CWG 2022: रौप्यपदक विजेत्या बिंदियारानीकडे बूट घ्यायलाही पैसे नव्हते, त्यावेळी ‘या’ खेळाडूने केली मदत

बर्मिंघम मध्ये सुरु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये शनिवारचा दिवस भारतासाठी शानदार होता. काल भारताने चार पदकं मिळवली. ही चारही मेडल्स वेटलिफ्टर्सनी मिळवून दिली.

CWG 2022: रौप्यपदक विजेत्या बिंदियारानीकडे बूट घ्यायलाही पैसे नव्हते, त्यावेळी 'या' खेळाडूने केली मदत
bindiyarani-devi
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 2:43 PM

मुंबई: बर्मिंघम मध्ये सुरु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये शनिवारचा दिवस भारतासाठी शानदार होता. काल भारताने चार पदकं मिळवली. ही चारही मेडल्स वेटलिफ्टर्सनी मिळवून दिली. याची सुरुवात संकेत महादेवने केली. मीराबाई चानू गुरुराजा आणि त्यानंतर बिंदियारानीने भारतासाठी पदक विजेती कामगिरी केली. बिंदियारानी इथवर पोहोचली, त्यात काही योगदान टोक्यो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानूचही आहे. बिंदियारानीचं 55 किलो वजनी गटात फक्त एक किलोच्या फरकाने सुवर्णपदक हुकलं.

बिंदियारानी आणि मीराबाई मध्ये बऱ्याच समानता आहेत. या दोन्ही खेळाडू इशान्य भारतातून मणिपूर मधून येतात. याशिवाय या दोघी एकाच अकादमीत सराव करतात. दोघांची कौटुंबिक पार्श्वभूमी सुद्धा जवळपास सारखीच आहे. अनेक बाबतीत बिंदियारानी मीराबाई चानू सारखीच आहे. म्हणूनच अनेकांनी बिंदियारानीच नाव मीराबाई चानू 2.0 ठेवलं आहे. मीराबाई चानूने ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकल नव्हतं, तेव्हाची ही गोष्ट आहे.

चानूच बिंदियारानीची आदर्श

बिंदियारानी देवी मीराबाई चानूलाच पाहूनच मोठी झाली आहे. जेव्हा मीराबाई चानूला बिंदियारानीच्या संघर्षाबद्दल कळलं, तेव्हा तिने मदतीचा हात पुढे केला होता. बिंदियारानीकडे चांगले बूट नाहीत, हे मीराबाई चानूला समजलं, तेव्हा तिने आपले बूट बिंदियारानीला भेट म्हणून दिले. द ब्रिजने आपल्या बातमीत ही माहिती दिलीय.

मीरा ताईचं माझ्या यशामध्ये योगदान

बिंदियारानीने मागच्यावर्षी कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानंतर ती म्हणाली होती की, “मीरा ताईचं माझ्या यशामध्ये योगदान आहे. माझी टेक्निक आणि ट्रेनिंगच्या बाबतीत ती नेहमीच मदतीसाठी तयार असते. माझ्याकडे बूट विकत घेण्याचे पैसे नाहीत, हे तिला माहित होतं. तिने जराही मागचा पुढचा विचार न करता तिचे बूट मला दिले. ती नेहमीच माझे प्रेरणास्थान राहिली आहे. तिचे पाय जमिनीवरच आहेत. त्यामुळे मी तिची सर्वात मोठी चाहती आहे”

असं जिंकलं पदक

बिंदियारानीची ही पहिली कॉमनवेल्थ स्पर्धा आहे. पहिल्याच प्रयत्नात तिने पदक विजेती कामगिरी केली. बिंदियारानीने स्नॅच मध्ये चांगली सुरुवात केली. पहिल्याच प्रयत्नात तिने 81 किलो वजन उचललं. पुढच्या दोन प्रयत्नात 84 आणि 86 किलो वजन उचललं. क्लीन अँड जर्क मध्ये तिने 110 किलो वजनासह चांगली सुरुवात केली. पण दुसऱ्या प्रयत्नात 114 किलो वजन उचलण्यात अपयशी ठरली. पण तरीही बिंदियारानी देवीने हार मानली नाही. तिने ठरवून 116 किलो वजन उचललं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.