातल्या लोकांनी सांगितलं की आमचा देखील अशा बदनामीला विरोध होता – दीपक केसरकर

    दिपक केसरकर – महाराष्ट्रात सध्या सुगीचं वातावरण पसरवलं जातंय – सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आदित्यजींची बदनामी करण्यात राणेंनी अनेक पत्रकार परिषद घेतला – भाजपातल्या लोकांनी सांगितलं की आमचा देखील अशा बदनामीला विरोध होता – *मी नरेंद्र मोदींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून त्यांच्या कानावर ह्या गोष्टी घातल्या * – पंतप्रधान आणि उद्धवजींचा डायलाॅग सुरु झाला होता

  • 05 Aug 2022 02:47 PM (IST)

    CWG 2022 Live: मनिका आणि साथियानची जोडी पुढच्या फेरीत

    मनिका बत्रा आणि जी साथियानच्या जोडीने मिक्सड डबल्सच्या प्री क्वार्टर फायनल मध्ये नायजेरियाच्या ओमोटायो आणि जोक ओजेमुला हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.

  • 05 Aug 2022 02:28 PM (IST)

    फक्त शाहू महाराजांच्या समाधी स्थळाच्या कामाला स्थगिती दिलेले नाही – राजेश क्षीरसागर

    दिलेल्या मंजुरी तपासून घेण्यासाठी स्थगिती दिली आहे

    फक्त शाहू महाराजांच्या समाधी स्थळाच्या कामाला स्थगिती दिलेले नाही

    आघाडी सरकारने दहा कोटी दिले असतील पुढील काळात 50 कोटी लागणार असतील तर देऊ

    विरोधकांनी समाजात संभ्रम पसरवू नये

    लोकशाहीमध्ये आंदोलन प्रत्येकाचा अधिकार

    फक्त शाहू महाराजच नाही तर सर्वच महापुरुषांच्या कामाची पूर्तता करेल

    कोण काय इशारा देतो याला मी महत्त्व देत नाही

    इशारा देण आंदोलन करणं हा त्यांचा हक्क

    माझ्यासारखा 36 वर्षे काम करणारा कार्यकर्ता ठाकरे कुटुंबाला सोडून जातो

    तेव्हा तरी विचार व्हायला हवा होता

    ठाकरे कुटुंबीयांची आमच्या भावना जोडल्या गेल्यात

    पण शिंदे साहेब आमचे राजकीय गुरू

    उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ला पूर्वनियोजित होता असं वाटत नाही

    शिवसैनिकांमध्ये आपसात अशा घटना होऊ नयेत ही माझी भावना आहे

    पूर्वी शिवसेना नेत्यांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वागत झालं नाही ते आता एकनाथ शिंदे यांचे होतय

    जनतेने त्यांना स्वीकारलय

    कोल्हापूर जिल्ह्यातील कडवट शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे

    दौऱ्यामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणावर स्वागत होईल

    पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना नेत्याचं आतापर्यंत झालं नाही एवढं मोठं स्वागत त्यांचं होईल

    पंधरा ते वीस ऑगस्ट दरम्यान मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांचा दौरा भव्य असेल

  • 05 Aug 2022 02:02 PM (IST)

    CWG 2022 Live: भारतीय लॉन बॉल टीमचा पलटवार

    2 राऊंड मध्ये पिछाडीवर राहिल्यानंतर भारताने जोरदार पलटवार केला आहे. चौथ्या राऊंड मध्ये भारतीय जोडीने 5-2 अशी आघाडी मिळवली आहे.

  • 05 Aug 2022 02:00 PM (IST)

    लॉन बॉल: आणखी एक मेडल पक्क करण्याची संधी

    भारत आणि इंग्लंड मध्ये वुमेन्स पेयर्सचा क्वार्टर फायनलचा सामना सुरु आहे. वुमेन्स फोर मध्ये भारताने पहिला किताब जिंकून इतिहास रचला आहे. भारत आता आणखी एक मेडल आपल्या नावावर करु शकतो.

Published On - Aug 05,2022 1:58 PM

Follow us
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.