Weightlifting: Jeremy lalrinnunga ने CWG 2022 मध्ये भारताला मिळवून दिलं दुसरं गोल्ड मेडल
पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात जेरेमी लालरिनुंगाने भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं आहे. स्पर्धेतील भारताचं हे दुसरं सुवर्णपदक आहे. याआधी काल मीरबाई चानूने भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं होतं.
मुंबई: पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात जेरेमी लालरिनुंगाने भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं आहे. स्पर्धेतील भारताचं हे दुसरं सुवर्णपदक आहे. याआधी काल मीरबाई चानूने भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं होतं. कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधील भारताचं हे दुसरं सुवर्णपदक आहे. स्नॅच मध्ये 140 किलो वजन उचलून रेकॉर्ड केला. क्लीन अँड जर्क मध्ये जेरेमीने 160 किलो वजन उचललं. तिसऱ्या प्रयत्नात त्याला 165 किलो वजन उचलायच होतं. पण शक्य झालं नाही. जेरेमीने एकूण 300 किलो वजन उचललं. त्याने रेकॉर्ड केला.
भारताच्या खात्यात 2 गोल्ड
जेरेमीने 300 किलो वजन उचलून गेम्स मध्ये नवीन रेकॉर्ड बनवला आहे. सिल्वर सामोआच्या नेवोने 293 किलो वजन उचललं. त्याची नजर गोल्डवर होती. क्लीन अँड जर्कच्या तिसऱ्या प्रयत्नात त्याने 174 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ते शक्य झालं नाही. जेरेमीच्या या गोल्डसह कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताने एकूण 2 गोल्ड, 2 सिल्वर आणि एका ब्राँझसह एकूम 5 पदकं जिंकली आहेत. भारताने ही सर्व पदकं वेटलिफ्टिंग मध्ये मिळवली आहेत. वेटलिफ्टिंग मध्ये भारताला गोल्ड मीराबाई चानू आणि जेरेमीने मिळवून दिलं. संकेत सर्गर, बिंदिया रानी यांनी रौप्य तर गुरुराजा पुराजीने कांस्य पदक मिळवलं.
Union Sports Minister Anurag Thakur congratulates Indian weightlifter Jeremy Lalrinnunga for winning GOLD in Men’s 67kg weightlifting in #CWG2022 pic.twitter.com/noWXLfTSy3
— ANI (@ANI) July 31, 2022
यूथ ऑलिम्पिक मध्ये चॅम्पियन आहे जेरेमी
जेरेमीच्या करीयरवर नजर टाकल्यास त्याने 2018 मध्ये यूथ ऑलिम्पिक मध्ये 62 किलो वजनी गटात गोल्ड मेडल मिळवलं होतं. यूथ ऑलिम्पिक गेम्स मध्ये गोल्ड जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता. एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये त्याने रौप्यपदक मिळवलं होतं.