CWG 2022: ठाकूरचे ‘शोले’ महाग पडतील, रविवारी भारत हसणार, पाकिस्तान रडणार

कॉमनवेल्थ गेम्स मध्ये महिला टी 20 क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याने कॉमनवेल्थ मधील क्रिकेट स्पर्धेची सुरुवात झाली.

CWG 2022: ठाकूरचे 'शोले' महाग पडतील, रविवारी भारत हसणार, पाकिस्तान रडणार
Renuka singh thakurImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 2:06 PM

मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स मध्ये महिला टी 20 क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याने कॉमनवेल्थ मधील क्रिकेट स्पर्धेची सुरुवात झाली. पहिल्या सामन्याचा निकाल अपेक्षित लागला नाही. पण काही खेळाडूंच्या परफॉर्मन्सने भारत पदकापासून फार लांब नसल्याचं स्पष्ट झालं. भारतीय महिला संघात अशीच एक खेळाडू आहे रेणुक सिंह ठाकूर. तिने पहिल्याच सामन्यात जोरदार गोलंदाजी केली. तिची गोलंदाजी सुरु असताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांमध्ये पॅव्हेलियन मध्ये परतण्याची स्पर्धा लागली होती. आता ठाकूर पाकिस्तान विरोधातही तशीच कामगिरी करु शकते. रेणुका सिंह ठाकूर मध्यमगती वेगवान गोलंदाज आहे. टीम इंडियासाठी ती आतापर्यंत फक्त 7 टी 20 सामने खेळली आहे. यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्या सामन्यात तिने शानदार प्रदर्शन केलं.

ऑस्ट्रेलियन फलंदाज हतबल

हिमाचल प्रदेश मधून येणाऱ्या 26 वर्षाच्या रेणुका सिंह ठाकूरने 4 षटकात 18 धावा देऊन 4 विकेट काढल्या. आयसीसी टी 20 रँकिंग मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या फलंदाजांच्या तिने विकेट काढल्या. मॅग लेनिंग आणि बेथ मुनीच्या विकेटशिवाय तिने एलिसा हीली आणि ताहिला मॅग्राथला बाद केलं.

रविवारी पाकिस्तान विरुद्ध सामना

रेणुका सिंह ठाकूरने ऑस्ट्रेलियाची जी हालत केली, तशीच अवस्था ती पाकिस्तानची सुद्धा करु शकते. वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तानच फार काही चाललं नाही. त्यामुळे रेणुका ठाकूरची गोलंदाजी त्यांना झेपेल का? हा मुद्दा आहे.

भारताकडून 7 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना तिने 7 विकेट घेतले आहेत. यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने सर्वोत्तम कामगिरी केली. ज्या टीम विरोधात तिने सर्वोत्तम प्रदर्शन केलं, त्याच संघाविरोधात तिने टी 20 मध्ये डेब्यु केला होता.

पाकिस्तानच्या अपेक्षा धुळीस मिळतील

रेणुका सिंह ठाकूर पाकिस्तान विरुद्ध पहिल्यांदा खेळणार आहे. भारताचा कट्टर परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध ती तिचा सर्वोत्तम खेळ दाखवेल, अशी अपेक्षा आहे. तिने अशी कामगिरी केली, तर निश्चितच भारतीय संघाचा मोठा फायदा होईल. क्रिकेट मध्ये मेडल जिंकण्याची पाकिस्तानची आशा धुळीस मिळू शकते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.