CWG 2022: Neeraj Chopra बाहेर गेल्यामुळे पाकिस्तानला लागली लॉटरी

CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धा (CWG) सुरु होण्याआधी भारताला मोठा झटका बसला आहे. भालाफेकीत भारताचे हमखास पदकाचे आशास्थान असलेला नीरज चोप्रा (Neeraj Chopra) दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाहीय.

CWG 2022: Neeraj Chopra बाहेर गेल्यामुळे पाकिस्तानला लागली लॉटरी
Neeraj Chopra
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 7:25 AM

मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धा (CWG) सुरु होण्याआधी भारताला मोठा झटका बसला आहे. भालाफेकीत भारताचे हमखास पदकाचे आशास्थान असलेला नीरज चोप्रा (Neeraj Chopra) दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाहीय. वर्ल्ड चॅम्पियनशिप (World Championship) मध्ये रौप्यपदक मिळवणारा नीरज चोप्रा ग्रोइन इंजरीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेला मुकणार आहे. नीरज चोप्रा बाहेर गेल्यामुळे पाकिस्तानला लॉटरी लागली आहे. कदाचित आता पाकिस्तानचा जॅवलिन थ्रोअर अर्शद नदीमला बर्मिंघम मध्ये पदक जिंकता येऊ शकते. वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्येही नीरज चोप्रा बरोबर अर्शद नदीमचा सामना झाला होता. त्यावेळी नीरजने रौप्यपदक विजेती कामगिरी केली होती, तर अर्शद नदीमला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. याआधी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतही लढत झाली. त्यावेळी नीरजने सुवर्णपदाकाला गवसणी घातली, तर अर्शद नदीमला 5 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

स्वबळावर नाही, नशिबाने जिंकू शकतो पाकिस्तान

जेव्हा कधी मोठ्या स्टेजवर भारताच्या नीरज चोप्रा बरोबर पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा सामना झालाय, प्रत्येकवेळी नीरज चोप्रा सरस ठरलाय. यावेळी पाकिस्तानी जॅवलिन थ्रोअरकडे मोठी संधी आहे. नीरज राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर गेल्यामुळे पाकिस्तानला ही संधी आहे. नीरज चोप्राला वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेदरम्यान ग्रोइन इंजरी झाली होती. त्यामुळे बर्मिंघम मध्ये स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.

अर्शदलाही दुखापत

नीरज प्रमाणेच पाकिस्तानचा अर्शद नदीम सुद्धा गुडघे दुखापतीने ग्रस्त आहे. कदाचित कॉमनवेल्थ स्पर्धेनंतर तो गुडघ्यावर शस्त्रक्रिया करुन घेऊ शकतो. कॉमनवेल्थ मध्ये मेडल जिंकण्यासाठी अर्शद नदीमने दक्षिण आफ्रिकेत जाऊन प्रचंड तयारी केली आहे. पाकिस्तानात दिलेल्या एका मुलाखतीत त्याने हा खुलासा केला.

वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.