CWG 2022 Day 8 Schedule: आज कुठल्या खेळात हमखास पदकांची अपेक्षा, किती वाजता सुरु होणार सामने जाणून घ्या…

CWG 2022 Day 8 Schedule: बर्मिंघम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज आठवा दिवस आहे. बॉक्सर्सनी भारतासाठी पदकं सुनिश्चित केली आहेत. अमित पंगाल, जॅस्मिन यांनी सेमीफायनल मध्ये धडक मारली आहे.

CWG 2022 Day 8 Schedule: आज कुठल्या खेळात हमखास पदकांची अपेक्षा, किती वाजता सुरु होणार सामने जाणून घ्या...
cwg 2022 Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 10:35 AM

मुंबई: बर्मिंघम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज आठवा दिवस आहे. बॉक्सर्सनी भारतासाठी पदकं सुनिश्चित केली आहेत. अमित पंगाल, जॅस्मिन यांनी सेमीफायनल मध्ये धडक मारली आहे. अन्य खेळांमध्ये सुद्धा यश मिळवलं आहे. भारत सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे. पुढच्या काही दिवसात भारत आणखी पदकं जिंकू शकतो. आज भारतीय खेळाडू कुठल्या, कुठल्या स्पर्धेत सहभागी होणार ते जाणून घेऊया.

टेबल टेनिसचे सामने कधी?

पॅरा टेबल टेनिस मध्ये पुरुष एकेरीत भारताचे राज अरविंदन सेमीफायनल खेळतील. पॅरा टेबल टेनिस मध्ये महिला गटात टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदक विजेती भविना पटेल सेमीफायनलची मॅच खेळेल. तिचा सामना इंग्लंडच्या सुए बॅली विरुद्ध होणार आहे. याच वर्गात सोनाबेन मनुभाई पटेलची लढत क्रिस्टियन इकेपेयोई विरुद्ध होईल. टेबल टेनिसचे सामना 2 वाजता सुरु होतील.

कुस्तीकडून मेडल्सची अपेक्षा

कुस्ती मध्ये सगळ्यांच्या नजरा बजरंग पुनियावर असतील. तो 65 किलो वजनी गटात उतरणार आहे. दीपक पुनिया 86 किलो वजनी गट, मोहित ग्रेवाल 125 किलो, महिलांमध्ये अशु मलिक 57 किलो, ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक 62 किलो आणि दिव्या काकरान 68 किलो वजनी गटात उतरतील. कुस्ती सामने दुपारी 3 वाजल्यापासून सुरु होतील.

बॅडमिंटन मध्ये आज सिंधुचा सामना

बॅडमिंटन मध्ये पुरुष एकेरीत भारताचा किदांबी श्रीकांत राऊंड ऑफ 16 मध्ये उतरेल. पीव्ही सिंधु युगांडाच्या हुसिना कोबुगाबे विरुद्ध अंतिम 16 मध्ये सामना खेळेल. पुरुष दुहेरीत सात्विकसाई राज आणि चिराग शेट्टीची जोडी राऊंड 16 मध्ये खेळेल. महिला दुहेरीत जॉली त्रिशा आणि गायत्री गोपीचंदच्या जोडीचा सामना मॉरिशेसच्या जेमिमा आणि मुनग्रह गणेश विरुद्ध होईल. बॅडमिंटनचे सामने दुपारी 3.30 वाजता सुरु होतील.

एथलॅटिक्स सामने कधी?

एथलॅटिक्स मध्ये महिलांच्या 100 मीटर अडथळ्याच्या शर्यतीत ज्योति याराजी उतरेल. 2.56 ही शर्यत होईल. संध्याकाळी 4:07 वाजता पुरुषांची रिले स्पर्धा होईल. हिमा दास महिलांच्या 200 मीटर शर्यतीत सेमाीफायनल मध्ये उतरेल. रात्री 12.45 वाजता ही शर्यत होईल.

हॉकीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेमीफायनलचा सामना

टेबल टेनिस मध्ये मनिका बत्रा आणि दिया परागचा सामना चुंग रेहान आणि स्पायसर कॅथरीन बरोबर होईल. राऊंड ऑफ 32 चा हा सामना आहे. संध्याकाळी 4.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय महिला हॉकी संघ सेमीफायनल मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध उतरेल. रात्री उशिरा हा सामना खेळला जाईल. लॉन बॉल मध्ये भारतीय महिला टीम पेयर्स मध्ये इंग्लंड विरुद्ध क्वार्टर फायनलचा सामना खेळेल.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.